हावरट स्पर्श!!
वयात येणाऱ्या मुला-मुलींच्या शारीरिक उत्सुकते विषयी…
हल्लीच्या काळात तरुण-तरुणी अथवा लहान वयातील मुला-मुलींविषयीच्या अस्वस्थ करणाऱ्या घटना जास्त प्रमाणात ऐकावयास मिळतात. महाविद्यालयातील छेड़छाड़ प्रकरणे, अश्लील भाषेचा अतिवापर , अतिप्रसंग, बलात्कार या घटना यात घडत असतात. या घटना घडण्यास सद्धयाचे वातावरणच जबाबदार असल्याचे वाटते. टीवी प्रसारमाध्यमे ,इंटरनेट , सोशल मिडिया यांसारख्या क्रांत्यांनी या वातावरणास गढूळ करण्यास मदत केली त्याचप्रमाणे काही प्रमाणात आपल्यासारख्यांची अथवा पालकांची देखील यात चूक आहेच!
मोबाइल हे साधन प्रत्येकाला वेड लावणारं. जेवढ्या कामासाठी च्या फायद्याच्या गोष्टी या मोबाइलद्वारे करता आल्या त्याहिपेक्षा जास्त याचा वापर नको त्या गोष्टी चोरी छुपके करण्यासाठी होतोय. अगदी कोवळ्या वयाच्या पोरांकडे पालकांनी मोबाइल हातात दिले. भलेही ते अभ्यासाच्या दृष्टीने इंटरनेटचा वापर करण्यासाठी का असेनात पण त्यामुळेच सुरुवात झाली ती घडणाऱ्यांनी बिघडण्याची. आजकाल च्या फॉरवर्ड मातापित्यांनी अभ्यासाच्या दृष्टीने अथवा काहींनी मुलांच्या हट्टापायी त्यांच्या हाती मोबाईल सोपवले. मग त्यातूनच इंटरनेटचा वापर सुरु झाला.
हावरट स्पर्श
अभ्यासाची माहीती घेता घेता वेबसाईटवर “तसल्या” काही लिंक्स् ची हालचाल स्क्रीनवर होताना दिसते, टीवी-चित्रपटाच्या काही सीन्समुळे किंवा काही ऐकिवात असल्यामुळे “तसलं” काही पाहण्याची इच्छा होते आणि बघता बघता त्या “लिंक्स” वर क्लिक करुण पाहिल्या जाते. उत्सुकतेमुळे स्वाभाविकच हळूहळू पोर्न पाहन्यासाठीच्या हालचाली सुरु होतात. पोर्न वीडियो बघितल्या जातात त्यात ही मुले-मूली हरखुन जातात , घाबरतात,कीळस करतात, एन्जॉय करता करता मित्र-मैत्रिणींना सांगतात,चर्चा करतात. पुढे सर्व मिळूनही बघतात आणि असचं हे चक्र सुरु झालेलं असतं…
हे सगळं घडत असताना कुठेतरी योग्य संवाद कमी पडतो. कुणी योग्यतेची शिकवण देणारं नसतं. बालवयातील असल्या अनेक घटनांमुळे विरूद्ध लिंगी आकर्षण निर्माण होते. तुम्ही बघितलंच असेल की शहरी महाविद्यालयांमधे येणाऱ्या मुला-मुलींपैकी २५-३०% मुले-मूली सोडले तर ११ वी मधे प्रवेश घेतलेल्या मुलींचा मेकअप , ड्रेसिंग थक्क करणारे असते. बऱ्याचवेळा तर अंगकौशल्य दाखविल्या जाते. यातीलच जास्त प्रमाणात मुले-मूली विरूद्ध लिंगी आकर्षणाने भारावलेले असतात. यांच्यातील संवाद सुद्धा मोबाइलवर येणाऱ्या “तसल्या” वाल्या मेसेज संधर्भातील असतो किंवा मग “त्याने” काल काय पाठवले, “ती” चा कालचा डीपी ऐसा होता, त्या ग्रुपवर “तसा” फ़ोटो आला होता यांसारख्या चावट , अश्लील , चेकाळता येण्यासारखं गोष्टीवर आधारीत असा असतो.
लहान वयातच मोठ्या चुका
उभरत्या उनाड वयातच विरुद्ध लिंगी आकर्षणामुळे गर्लफ्रेंड – बॉयफ्रेंड बनविल्या जातात. याला “प्रेम” हे नाव दिल्या जातं पण मुळात ते एक विरुद्ध लिंगी आकर्षणच असतं. फक्त आणि फक्त एक हावरट स्पर्शाच्या वृत्तीचा हा एक भागच असतो. या प्रेमीयुगुलांमधे दुनियेला चोरून-लपुन तिच्या अथवा त्याच्या हातात हाथ घालून बसण्याची , तिच्या-त्याच्या खांद्यावर डोके ठेवण्याची, आलिंगन घेण्याची, किस करण्याची ओढ लागते आणि अनावर होणाऱ्या हावरट स्पर्शाचा हां खेळ सुरु होऊन जातो…..!!
