“तुकडे तुकडे गँँग” बद्दलची कोणतीही माहिती गृहमंत्रालयाकडे उपलब्ध नाही.आरटीआयच्या द्वारे झाला खुलासा.माजी पत्रकार आणि आरटीआय कार्यकर्ते साकेत गोखले यांनी आरटीआयद्वारे गृहमंत्रालयाकडून “तुकडे तुकडे गँँग ” बद्दलची माहिती मागवली होती,
यामध्ये “ टूकडे टूकडे गँँग ” कधी आणि कशी बनली? तिचे सदस्य कोण आहेत? असे प्रश्न विचारण्यात आले होते.
गृहमंत्रालयाने या प्रश्नांना उत्तर देताना “गृहमंत्रालयाकडे ‘टूकडे टूकडे गँँग” संदर्भातील कोणतीही माहिती उपलब्ध नाही” असे कळवले आहे.
यावर साकेत गोखले यांनी अमित शहांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे ट्विट करून सांगितले आहे.अमित शाह यांनी निवडणुकीच्या प्रचार रेेॅलीत “टूकडे टूकडे गँँग ” या शब्दप्रयोगाचा वारंवार वापर केला होता.त्यांना लोकांची दिशाभूल आणि फसवणूक केल्याबद्दल जनतेची माफी मागितली पाहिजे”
दरम्यान,देशातील मॉब लिंचिंगच्या विरोधात समाजसेवक,समाजसुधारक विचारवंत यांनी सरकारला दलित आणि अल्पसंख्यांक समाजाच्या विरोधातील अन्याय अत्याचाराच्या विरोधात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना खुले पत्र लिहून असे हिंसक अत्याचार तत्काळ थांबविण्याची विनंती करणारे पत्र लिहिल्यावर त्याला उत्तर म्हणून बॉलीवूडमधील काही कलाकार कंगणा राणावत,मधुर भांडारकर,प्रसून जोशी,विवेक अग्निहोत्री यांनीही पत्र लिहून समाजसेवक विचारवंत यांनाच जाब विचारला होता.
गृह मंत्रालयाच्या उत्तरानंतर साकेत गोखले आक्रमक झाले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानाबाबत ते निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहेत.
जाहीर सभेत ‘टुकडे-टुकडे गँग’ हा शब्दप्रयोग का केला, हे अमित शहा यांनी सांगायला हवे.
अन्यथा जनतेशी खोटे बोलले व जनतेची दिशाभूल केली म्हणून त्यांनी जाहीरपणे माफी मागायला हवी,अशी मागणी गोखले यांनी केली.
आर्यन खान ला घेऊन जाणारा गुप्तहेर आणि भाजपाचा कार्यकर्ता?
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो.. @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)