रोहित सरदाना यांना कोरोनाची लागण झाली होती,त्यावर उपचार सुरू होते अशातच त्यांना हृदयविकाराचा झटका येवून मृत्यू झाल्याची घटना काल खूप वेगवेगळ्या प्रश्नांना जन्म देऊन गेली. रोहित सरदाना हा न्यूज चॅनल अँकर होता. पत्रकारांच्या व्याख्येत न बसणारा. मध्यंतरी या न्यूज चॅनल अँकरना प्रेस्टीट्यूट नावाचा शब्दप्रयोग केला जात होता. तो कदाचित योग्यच असावा अशी रोहितची ख्याती होती.
गौरी लंकेशसारख्या सामाजिक कार्यकर्तीला अर्वाच्य भाषेत बोलणे असो किंवा हिंदू मुस्लिम सौहार्द विरोधी वादविवाद कार्यक्रम करणे असो यात तो दंगल घडवून आणण्यात पटाईत होता. आणि मुख्य म्हणजे तो न्यूज चॅनल अँकर होण्याआधी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून काम करत होता. ABVP म्हणजेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही भारतीय जनता पक्षाची विद्यार्थी चळवळ शाखा आहे. पर्यायाने ABVP संघप्रणित विद्यार्थी संघटना आहे. आता जो व्यक्ती संघप्रणित संघटनेतून आला आहे आणि संघाच्या भारतीय जनता पक्षाचे सरकार असेल तर तो निष्पक्ष पत्रकारिता करेल (सॉरी न्यूज अँकरींग) का?
लोकांनी चांगले लिहीले कमी उलट दलाल पत्रकार मेला
दुसरी गोष्ट म्हणजे रोहित सरदानाचा काल मृत्यू झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याबद्दल लोकांनी चांगले लिहीले कमी उलट दलाल पत्रकार मेला अशाच प्रकारची वक्तव्ये केली गेली होती. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या इमेजचे हे डॅमेज होते. इलेक्ट्रॉनिक मीडियाचे असे डॅमेज होण्याची ही पहिलीच घटना नाही. २००० च्या नोटेत चीप असणे, भडकाऊ वक्तव्ये करणे, तटस्थ भूमिका न घेता सरकार समर्थक असणे अशा अनेक गोष्टी न्यूजवाले करत आहेत. हे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी रोहित सरदानाचे त्याच्या लहान मुलांसोबत असलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले गेले. असे फोटो व्हायरल करुन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच्या मुलांबद्दल सहानुभूती आहे पण असा प्रयत्न पहिल्यांदाच झाला असेही नाही. नोटबंदीचे समर्थन करताना आणि प्रधानमंत्र्याच्या इमेज डॅमेज कंट्रोलसाठी त्यांच्या आईला नोटा बदलण्याच्या रांगेत उभं केलं गेलं होतं. तो पण इमेज डॅमेज कंट्रोलचाच भाग होता.
सरकारने मदत का करावी हे रवीश कुमारांनी स्पष्ट करावे.
रोहित सरदानाच्या मृत्यू झाल्यानंतर कहर म्हणजे रवीश कुमारने ५ कोटी रुपये त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली. रवीश कुमार संयत पत्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांना मॅगेसेसे पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी अशी मागणी करणे गरजेचे होते का? कोरोनामुळे अनेकजण मरण पावले. जर रोहितच्या कुटुंबातील सदस्यांना पाच कोटी देणार असतील तर इतर मरण पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना पण अशी मदत देण्यात आली पाहिजे. रोहित सरदाना न्यूज चॅनल अँकर आहे म्हणून त्याला वेगळा न्याय आणि सर्वसामान्य जनतेला वेगळा न्याय का? रवीश कुमारची ही पाच कोटी रुपये रोहितच्या कुटुंबातील सदस्यांना देण्याविषयीची भूमिका आश्चर्यकारक आहे.
जर रवीश कुमार पत्रकार म्हणून सरकारकडे अशा प्रकारच्या मदतीची अपेक्षा करत असेल तर
अखिल भारतीय पत्रकार संघटना, टिव्ही न्यूज अँकर लोकांनी वर्गणी काढून मदत करावी.
यासाठी जनतेच्या पैशातून मदत करणे हा चुकीचा पायंडा पाडला जाईल.
तसेही रोहित सरदाना एका खासगी न्यूज चॅनलचा अँकर होता त्यासाठी सरकारने मदत का करावी हे रवीश कुमारांनी स्पष्ट करावे.
शेवटी एक सांगावे वाटते की भारतीय मिडीया मग ती प्रिंट मिडीया असो, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो किंवा सोशल मीडिया असो
या सर्वांनी तटस्थ भूमिका घेऊन बातम्या देणे परदेशातील न्यूज चॅनल, वर्तमान पत्रे, अथवा तिकडच्या वेबसाइटकडून शिकावे.
भाजप म्हणजे देश नव्हे आणि मोदी म्हणजे तुमचा बाप नव्हे हे लक्षात ठेवावे तरच उरलीसुरली इज्जत राहील.
नाहीतर तुम्ही लोक २०१४ पासून प्रेस्टीट्यूट होता आणि अजून पण आहात हे तर जगजाहीर आहेच, नाही का?
हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on MAY 01, 2021 14: 00 PM
WebTitle – The incident of Rohit Sardana’s death yesterday raised many different questions 2021-05-01