2021 जानेवारी 26 लोकसत्ताक म्हणजेच लोकांची सत्ता असे या दिवसाचे औचित्य म्हणून साजरे केले जात आहे.मात्र देशाच्या इतिहासात प्रथम देशातील नागरिक आणि त्यातही शेतकरी आणि पोलिस यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे.अश्रुधूर, लाठी मार, बॅरेकेटिंग सर्वांवर मात करत शेतकऱ्यानी कूच केली दिल्ली
खरेतर हा संघर्ष थेट भाजप सरकार चे आडमुठे धोरण आणि शेतकरी असा आहे,
गेली 62 दिवस कडाक्याच्या थंडीत जुलमी शेतकरी कायदे वापस घेण्यासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत.
शेतकऱ्यांना अडवण्यासाठी पोलिसांनी केलेले सगळे प्रयत्न निष्फळ,शेतकऱ्यांनी काही ठिकाणी पोलिसाना झेंडे आणि ट्रॅक्टर च्या सहाय्याने पळवून लावताना दिसतात.
गेल्या 62 दिवसांपासून आंदोलनातून आणि चर्चेतून काहीही मार्ग सरकारकडून काढला गेला नाही.त्यामुळे शेतकऱ्यांचा संयम सुटल्याचे आता पाहायला मिळत आहे.
रॅलीत 20 ते 25 हजार ट्रॅक्टर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
अश्रुधूर, लाठी मार, बॅरेकेटिंग सर्वांवर मात करत शेतकऱ्यानी कूच केली दिल्ली
पोलिस आणि शेतकऱ्यांच्या संघर्षात अनेक शेतकरी मात्र जखमी झाल्याचे समजते.
प्रधानमंत्र्यांशी हात जोडून विनंती आहे की कायदे मागे घ्यावेत , आम्ही शेतकरी आहोत,नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री आम्हीच बनवले आहे.आम्ही शेतकरी आहोत आणि आमची मुलंच सैन्यात आहेत. आणि निवृत्त झाल्यानंतर ते शेतीच करणार आहेत. तेव्हा मोदींनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. आम्ही त्यांना सन्मान दिला मान दिला,प्रधानमंत्री पदावर बसवले त्यांना आमच्या मागण्या मान्य करायला हव्यात. अशी प्रतिक्रिया एक आंदोलक वृद्ध शेतकरी महिलेने दिली आहे.
भारतातील सर्व प्रसार माध्यमे शेतकरी विरोधी वार्ताकन केले जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. जेव्हा पोलिस बळाचा वापर करतात तेव्हा व्हिडिओ कॅमेरा फिरवला जातो.असे दिसून आले.
शेतकरी आता इंडिया गेटच्या दिशेने जाताना दिसत आहेत.
इथे लाईव पाहता येईल
आंदोलनाशी संबंधित अपडेट्स.. जारी असतील.. अपडेट्स कडे लक्ष ठेवा..
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)