mukesh ambani threat case: सकाळी 10.39 च्या सुमारास रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये पहिला कॉल करताना त्याने केवळ मुकेश अंबानींनाच नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी त्याला बोरिवली पश्चिम येथून ताब्यात घेतलेय.रिलायन्स ग्रुपचे (Reliance Group) चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ५६ वर्षीय विष्णू विभू भौमिकला (Vishnu Vibhu Bhowmik) पोलिसांनी पकडले आहे. डीसीपी नीलोत्पल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या तावडीत सापडलेली ही व्यक्ती व्यवसायाने ज्वेलर्स (Jeweller) असून त्याचे दक्षिण मुंबईत दुकान आहे. रिपोर्टनुसार, रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये कॉल करताना त्याने आपले नाव अफजल सांगितले होते.
9 वेळा केला होता धमकीचा फोन
रिपोर्टनुसार,ही व्यक्ती दहिसरची रहिवासी असून त्याने सोमवारी सकाळी 10.39 ते दुपारी 12 वाजेदरम्यान एक-दोन नव्हे तर नऊ वेळा आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना फोन केला. शिवीगाळ करत त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
धमकीचा फोन आल्यानंतर केंद्रीय यंत्रणाही सतर्क झाल्या
मुंबईतील गिरगाव परिसरात असलेल्या रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात सकाळी १०.३९ च्या सुमारास पहिला कॉल करताना
या व्यक्तीने केवळ मुकेश अंबानींनाच नव्हे तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
या प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलीस सतर्क झाले आणि कलम ५०६(२) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन काही केंद्रीय यंत्रणांनीही यासंदर्भात माहिती घेतली आहे.
डीसीपी नीलोत्पल यांच्या वतीने आरोपीच्या कोठडीबाबत सांगण्यात आले की,
विष्णू विभू भौमिकला बोरिवली पश्चिम येथून पकडून डीएम मार्ग पोलिस ठाण्यात आणण्यात आले. येथे त्याची याप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. डीसीपीच्या म्हणण्यानुसार, आम्ही या व्यक्तीला अटक केली आहे आणि त्याचे पूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड देखील तपासत आहोत. ते म्हणाले की, धमक्या देताना या व्यक्तीने केवळ मुकेश अंबानींचेच नाव घेतले नाही, तर एकदा कॉलमध्ये धीरूभाई अंबानींचे नावही वापरले होते.
लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे याआधीही म्हणजे गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये देखील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराच्या बाहेर एक संशयास्पद एसयूव्ही कार सापडली होती, ज्यामध्ये 20 जिलेटिनच्या काड्या सापडल्या होत्या. संशयास्पद कार सापडल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात महाराष्ट्र एटीएसशिवाय एनआयएनेही या प्रकरणात तपास केला.याप्रकरणी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली होती.
हर घर तिरंगा: 5 करोडपेक्षा अधिक लोकांनी राष्ट्रध्वज सेल्फी अपलोड केली
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 16,2022, 19:30 PM
WebTitle – mukesh ambani threat case Posing as ‘Afzal’, ‘Vishnu’ threatened to kill Mukesh Ambani