उत्तर प्रदेश, मोरादाबाद – दिलारी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजपूर केसरिया गावात सिमेंट स्टोअरच्या तळघरात शेणाच्या गोवऱ्या मधून निघालेल्या विषारी वायूमुळे चार जणांमधील एका कुटुंबातील तीन जण मृतावस्थेत सापडल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली.
मुरादाबादचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक पवन कुमार म्हणाले की, प्रथमदर्शनी असे दिसते की तळघरात साठवलेल्या अर्ध्या वाळलेल्या शेणाच्या गोवऱ्या नी सोडलेल्या विषारी वायूमुळे श्वास घेण्यास अडचण आल्याने गुदमरल्यामुळे मृत्यू झाला आहे.
राजेंद्र (वय ५० वर्षे), त्यांचे मुलगे हरकेष (वय ३० वर्षे), प्रितम (वय २५ वर्षे) आणि त्यांचा नोकर रमेश (वय ४० वर्षे) सोमवारी रात्री बेसमेंट मध्ये असलेल्या सिमेंट दुकानात काम करत होते.तेव्हा हा प्रकार घडला.
राजेंद्र त्यांची मुलं आणि नोकरासह सिमेंटच्या दुकानात रात्री काम करत होते. रात्री ११ वाजता राजेंद्र यांची पत्नी त्यांना बोलवायला आली.
मात्र तिनं वारंवार हाका मारूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तिनं पोलिसांना बोलावलं.
पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी बेसमेंटमध्ये जाऊन पाहणी केली.त्यावेळी त्यांना चौघांचे मृतदेह आढळून आले.पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.
सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षण वर्गासाठी ३० जूनपर्यंत प्रवेश
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on JUN 23 , 2021 11 : 22 AM
WebTitle – Uttar Pradesh: 4 die after inhaling toxic gas released by cow dung cakes 2021-06-23