कानपूर : भाजप हा पक्ष पार्टी विथ डिफरन्स म्हणजे इतरांच्यापेक्षा वेगळी ओळख असल्याचा दावा करत आला आहे. मात्र गेल्या आठ वर्षाच्या सत्तेत असे अनेक प्रकार,बातम्या समोर आल्यात ज्यामुळे अनेकांच्या मनात असे प्रश्न निर्माण झाले आहेत की वेगळी ओळख म्हणजे नक्की काय? अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमधून समोर आलीय,इथले भाजप नेता मोहित सोनकर (mohit sonkar) यांना भाजपच्याच महिला नेत्याशी रोमान्स करताना त्यांच्या धर्म पत्नीने रंगेहाथ पकडलं. रणे कठीण झाले. भाजपच्या महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष बिंदू गोयल (कानपूर दक्षिण) यांच्यासोबत मोहित सोनकर बंद खोलीत रोमान्स करत असताना अचानक त्यची पत्नी तेथे आली. मोहितला दुसऱ्या महिलेसोबत पाहून पत्नीच्या तळपायाची आग मस्तकात गेली,ती एवढी संतापली की तिने मोहितला चप्पलने मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्याला शिवीगाळही केली. भाजप नेता भाजपच्याच महिला नेत्यासोबत रोमान्स करताना रेड हँड पकडला गेला.संतापलेल्या पत्नीने कुटुंबासह भाजप नेत्याची भर रस्त्यात रस्त्यावर चप्पलने धुलाई केली.हा प्रकार व्हिडिओ मध्ये कैद झाला आहे.आणि मोठ्याप्रमाणावर तो व्हायरल होत आहे.
सदर घटना काल शनिवारी रात्री उशिरा घडल्याचे समजते.यावेळी भाजप नेता मोहितच्या पत्नीसह मोहितची सासू आणि सासरे आणि इतरही लोक तेथे उपस्थित होते. सर्वांनी मोहितला भररस्त्यात नेऊन चप्पलने मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
घटनास्थळी पोलिसही उपस्थित
मिळालेल्या माहितीनुसार, भाजप नेता मोहित सोनकर यांना मारहाण होत असताना, घटनास्थळी पोलिसही तिथं उपस्थित होते, पण मोहितच्या पत्नीला इतका राग आला की तिने पोलिसांची पर्वा न करता पतीला मारहाण सुरूच ठेवली. मोहितची पत्नी आणि सासरच्या मंडळींनी भाजप महिला नेता बिंदू गोयल यांनाही मारहाण केली.
भाजप नेत्या बिंदू गोयल यांना माध्यमांनी मारहाणीबाबत प्रश्न विचारला असता त्या डोळे मिटून शांत बसल्या. काहीच बोलल्या नाहीत.
मात्र, त्यांच्या चेहऱ्यावर झालेली जखम हल्ल्याची साक्ष देत होती.
जवळपास तासभर चाललेल्या या हाय वोल्टेज गदारोळानंतर दोन्ही बाजूचे लोक तिथून निघून गेले.मात्र याप्रकरणी दोन्ही पक्षाकडून याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, कानपूर दक्षिण भाजपच्या अध्यक्षा बिना आर्य यांना या प्रकरणी विचारलं असता त्या म्हणाल्या की, ही बाब अद्याप त्यांच्या निदर्शनास आलेली नाही. आणि त्यांनी संबंधित व्हिडिओही अजून पाहिलेला नाही.
मोहित सोनकर हे बुंदेलखंडचे प्रादेशिक मंत्री आहेत. 6 वर्षांपूर्वी त्यांचा मोनी सोनकर यांच्यासोबत विवाह झाला होता.
मात्र दोघांचे वैवाहिक संबंध फारसे चांगले नव्हते. दरम्यान, मोहितला भाजपच्या एका महिला नेत्यासोबत पकडण्यात आले.
त्यांच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
जम्मू काश्मीर मध्ये 25 लाख मतदार अचानक कसे वाढले? समजून घ्या
‘अफजल’ बनून ‘विष्णू’ ने दिली मुकेश अंबानी ना जीवे मारण्याची धमकी
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 21,2022, 11:50 AM
WebTitle – Video: Wife beats up BJP leader on street after seeing him in bedroom with female leader