पॅरिस : भारतीय नागरिकांना घेऊन निकाराग्वाला जाणारं विमान फ्रान्स ने रोखल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. या विमानात 303 भारतीय नागरिक होते. या विमानाचा मानवी तस्करीसाठी वापर केला जात असल्याचा संशय फ्रेंच यंत्रणांना आहे.एका निनावी सूचनेवरून हे विमान ताब्यात घेण्यात आल्याचे फ्रेंच वकिलांनी सांगितले.यावेळच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताकडून फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलेलं असताना ही घटना समोर आलीय.मॅक्रॉन यांनी स्वतः ट्विट करून भारताचं निमंत्रण स्वीकारल्याची माहिती दिलेली आहे. खरंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी उपस्थित राहण्यास नकार दिल्यानंतर भारताकडून मॅक्रॉन यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण पाठवण्यात आलं होतं.
फ्रेंच अधिकारी काय म्हणाले?
वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रान्स च्या अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, भारतातून निकाराग्वाला जाणारे विमान मानवी तस्करीसाठी वापरले जाऊ शकते.या विमानाने संयुक्त अरब अमिरातीहून उड्डाण घेतले होते. या प्रवाशांच्या प्रवासाच्या परिस्थिती आणि हेतूंबाबत न्यायालयीन चौकशी सुरू झाल्याची माहिती फ्रेंच अधिकाऱ्यांनी दिली आहे. मानवी तस्करीच्या संशयावरून फ्रेंच अधिकारी तपास करत असल्याची माहिती समोर आलीय.
फ्लाइट बद्दल काय माहिती आहे
दुबईमधून उड्डाण घेतलेल्या रोमानियन चार्टर कंपनीचे हे विमान असल्याची माहिती स्पष्ट झालीय.
पोलिसांनी हस्तक्षेप केल्यावर सदर विमान तांत्रिक थांबण्यासाठी छोट्या वैट्री विमानतळावर उतरवले गेले.
“प्रवाशांना शक्य तितक्या सर्वोत्कृष्ट स्वागत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, वैट्री विमानतळावरील रिसेप्शन हॉलचे वैयक्तिक बेड असलेल्या वेटिंग लाऊंजमध्ये रूपांतर करण्यात आले आहे,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. विमानातील भारतीय नागरिकांना इथे आणखी किती दिवस ठेवले जाईल किंवा त्यांना भारतात पाठवण्याची काही तयारी आहे का, याबद्दल फ्रेंच अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.
निकाराग्वा आणि मानवी तस्करी यांचा काय संबंध आहे?
निकाराग्वा हा मध्य अमेरिकन देश आहे. निकाराग्वाच्या उत्तरेस होंडुरास, पूर्वेस कॅरिबियन, दक्षिणेस कोस्टा रिका आणि पश्चिमेस प्रशांत महासागर आहे.बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करणाऱ्यांसाठी हा देश नंदनवन आहे.
दरवर्षी हजारो अवैध स्थलांतरित या देशातून अमेरिका-मेक्सिको सीमेवर पोहोचत असतात.
बेकायदेशीर स्थलांतरितांनाही या मार्गावर अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते,
ज्यात भौगोलिक स्थान आणि चोरी, दरोड्यासारख्या घटनांचा समावेश होतो. निकाराग्वामध्ये या स्थलांतरितांवर विशेष तपास केला जात नाही.
अवैधरीत्या अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत 100 पटीने वाढ
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 23,2023 | 12:10 PM
WebTitle – Why did France seize the plane carrying 303 Indians?