खळबळजनक घटना समोर आली आहे.26 जानेवारीला होणार होता मोठा हल्ला,दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर हिंसेचा वापर करून चिरडून टाकण्याचा प्लान उद्ध्वस्त करण्यात शेतकऱ्याना यश आले आहे.

26 जानेवारी प्रजा सत्ताक दिना निमित्त राजधानी दिल्लीतील राजपथवर भारताच्या तीनही संरक्षण दलांची संचलने (परेड) होत असतात.गेले चार महीने शेतकरी आपल्या मागण्यांसाठी दिल्लीत आंदोलन करत आहेत.सरकारकडून त्यावर अजूनही तोडगा न निघाल्याने आपला विरोध प्रदर्शित करण्यासाठी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड काढण्याचा इशारा दिलेला आहे.

शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी आता त्यांच्यावर हिंसेच्या मार्गाने दबाव आणून चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचे धक्कादायक षडयंत्र समोर आले आहे.
https://twitter.com/drkafeelkhan/status/1352681045896773634
26 जानेवारीला होणार होता मोठा हल्ला
या षडयंत्रात सहभागी असणाऱ्या एका संशयीत व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.
यानंतर आणखी एक खुलासा समोर आला असून,मला शेतकऱ्यांनी दबाव टाकून असे बोलायला लावले असं संशयीत तरुण म्हणत असल्याचे समोर आले आहे.पोलिसानी हा व्हिडिओ खरा आहे का याबाबत अजून स्पष्ट केलेले नसून ते लवकरच स्पष्ट होईल असे सांगण्यात येत आहे. नेमकी खरी बाजू कोणती हे आता चौकशीतूनच समोर येवू शकते. मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अश्रुधूर, लाठी मार, बॅरेकेटिंग सर्वांवर मात करत शेतकऱ्यानी कूच केली दिल्ली
2021 जानेवारी 26 लोकसत्ताक म्हणजेच लोकांची सत्ता असे या दिवसाचे औचित्य म्हणून साजरे केले जात आहे.मात्र देशाच्या इतिहासात प्रथम देशातील नागरिक आणि त्यातही शेतकरी आणि पोलिस यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे.अश्रुधूर, लाठी मार, बॅरेकेटिंग सर्वांवर मात करत शेतकऱ्यानी कूच केली दिल्ली
खरेतर हा संघर्ष थेट भाजप सरकार चे आडमुठे धोरण आणि शेतकरी असा आहे,
गेली 62 दिवस कडाक्याच्या थंडीत जुलमी शेतकरी कायदे वापस घेण्यासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत.
शेतकऱ्यांना अडवण्यासाठी पोलिसांनी केलेले सगळे प्रयत्न निष्फळ,शेतकऱ्यांनी काही ठिकाणी पोलिसाना झेंडे आणि ट्रॅक्टर च्या सहाय्याने पळवून लावताना दिसतात.
हेही वाचा.. एमएसपी वा किमान आधारभूत मूल्य
. ऊसतोड कामगार :प्रश्न की व्यथा ?
सोपी गोष्ट : शेतकरी कायदा ; सहा प्रश्न
हेही वाचा..शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न; झुकेरबर्ग झुकला,पेज सुरू