धर्म आणि समाज : धर्म आणि समाज यात परस्पर संबंध आणि पुढील धोके आपण या लेखात समजून घेणार आहोत.कोणत्याही धर्माचा विचार करता यातील अनेक स्थित्यंतरे आपल्याला दिसून येतात. भगवान येशूचा जन्म ज्यावेळी आशियात झाला. त्यावेळी रोमचे साम्राज्य वैभवात होते. अत्यंत निर्दयी रोम राजवट गुलाम, गरीब सामान्य जनता कोणाच्याही प्राणाची कदर करत नसे. भगवान येशूचा संदेश सेवेचा, दयेचा, प्रेमाचा होता मात्र हा त्रिसूत्री संदेश येशू बरोबरच सुळावर गेला,असे म्हणायला हरकत नाही.
जो ख्रिस्ती धर्म आपण पाहतो,तो देवपुत्र येशूचा धर्म नाही. तर तो मानवपुत्र सेंट पॉलने संघटित केलेला आहे. पाहिली तिन शतके रोमच्या साम्राज्यात ख्रिश्चनांचा खूप छळ झाला, यावर दुमत असण्याचे कारण नाही. पण पुढें बाराशे वर्ष जो छळ ख्रिश्चनांनी इतरांचा केला त्याचे प्रमाण कितीतरी अधिक होते.
ख्रिश्चन झालेला पहिला रोमन सम्राट कॉन्स्टटाईन होता. ईथे पहिल्यांदा ख्रिश्चन धर्म राज धर्म झाला. अर्थात चर्च व राजसत्ता एकत्र आल्याने पुढे जे घडले ते फार भयानक आहे. भगवान येशूचा प्रेमळ धर्म आता शास्त्र घेउन जगा समोर ऊभा राहिला. जणू ख्रिचन धर्माने जगाला घोषित केले की ‘डाव्या गालावर कुणी आघात केला तर उजवा गाल पुढे कर’ हा धर्म प्रत्येकाने मान्य केलाच पाहिजे. हे मान्य न करणाऱ्याला गळा कापून ठार करण्यात येईल.!
ख्रिस्ती धर्माचा वरवंटा
खांद्यावर बंदुका घेऊन सेवेचं महत्व पटवून देण्याचा उद्योग जगात अनेकदा झाला आहे. त्या पैकीच हा एक उद्योग.!
इ.स ३४६ कॉन्स्टटाईनने अशी आज्ञा केली की, रोमच्या साम्राज्यात ख्रिश्चन धर्माखेरीज इतर सर्व धर्म बंद करण्यात आले आहेत.इतर धर्मांवर श्रद्धा ठेवणे इतर धर्मांची पूजागृहे चालु ठेवणे हा प्राण दंडाचा गुन्हा मानण्यात आला. तलवारीच्या जोरावर परंपरेने चालत आलेले सर्व धर्म पंथ नष्ट करुन टाकून ख्रिस्ती धर्माचा एकच वरवंटा युरोपवरून पुढें दोनशे वर्ष फिरविण्यात आला.
इ.सनाच्या सहाव्या शतकापर्यंत सगळा युरोप ख्रिस्ती धर्मासाठी सपाट करण्यात आलेला होता. चर्च ने युरोपात राज्यांच्या साहाय्याने जी गुलामगिरी निर्माण केली, तिला तोड नव्हती. सामान्य माणूस भुदास होता. म्हणजे जमिनीचा गुलाम होता सगळे शिक्षण चर्च च्या हाती होते. त्यामुळे धर्माला मान्य नसणारा कोणताही विचार युरोपात उगवणे शक्य नव्हते. पाखंड करणाऱ्यांना पोपणे मृत्यु दंडाची शिक्षा दिलेल्या आहेत. अनेक विद्वान याचे बळी ठरले. १२५२ सालचा पोपचा जाहीरनामा हा तर धर्माने केलेला कहरच होता.
शंभर वर्षात जगाचा एक तृतीयांश भाग मुस्लिमांनी इस्लाममय करून टाकला
धर्मांध झालेले चर्च /सत्ताधीश युरोपासोबत सार जग ख्रिचन धर्माने व्यापून टाकावे हि भावना बाळगून आशिया कडे वळले.
मात्र याच काळात एक नवा धर्म सातव्या शतकाच्या आरंभी अरबस्थानच्या वाळवंटात जन्माला आला.
या धर्माचा प्रेषित महम्मद पैगंबर होता. शांततेशी कसलाच संबंध नसणारा हा धर्म ‘इस्लाम’ (म्हणजे शांतता) या नावाने ओळखला जातो!
ख्रिस्ती धर्मात निदान चर्च आणि राजसत्ता निराळी होती. इस्लामने खलिफात राजसत्ता व धर्मसत्ता एकत्र आणली.
ज्या धर्माच्या प्रेषिताने अन्याय सहन करत सुळावर जाणे पत्करले,त्या धर्माचे अनुयायी सर्वांनाच सुळावर देत सुटले होते.
मग इथे तर प्रेषितानेच तलवार हातात घेतली होती! इस्लामचा विजय नेत्रदिपक होता.