हावरट स्पर्श!!
कॉलेज अथवा लोकांची ये-जा असणाऱ्या ठिकाणी प्रेमीयुगुलांच्या या हावरट स्पर्शाला थोड़ा सामना करावा लागतो. त्यातूनच उपाय म्हणून दाट फांद्यांची झाडे, सुनसान आडगळी ,बंद चारचाकी गाडी,बंद घरे, सुनसान पार्किंग प्लेस शोधली जातात आणि त्यादिशेने युगुलांचा शिरकाव होतो.काही वेळा तर पोर्नोग्राफी,मोबाइल,अंगप्रदर्शित सिनेमे पाहुन चेकाळलेले हे नवतरुण-तरुणी शरीर वासनेच्या सुखासाठी पुढचे पाऊल उचलतात आणि लहान वयातच मोठ्या चुका पदरी पाडून घेतात.आजकालच्या युवक-युवतिंकडे निरोधक साधने सापडण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. आता याला “निदान काळजी तरी घेतात” म्हणून चांगले समजावे की चिंता करावी हे प्रश्नचिन्हच!
लैंगिक शिक्षण
एकंदरित या सर्व चक्रात पालक-शिक्षक यांचा मोठा संबंध, रोल येऊ शकतो.
लहान वयातच मुला-मुलींच्या हाती मोबाइल फोन सोपवून त्यांच्यावर माया केली जाते.यामधे पालकांनी नियमित मोबाइलची तपासणी का करू नये ? फेसबुक-व्हाट्सअप अथवा ब्राउज केलेल्याची तपासणी करायला पाहिजे का ? मित्र-मैत्रीण यांच्याशी होणाऱ्या चॅटींग देखील तपासल्या जायला पाहिजे की नाही ?? महाविद्यालयात जाणाऱ्या मुला-मुलींच्या दप्तरांवर सुद्धा नजर ठेवण्यात काय वावगे आहे ?? असल्या अनेक प्रश्नांची उत्तरं कदाचित एक पालक च योग्यरित्या देऊन ते आंमलात आणु शकतो. लैंगिक शिक्षणा
आपल्या पाल्यांना मित्र-मैत्रिणींसारखे वागवणाऱ्या पालकांनी लैंगिक शिक्षणाबद्दल भाष्य करन्यासही काही हरकत नसायला हवी. परंतु त्यातही काही मर्यादा आणि शब्दांचे उचित प्रयोग असायला हवेत. लोकांच्या ये-जा असणाऱ्या ठिकानांहुन हावरट स्पर्शाच्या उत्सुकतेने अडगळीच्या ठिकाणी जाणाऱ्या युगुलांवर अतिप्रसंगाच्या , बलात्काराच्या,हत्येच्या घटना घडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यात महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्तच! कॉलेज मधे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर फ़क्त शैक्षणिकच लक्ष द्यावे ऐसा कुठला नियम आपल्या राज्यात लागू आहे असे मला तरी वाटत नाही.
तर मग महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे मोबाइल का चेक होउ नयेत ? का त्यांची दप्तरे तपासू नयेत? चला याहिपेक्षा वेगळं म्हंटलच तर महाविद्यालयात लैंगिक शिक्षणाबद्दल समुपदेशन होण्यासही काय अड़चन आहे ???
असले एक ना अनेक साधारण प्रश्नांची उत्तरे ही खुप सोप्पी आहेत.
छोट्या छोट्या गोष्टींमधुनच महविद्यालयिनच काय तर शाळकरी मुलेसुद्धा हिंसक होत चालली आहेत.
कितपत आपण लाजत राहायच आणि कितपत आपण फ़क्त एक व्यावसायिक जीवण जगत राहायचं??
हावरट स्पर्शाचा वाढत चाल्लेला हां कल्लोळ कधी आपण योग्य समुपदेशनाने शांत करणार ??
त्याला योग्य दिशा देण्याच काम तर व्हायला पाहिजेच!!
आपल्या मुला-मुलींशी ,भाऊ-बहिणीशी योग्य संवाद साधुन त्यांचे लक्ष शारीरिक हावरट गोष्टींवरून वळवुन त्यांच्या मनाशी मैत्री कशी करता येईल . त्यांना योग्य दिशा कशी दाखवता येईल याकडे सर्वांनी लक्ष द्यायला हवे..!
by – शेखर निकम , औरंगाबाद
95799 83763
अवतार सिंह पाश…. सबसे ख़तरनाक होता हैं अपने सपनो का मर जाना..
महाश्वेता देवी, शोषित-उत्पीडित वंचिताच्या वेदनेचा आवाज
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)