मुंबई – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची यंदा 129 वी जयंती असून सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करतात. त्यांच्या अनुयायांसाठी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ट्विटर इंडिया ने खास हॅशटॅग उपलब्ध करुन दिले आहेत.
ट्विटवर #ambedkarjayanti हॅशटॅग केल्यानंतर बाबासाहेबांची प्रतिकृती असलेलं इमोजी येईल. ट्विटर इंडिया ने याव्यतिरिक्त अजून चार हॅशटॅग दिले आहेत. ट्विटर इंडियानं आपल्या अधिकृत अकाउंटवरुन एक व्हिडिओ ट्वीट करुन याविषयी माहिती दिली आहे. ट्विटरने एकूण पाच हॅशटॅग तयार केले असून या पाचही हॅशटॅगनंतर ही इमोजी येणार आहे.
या पाच हॅशटॅगवर इमोजी
#AmbedkarJayanti
#अंबेडकरजयंती
#DalitHistoryMonth
#JaiBhim
#जयभीम
ट्विटरवर काहीही मांडायचं/सांगायचं असल्याचं हॅशटॅगचा वापर केला जातो. त्यामुळे नेमका कोणता ट्रेंड सुरु आहे हे देखील लक्षात येतं. तसंच हॅशटॅगमुळे सर्च करताना त्यासंबंधी सर्व गोष्टी सर्च करणंही सोपं जातं. या संपू्र्ण आठवड्यात हे हॅशटॅग वापरावे असं आवाहन ट्विटर इंडियानं केलं आहे.
एका वर्षी गुगलनं खास डूडल तयार करुन बाबासाहेबांना अभिवादन केलं होतं. ट्विटरने या हॅशटॅग इमोजीच्या माध्यमातून एकाप्रकारे बाबासाहेबांना अभिवादनच केलं आहे.
जयंती Live डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी थेट प्रक्षेपण
मुंबई, दि. 13 :- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती दिनी चैत्यभूमी येथील अभिवादन कार्यक्रमाचे Live थेट प्रक्षेपण सोशल मिडियाद्वारे करण्यात येणार आहे.
यूटयूब – https://www.youtube.com/channel/UCSfiUdOk9Gi2X8FZxoT4Znw,
फेसबूक – https://www.facebook.com/MyMumbaiMyBMC/,
व ट्विटर – https://twitter.com/mybmc याद्वारे अभिवादन कार्यक्रमाचे जयंती Live थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने कळविले आहे.
हे ही वाचा.. बाबासाहेब आणि धर्मांतर
हे ही वाचा.. संविधान समजून का घ्यायचे?
First Published on APRIL 01, 2021 15 : 54 PM
WebTitle – Twitter India launch unique hashtag and emoji on the occasion of Dr. Ambedkar’s birthday 2021-04-01