उत्तरप्रदेश : उत्तरप्रदेश ची निवडणूक मुख्यमंत्री अजयसिंह बिष्ट उर्फ योगी आदित्यनाथ यांच्यासाठी अस्तित्वाची आहे. उत्तरप्रदेशात मध्ये विधानसभा निवडणुकांच्या (UP Phase 1 Election 2022) पहिल्या फेजचे मतदान सुरु झाले आहे.आज सकाळी 11 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यात एकूण 20 टक्के लोकांनी मतदान केल्याची माहिती मिळत आहे.शामलीमध्ये सर्वाधिक 22.83 टक्के मतदान झाले, तर अलीगढमध्ये सर्वात कमी 17.91 टक्के मतदान झाले. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात एकूण 623 उमेदवार रिंगणात आहेत.यामध्ये भाजपचे ५८, बसपा ५८, काँग्रेस ५८, आम आदमी पार्टी ५४, राष्ट्रीय लोकदल २९, समाजवादी पक्ष २८, एआयएमआयएम १६, अपक्ष १७२ आणि अन्य १५० उमेदवारांचा समावेश आहे.अलिगडच्या खैर विधानसभेच्या धुमरा गावात ईव्हीएम बिघाडामुळे अनेक उशिरा मतदान थांबले आहे.
उत्तरप्रदेश निवडणूक 2022
मतदान सुरू झाल्यानंतर समाजवादी पक्षाने ट्विट करून अनेक केंद्रांवरील अनियमितता, मतदारांना धमकावणे, ईव्हीएममध्ये बिघाड आणि मतदार यादीत नाव नसल्यामुळे मतदान थांबवले जात असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.पक्षाकडून सांगण्यात आले आहे की, बुलंदशहर जिल्ह्यातील विधानसभेच्या सिकंदराबाद 64, एमएस इंटर कॉलेजमधील बूथ क्रमांक 227 मध्ये मतदान कक्षात अंधार आहे. मतदारांना मतदान करणे कठीण जात आहे. त्याचप्रमाणे शामली जिल्ह्यातील कैराना-8 विधानसभेच्या दुंदुखेडा गावातील बूथ क्रमांक 347,348,349,350 वर गरीब वर्गातील मतदारांना धमकावण्याचा आणि त्यांना रांगेतून परत पाठवल्याचा आरोप आहे.
समाजवादी पार्टीच्या ट्विटर हँडलवर असे सांगण्यात आले आहे की, मेरठ जिल्ह्यातील विधानसभा क्रमांक 26,
विधानसभा 48 येथे छोट्या स्लिपमुळे मतदार 2 तास रांगेत उभे आहेत.
मतदानाला परवानगी दिली जात नाही. याची दखल घेऊन निष्पक्ष मतदान व्हावे, अशी विनंती पक्षाने निवडणूक आयोगाला केली आहे.
पोलीस भाजप उमदेवाराच्या बाजूने काम करत आहेत
नोएडा-61 विधानसभेच्या बूथ क्रमांक 540 वर,पोलीस भाजप उमेदवाराच्या बाजूने काम करत असून पोलीस मतदारांना मतदान करू देत नाहीत.असा गंभीर आरोप यावेळी समाजवादी पार्टीने केला आहे.आयोगाने दखल घेऊन, तत्काळ कारवाई करून, आरोपी पोलिसांना हटवून निष्पक्ष आणि सुरळीत मतदान व्हावे.अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाला केली आहे.
बागपत जिल्ह्यातील एका बूथवर सकाळी अचानक वीजपुरवठा खंडित झाला.
यासह मतदान कर्मचारी टॉर्च च्या साहाय्याने मतदारांना मतदान करण्यास सांगत आहेत.
याबाबतही लोकांमध्ये नाराजी आहे. मेरठ जिल्ह्यातील 20 बूथवर मतदान सुरू झाल्यानंतर
काही वेळातच ईव्हीएममध्येही बिघाड झाला. प्रशासकीय अधिकारी ते दुरुस्त करण्यात व्यस्त आहेत.
कर्नाटक हिजाब विवाद सुरु असतानाच दुसरीकडे केरळ सरकारची हिजाब वर बंदी
Monginis controversial ad:कुत्र्याला फुलनदेवी नाव दिल्याने संताप
व्हॅलेंटाईन डे – मर्दानी लढवय्यी वीर सूपुत्री भीमाच्या लेकीला समर्पित
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 10, 2022 13: 12 PM
WebTitle – UP Phase 1 Election 2022 Live By 11 a.m. some people in kairana were accused of preventing them from voting