अवैधरीत्या अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत 100 पटीने वाढ..अमेरिकेत बेकायदेशीरपणे स्थलांतरित होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मेक्सिको, ग्वाटेमाला, होंडुरास आणि इक्वेडोरमधील लोक बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करून आश्रय घेत असले तरी या यादीत भारतीयांची संख्या वाढत आहे. पूर्वी ही संख्या खूपच कमी होती परंतु आता नवीन आकडेवारीवरून असे समोर आले आहे की भारतातून मोठ्या संख्येने लोक अवैध स्थलांतर करत अमेरिकेत जात आहेत आणि बेकायदेशीर घुसखोरीसाठी मेक्सिको सीमेचा वापर करत आहेत.अहवालानुसार, 2012 ते 2022 दरम्यान मेक्सिकोमार्गे अवैधरीत्या अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत 100 पटीने वाढ अमेरिकेच्या कस्टम्स आणि बॉर्डर पेट्रोलिंग पोलिसांकडून 2012 मध्ये अशा 642 प्रकरणांची नोंद करण्यात आली होती.
बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करण्यात भारतीय तिसऱ्या क्रमांकावर आहेत
तर 2022 मध्ये ही संख्या 63,927 पर्यंत वाढली. त्याच वेळी, न्यू अमेरिकन इकॉनॉमी या थिंक टँकनुसार, अमेरिकेत अवैधरित्या प्रवेश करण्यात भारतीय तिसर्या क्रमांकावर आहेत. अमेरिकेत अवैध भारतीय स्थलांतरितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.यूएस कस्टम्स आणि बॉर्डर प्रोटेक्शनने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी ऑक्टोबर ते या वर्षी सप्टेंबर या आर्थिक वर्षात भारतातून सुमारे 42,000 स्थलांतरितांनी दक्षिण आणि मेक्सिकन सीमेवरून बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश केला आहे. मेक्सिको सीमेवरून भारतीयांच्या प्रवेशाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.ज्यामध्ये सीमेवरील एका अधिकाऱ्याकडून 2 मुलींसह 12 जणांची इंग्रजी भाषेत चौकशी केली जात आहे. या तरुणांपैकी काही पंजाबी देखील आहेत ज्यांना इंग्रजी भाषा येत नाही आणि ते चिंताग्रस्त आहेत तसेच ते इंग्रजीतून विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तरे देऊ शकत नाहीत.असे दिसते आहे.पंजाब केसरीने हे वृत्त दिले आहे.
एका वर्षात 96 हजार भारतीयांना अटक करण्यात आली
बेकायदेशीर अवैधरीत्या अमेरिकेत घुसलेल्या सुमारे 96 हजार भारतीय नागरिकांना अटक करण्यात आलीय. हा डेटा एका वर्षाचा आहे, म्हणजे ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023. यूएस कस्टम्स आणि बॉर्डर प्रोटेक्शन डेटानुसार, अटक करण्यात आलेल्या 96,917 भारतीयांपैकी 41,770 जणांना यूएस-मेक्सिको सीमा ओलांडताना अटक करण्यात आली.तर अमेरिका-कॅनडा सीमेवर 30,010 भारतीय पकडले गेले. गेल्या एका वर्षात जवळपास 45,000 भारतीयांनी अमेरिकेची दक्षिण सीमा बेकायदेशीरपणे ओलांडली आहे. या स्थलांतर करणाऱ्या भारतीयांना देशातच भीती वाटते असे समोर आले आहे. वॉल स्ट्रीट जर्नलमधील एका अहवालानुसार, भारतातील राजकीय आणि धार्मिक छळामुळे अमेरिकेत येणाऱ्या भारतीयांची संख्या वाढली आहे. आपल्या देशात आर्थिक संधींचा अभाव म्हणजेच नोकऱ्या रोजगार नसणे हे सुद्धा एक मोठं कारण आहे.
भारतीय अशाप्रकारे आपला जीव धोक्यात घालत आहेत
भारतीय आपला जीव धोक्यात घालून अमेरिकेत स्थायिक होण्याची स्वप्ने पाहत आहेत.
मागीलवर्षी 21 जानेवारी रोजी अमेरिकेपासून 30 मैल पूर्वेकडे कॅनडामध्ये एका गुजराती कुटुंबातील चार लोकांचे मृतदेह बर्फात गाडले गेलेले आढळून आले होते. या कुटुंबाला बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करायचा होता आणि ते बर्फाच्या वादळात अडकले.
अशाच प्रकारे गेल्या वर्षी जूनमध्ये अमेरिकेच्या सीमा गस्ती पथकाने बुडत्या बोटीतून ६ भारतीयांची सुटका केली होती.
बेकायदेशीररित्या अमेरिकेत प्रवेश केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यू अमेरिकन इकॉनॉमी थिंक टँकच्या वृत्तानुसार अमेरिकेत 10 दशलक्ष अवैध स्थलांतरित राहतात.
त्यापैकी 6 लाखांहून अधिक भारतीय आहेत.
अमेरिकेच्या तुरुंगात 20 हजारांहून अधिक भारतीय बेकायदेशीरपणे बंद आहेत
गेल्या वर्षी भारतीयांच्या बेकायदा प्रवेश करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला होता.यूएसच्या फेडरल एजन्सीने कॅनडा च्या सीमेवरून 2022 मध्ये भारतीयांच्या अवैध प्रवेशामध्ये गुंतलेल्या टोळीचा पर्दाफाश केला होता. कॅलिफोर्नियातून हे नेटवर्क चालवणाऱ्या टोळीचा म्होरक्या जसपाल गिल याला अटक करण्यात आली.एका अहवालानुसार, अमेरिकेच्या तुरुंगात 20 हजारांहून अधिक भारतीय बेकायदेशीरपणे बंद आहेत. या तुरुंगांमध्ये कागदपत्र नसलेल्या कैद्यांकडून जबरदस्ती मजूरी करून घेतली जाते.अशा मजुरीद्वारे तुरुंग कमाई करताना दिसतात, पण कैद्यांना फारसा मोबदला मिळत नाही. जे कैदी काम करण्यास नकार देतात त्यांना अंधाऱ्या कोठडीत, सेलमध्ये बंद केले जाते.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 22,2023 | 21:22 PM
WebTitle – increase in the number of Indians entering the US illegally