प्रेषिताने धर्मरक्षणार्थ इ.स.६२३ ला तलवार हाती घेतली. पुढच्या ७० वर्षात त्याच्या अनुयायांनी उत्तर आफ्रिका, आणि मध्य आशिया हा भाग व्यापून टाकला पुढें शंभर वर्षात जगाचा एक तृतीयांश भाग मुस्लिमांनी इस्लाममय करून टाकला .आल्पस च्या टेकड्या फ्रान्स ची मैदानेच रक्ताने रंगावी असा काही निसर्गाचा नियम नव्हता. वाळवंटात त्याच तोला मोलाचं रक्त सांडू शकते हे इस्लामने जगाला दाखऊन दिले. आणि सर्व विरोधी धर्मपरंपरांचा विध्वंस कसा करावा,ही शिकवण इस्लामने ख्रिचनांकडून घेतली होती.
फ्यूडलिझम
इस्लामचा भारतावर पहिला हल्ला ६३७ लाच झाला होता ह्यात त्यांचा पराभव झाला होता. कारण ख्रिचन फौजा इस्लामी भूमीवर घुसण्याचा धोका होता. म्हणुन त्याचं लक्ष आशियायी युरोप कडे वळले. इ सनाच्या सातव्या शतकाच्या मध्यापासून ‘सेवामार्गवाले ‘ ख्रिचन आणि ‘शांततावाले ‘ मुसलमान यांनी पूढे ७५० वर्ष परस्परांच्या अव्याहत कत्तली करून दाखवल्या. त्यांना इतरत्र कुठेही तोड सापडणे कठीण आहे. हा जो प्रदीर्घ संघर्ष चालु होता, त्याचे परिणाम दोन्ही संस्कृतीवर मूलगामी झाला.
यादरम्यान अंतर्गत कलहनिर्माण झाले. अरब मागे पडून त्यांच्याहून कडवट असे तुर्क पूढे आले. ख्रिचनांन सोबत युद्ध सुरु असले तरी मुस्लिमांमध्ये अंतर्गत कलह मोठ्या प्रमाणात सुरू होता. यातून १२५८ ला अरबांचा पुर्ण पाडाव झाला. आणि इस्लामी जगाचे नेतृत्व तूर्कांच्या हाती आले. त्यात मंगोलांची भर पडली व ख्रिचन विरोधी लढा जोमाने सुरू राहिला शेवटीं इ . स १४५८ ला कोंन्स्टाटीनोपलचा पराभव झाला व बायझन्टटायन साम्राज्य संपुष्टात आले. या धर्मांच्या लढाईतून अनेक विचार, पैलू पूढे आले. धर्माच्या बाजूने निष्ठेने लढावे म्हणुन युरोपात चर्चने आपल्या जमिनी सैनिकांना बहाल केल्या..
यातूनच पूढे #फ्यूडलिझमचा उदय झाला असे म्हणू शकतो. सदर युद्धाला सैनिक, जनता, राजा हे सर्व कंटाळून गेले होते. शेवटीं ख्रिचनांचा पराभव झाला. आणि विराम मिळाला. पूढे अनेक विचारवंत पलायन करू लागले धर्मांची बंधने कमी झाल्याने.. अनेक शोध सुरु झाले. नवीन विचार प्रवाह निर्माण झाले याच दरम्यान #सेक्युलरझिम ‘ नावाचा प्रकार जगाला कळाला. प्रचलित मार्ग बंद झाल्यामुळे आशियात घुसने ख्रिचनांना शक्य होईना.. यातूनच समुद्र मार्गांना उत्तेजन मिळाले. यातून आनेक नवी ठिकाणे किँवा जगाची व्याप्ती कळू लागली…
धर्म आणि समाज : अन भारत
भारतात ही फारसे वेगळे चित्र नव्हते..शेवटचा बौध्द राजा याचा खून पुष्यमित्र शुंग नावाच्या सनातनी धर्माच्या अनुयायाने केला.
पूढे.. बौध्द भिक्षुंच्या लाखो कत्तली झाल्या लेण्यांवर अतिक्रमणे झाली विद्यापीठे केंद्र मठ उध्वस्त करण्यात आले.
हे क्रमशःघडत होते. बौध्द भिखु इतरत्र पलायन करण्यास विवश झाले.
पूढे १९ वे शतक सुरु आणि ह्या धार्मिक लढाया थांबल्या…राष्ट्र प्रेम, सर्व धर्म समभाव धोरण, धर्म निरपेक्षता वाढीस लागली..
पूढे १०० वर्षात जगाने जी काही वैज्ञानिक प्रगती साधली त्याचे श्रेय जी शांतता निर्माण झाली तिला जाते.
लहान लहान राष्ट्रे आत्मनिर्भर बनली विकसित झाली.
मात्र पुन्हा २१ वे शतक हे भयंकर असेल असे संकेत मिळायला सुरुवात झाली आहे.
युरोपात अनेक राष्ट्रांच्या विचार धारा प्रतिगामी बनल्या आहेत त्यातुन प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.इस्लामी राष्ट्र देखिल आघाडीवर आहेत.
भारतही लोकशाहीच्या अखेरच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे असे दिसत आहे.
या सर्व धोक्यांसाठी सामान्य नागरिकांनी तयार राहावे..
कारण इतिहासात पाहिल्यास धर्माच्या लढ्यात मरणारे दोन्ही कडील लाखो करोडो कोन आहेत…?
याचा विचार व्हावा धर्मांध आग सर्वच भस्मसात करत आली आहे हा इतिहास आहे.
अशोक जगताप
इतिहास अभ्यासक
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 10,2023 | 13:07 PM
WebTitle – There should be no radical religious policies