राजस्थान:राजस्थानमधील बाडमेरमध्ये मंगळवारी एक दलित नवरदेव आपल्या वधूसह सासरच्या घरी हेलिकॉप्टर ने पोहोचला (वर वधू हेलिकॉप्टरने आले) आणि त्याला पाहण्यासाठी शेकडो लोक जमले.वराने सांगितले की, त्याच्या कुटुंबीयांची इच्छा आहे की त्याने आपल्या वधूला हेलिकॉप्टरने सासरच्या घरी आणावे.आजची तरुणाई आपले लग्न अशा प्रकारे संस्मरणीय बनवते की ते आयुष्यभर लक्षात राहील आणि इतरांसाठीही तो चर्चेचा विषय बनतो.राजस्थान मध्ये जरा आणखी वेगळी परिस्थिती आहे. इथे जातीयवादाने टोक गाठलेले दिसून येते.जर दलित समाजातील लग्न असेल तर नवरदेवास घोड्यावर बसून वरात आणण्याची मुभा दिली जात नाही,इतर तथाकथित उच्चजातीय मूर्ख लोकांना हा त्यांचा अपमान वाटतो.त्यावरून खून पाडले जातात,यामुळे दलित नवरदेवास पोलिस संरक्षणात वरात काढावी लागते,मात्र आता दलित समाजातील लोकांचा स्वाभिमान आणि धैर्य वाढलं आहे.आता ते थेट हेलिकॉप्टरने येत आहेत.
दलित नवरदेव आपल्या वधूसह थेट हेलिकॉप्टर ने
बाडमेर येथील रहिवासी तरुण मेघवालचे काल रात्री सीमेजवळील गावातील धिया नावाच्या मुलीशी लग्न झाले होते.
आपल्या डॉक्टर मुलाच्या लग्नात काहीतरी वेगळे व्हावे, अशी वराच्या आईची इच्छा होती.
त्यामुळे घरच्यांनी सुनेला सासरी आणण्यासाठी हेलिकॉप्टर बुक केले.
मंगळवारी सकाळी दोघेही हेलिकॉप्टरने बाडमेर ला पोहोचणार होते,
मात्र अचानक नियोजित हेलिकॉप्टर कंपनीने हे भाडे नाकारत येण्यास नकार दिला.
त्यानंतर वर पित्याने हार न मानता दुसऱ्या कंपनीला तब्बल एक लाख एक्स्ट्रा मोजत शेवटी हेलिकॉप्टर बुक करून सुनेला त्यातूनच आणले.
मंगल गीताने स्वागत आणि पुष्पहार घालून हेलिकॉप्टरमधून खाली उतरलं नव दाम्पत्य
अगोदरच्या नियोजित कंपनीने नकार दिल्यानंतर कुटुंबाला दुसऱ्या कंपनीचे हेलिकॉप्टर मिळाले आणि दोघांनाही सीमावर्ती गावातून टेकऑफ करून बाडमेर शहरात उतरवले. सकाळपासून कुटुंबीय दोघांची वाट पाहत होते आणि अखेर प्रतीक्षा संपली, मंगल गीत गात व पुष्पहार घालून स्वागत करत कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी दोघांनाही हेलिकॉप्टरमधून खाली उतरवले गेले.
तरुण मेघवाल यांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा होती की त्यांनी आपल्या नववधूला हेलिकॉप्टरने आपल्या घरी आणावे.
त्यामुळेच त्यांच्या वडिलांनी हेलिकॉप्टर बुक केले. मात्र सकाळी अचानक हेलिकॉप्टर कंपनीने नाकारले.
त्यानंतर दुसरे हेलिकॉप्टर बोलावण्यात आले आणि आज मी माझ्या वधूसह येथे पोहोचलो तेव्हा लोकांनी माझे स्वागत केले.त्या सर्वांचा मी ऋणी आहे. माझ्या कुटुंबाचे एक स्वप्न होते जे पूर्ण झाले आहे. त्याचवेळी वधू धिया म्हणाली, माझ्या सासूबाईंची इच्छा होती की, मी लग्न करून येईन तेव्हा हेलिकॉप्टरने यावे. आणि आज त्याची इच्छा पूर्ण झाली आहे.” त्याचवेळी दुपारी तीनच्या सुमारास वधू-वरांसह हेलिकॉप्टर उतरले तेव्हा लोकांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
IMDb वर्षातील सर्वाधिक लोकप्रिय 10 चित्रपटांमध्ये जयभीम ला स्थान
जयभीम चित्रपट:नोंदवला आणखी एक विक्रम आंतरराष्ट्रीय सन्मान
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
जय भीम सिनेमा :व्यवस्थेने दिलेल्या यातनांचा वास्तवदर्शी थरारक अनुभव
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 15, 2021 22:28 PM
WebTitle – the-mothers-wish-the-bride-was-brought-by-helicopter-to-the-groom-of-the-dalit-community-in-rajasthan