काही दिवसांपूर्वी (1 ऑक्टोबरला) बरेलीच्या एका न्यायालयाने लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात एका मुस्लिम युवकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आपल्या निर्णयात न्यायाधीशांनी टिप्पणी केली की हे लव्ह जिहाद चे प्रकरण आहे आणि पोलिसांना हा मुद्दा त्या स्वरूपात मांडण्यात अपयश आले आहे.
या प्रकरणात मुलगी हिंदू होती. खटल्याच्या कार्यवाहीदरम्यान मुलीने आपली तक्रार मागे घेतली होती, असे म्हणत की हिंदुत्ववादी संघटनांच्या दबावामुळे तिला खोटी तक्रार दाखल करावी लागली. परंतु न्यायाधीशांनी या गोष्टींकडे दुर्लक्ष केले. कदाचित त्यांच्या निर्णयावर समाजात चालत असलेल्या प्रोपगंडाचा प्रभाव असू शकतो.
न्यायाधीश दिवाकर यांनी त्यांच्या निर्णयात एक विचित्र टिप्पणी केली की, “मुस्लिम पुरुष हिंदू महिलांशी लग्न करण्याच्या उद्देशाने त्यांना लक्ष्य करतात.”
निर्णयात पुढे असे म्हटले:
“संपूर्णतः, मुस्लिम पुरुष गैर-मुस्लिम समुदायातील महिलांवर प्रेमाचा दिखावा करून त्यांच्याशी विवाह करतात आणि त्यांचे धर्मांतर करतात, आणि हाच लव्ह जिहाद आहे. एक विशिष्ट धर्माचे असामाजिक घटक लव्ह जिहादच्या माध्यमातून बेकायदेशीर धर्मांतर करतात. हे सर्व करण्यासाठी त्यांना कोणीतरी निर्देश देत असते किंवा ते स्वतः ही तसा कट रचतात. लव्ह जिहादसाठी मोठ्या प्रमाणावर धनाची आवश्यकता असते. म्हणूनच असे म्हणता येणार नाही की यासाठी विदेशी धनाचा वापर होत नाही.”
लव्ह जिहादसाठी विदेशी धनाचा वापर हा एक नवीन मुद्दा आहे.
चांगले झाले असते की न्यायाधीशांनी हे देखील सांगितले असते की हे धन कोणत्या देशातून येत आहे.
लव्ह जिहादसंदर्भातला प्रोपगंडा, जिहाद सीरीजचा पहिला भाग होता. आता विविध प्रकारच्या जिहादांच्या चर्चा सर्वत्र सामान्य झाल्या आहेत.
त्यात लव्ह जिहादशिवाय यूपीएससी जिहाद, फ्लड जिहाद, कोरोना जिहाद यांचा समावेश आहे.
काही कठोर साम्प्रदायिक अँकरांना जिहादांची यादी वाढवण्यात प्रावीण्य मिळाले आहे.
ते मुसलमानांना कोणत्याही गोष्टीशी जोडण्याचे कसब ठेवतात. ते पुर असो किंवा कोणतीही रोगराई.
हे लहान-सहान मुद्द्यांना ताणून एक असा धार्मिक समुदाय जो ‘विदेशी’ म्हटला जातो, त्याचे दानवीकरण करण्याचा प्रयत्न आहे.
हा समुदाय ‘परका’ आणि ‘शत्रू’ म्हणून दाखवला जातो आणि त्यावर खुलेआम तसेच गुपचूप हल्ले केले जातात.
हा ‘परका’ आणि ‘शत्रू’ हा दृष्टीकोन साम्प्रदायिक राजकारण आणि हिंदू राष्ट्रवादी राजकारणाच्या मुळात आहे, ज्याचे सध्या भारतीय समाजात प्राबल्य आहे.
लव्ह जिहाद संबंधी प्रोपगंडा फार जुना नाही. काही दशकांपूर्वी केरळच्या काही ख्रिश्चन बिशपांनी हा मिथ्या आरोप पहिल्यांदा लावला
आणि लवकरच तो हिंदू राष्ट्रवाद्यांनी मोठ्या प्रमाणावर पसरवायला सुरुवात केली.
शाखा, शाखेत चालणाऱ्या शाळा, मीडिया, सोशल मीडिया आणि आयटी सेल्समुळे आरएसएसची प्रोपगंडा पसरवण्याची क्षमता खूप जास्त आहे.
तपासानंतर असे आढळले की हिंदू मुलींना फसवण्यासाठी मुस्लिम युवकांना पैसा पुरवणारी कोणतीही संघटना अस्तित्वात नाही.
लव्ह जिहादचे उद्दिष्ट काय आहे, याबाबत अनेक प्रकारचे दावे केले जातात.
पहिला दावा म्हणजे देशातील जनसंख्येत विविध धर्मांच्या प्रमाणात बदल घडवणे.
आतापर्यंत जो मोठ्या प्रमाणावर प्रोपगंडा केला जात होता तो असा होता की
मुसलमानांची ‘चार बायका आणि चाळीस मुले’ असतात आणि लवकरच त्यांची लोकसंख्या हिंदूंहून जास्त होईल.
आता लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू मुलींचे धर्मांतर आणि मुलांचा जन्म होणे या गोष्टींमध्ये आणखी जोडले गेले आहे.
यामध्ये आता हे देखील सांगितले जात आहे की या मुलींना इस्लामिक स्टेटच्या लढाईत सामील करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते.
लव्ह जिहादच्या प्रोपगंडाचा मुख्य पैलू म्हणजे त्याचा पितृसत्ताक मूल्यांशी असलेला संबंध. पितृसत्ताकता आणि धर्माधारित राष्ट्रवाद यांचा अतूट संबंध आहे.
देशात साम्प्रदायिक राजकारण जोरात असताना महिलांवर अत्याचार आणि बलात्काराच्या घटना वाढत आहेत.
तीस्ता सेतलवाड यांच्या मते, “ज्या समुदायांना हल्ल्यांचे लक्ष्य केले जाते, त्यांच्या महिलांना त्या समुदायाच्या ‘सन्मानाचे प्रतीक’ मानले जाते आणि त्यांच्यावर विशेषतः द्वेष आणि हिंसेचे आक्रमण होते.”
आम्ही हे विभाजनाच्या काळातील हिंसाचारात 1946-47 मध्ये, आसामच्या नेल्लीमध्ये 1983 मध्ये, दिल्लीमध्ये 1984 मध्ये, मुंबईमध्ये 1992-93 मध्ये आणि गुजरातमध्ये 2002 मध्ये पाहिले. अलीकडे 2023 मध्ये मणिपूरमध्येही हेच दिसले. यामागील कारणे समाजशास्त्रीय, ऐतिहासिक आणि विचारसरणीशी संबंधित आहेत.
आपल्याला नेहमी लक्षात ठेवायला हवे की भाजपा ह्या पक्षावर त्याच्या विचारसरणीच्या संस्थात्मक बळावर, म्हणजे आरएसएस आणि हिंदू महासभेचे नियंत्रण आहे, जी अतिशय दक्षिणपंथी संघटना आहेत. ते धर्माचे सैनिकीकरण करू इच्छितात आणि स्त्रियांच्या लैंगिकतेवर नियंत्रण ठेवू इच्छितात.”
हिंदू राष्ट्रवादाच्या शीर्षस्थ विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांनी छत्रपती शिवरायांच्या एका निर्णयाची निंदा केली होती, हे येथे उल्लेखनीय आहे.
छत्रपती शिवरायांच्या सैन्याने लूट करताना कल्याणच्या मुस्लिम गव्हर्नरच्या सुनेला पकडले होते.
तीला छत्रपती शिवरायांसमोर हजर करण्यात आले तेव्हा शिवरायांनी तिला सन्मानाने परत पाठवण्याचा आदेश दिला.
सावरकरांनी तिच्यावर सूड न घेता तिला परत पाठवण्याच्या शिवरायांच्या निर्णयाची टीका केली होती.
लव्ह जिहादच्या वाढत्या गदारोळाच्या दरम्यान इतिहासकार चारू गुप्ता म्हणतात की, हा स्त्रियांच्या जीवनावर नियंत्रण ठेवण्याचा एक उपाय आहे. “हिंदू दक्षिणपंथ्यांच्या या खोट्या दाव्याला की लव्ह जिहाद नावाचा एक संघटना आहे जो हिंदू महिलांना इस्लाम स्वीकारायला भाग पाडतो, हे 1920 च्या दशकात झालेल्या अपहरणांच्या प्रकरणांसारखेच आहे. 1920 असो किंवा 2009, हिंदू पितृसत्ताक दृष्टीकोन याच प्रचाराशी घट्ट जोडलेला आहे. मुस्लिमांकडून त्रास सहन करणाऱ्या असहाय हिंदू महिलांची प्रतिमा मोठ्या प्रमाणावर दाखवली जाते आणि महिलांच्या स्वतःच्या निर्णयाचे अधिकार नाकारले जातात.”
हे लक्षात घेऊनच बजरंग दल राखीव बांधणीच्या प्रसंगी अभिभावकांना त्यांच्या मुलींवर नजर ठेवण्याची विनंती करताना दिसतात.
या प्रचाराचा प्रभाव समाजातील विविध स्तरांवर होत आहे.
मुस्लिम युवकांवर होणारे हल्ले याच प्रचाराचा परिणाम आहेत. प्रियंका टोडी आणि रिजवान खानच्या प्रकरणात रिजवान खानच्या दु:खद मृत्यूने शेवट झाला. अनेक वेळा त्याचे उलटेही होते, जसे की अंकित भंडारीची हत्या एका मुस्लिम मुलीच्या नातेवाईकांनी केली जीच्यावर तो प्रेम करीत होता.
हादियाच्या प्रकरणात, जिचे आधी नाव अखिला अरूणा होते, धर्मपरिवर्तन करून तिने इस्लाम स्वीकारला होता.
तिच्या मुस्लिम मित्रांशी झालेल्या चर्चेच्या प्रभावामुळे तिने इस्लाम स्वीकारला. त्यानंतर तिने शफीक जहांशी विवाह केला.
तिचे ब्रेन वॉश झाले आहे आणि तिला आयसिसमध्ये सहभागी केले जाईल.असे कारण वडिलांनी न्यायालयात सांगितल्याने न्यायालयाने तिचा ताबा वडिलांकडे दिला होता मात्र मुलीने याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील केले आणि त्यानंतर तिला तिच्या पतीसह राहण्याचे हक्क पुन्हा मिळाले.
केरळमध्ये अशी अनेक योग केंद्रे उघडली गेली आहेत, जी मुस्लिमांशी लग्न करू इच्छिणाऱ्या हिंदू मुलींना त्यांचा निर्णय बदलण्यासाठी आणि पुन्हा हिंदू धर्म स्वीकारण्यासाठी राजी करतात. अनेक मुलींनी या केंद्रात जोर-जबरदस्ती आणि ब्लॅकमेलिंगचा आरोप केला आहे.
(अमरीश हर्देनिया यांचा इंग्रजीतून रूपांतरित केलेला लेख. लेखक आयआयटी मुंबई येथे अध्यापन करतात आणि 2007 साठी नेशनल कम्यूनल हार्मोनी अवॉर्ड (राष्ट्रीय सांप्रदायिक सद्भावना पुरस्कार) प्राप्तकर्ता आहेत)
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 13,2024 | 15:55 PM
WebTitle – The Wall of Religion in the Way of Love: Love Jihad