दुचाकी (बाईक) चालकांसाठी नवा नियम.दोघांना हेल्मेट सक्ती. अन्यथा कारवाईचा बडगा.बिना हेल्मेट दुचाकीस्वारांवर कठोर कारवाईचा इशारा देणारे पत्रक नुकतेच वाहतूक विभागाकडून काढण्यात आले आहे.
Section 129 of MV Act 1988 अंतर्गत बिना हेल्मेट दुचाकीस्वार व पिलियन रायडर यांच्याकडून ट्रॅफिक नियमांचे अंमलबजावणी करण्याबाबत…
दुचाकी (बाईक) चालकांसाठी नवा नियम.दोघांना हेल्मेट सक्ती.
उपरोक्त विषयानुसार, महाराष्ट्र राज्यातील मार्गांवर ०४ वर्षांखालील रस्ते अपघातात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बिना हेल्मेट दुचाकीस्वार व पिलियन रायडर यांचे अपघात, मृत्यूसह तसेच जखमींच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे, Section 128 आणि 129 of MV Act 1988 कायद्याच्या तरतुदीनुसार बिना हेल्मेट दुचाकीस्वार व पिलियन रायडर यांचे सुरक्षिततेसाठी ट्रॅफिक पोलिसांनी कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील रस्ते अपघातांची वाढती संख्या गंभीर चिंता व्यक्त करते. राज्यातील वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे की, हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वार आणि त्यांच्या मागे बसणाऱ्या पिलियन रायडरमुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. यामुळे मृत्यू आणि जखमींच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे.
हेल्मेट न घालणाऱ्यांवर कठोर कारवाई
वाहतूक विभागाच्या आदेशानुसार, Motor Vehicle Act 1988 च्या Section 128 आणि 129 अंतर्गत दुचाकीस्वारांना हेल्मेट परिधान करणे अनिवार्य आहे. या तरतुदींनुसार, हेल्मेट न घालणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
वाहतूक पोलिसांनी यासंदर्भात विशेष मोहीम सुरू केली असून, अपघात कमी करण्यासाठी आणि नागरिकांना हेल्मेट वापरण्याची शिस्त लावण्यासाठी व्यापक जनजागृती केली जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर Section 129/194(D) अंतर्गत दंडात्मक कारवाई केली जाईल. हेल्मेट न घालणाऱ्या पिलियन रायडरवरही अशीच कारवाई होईल.
हेल्मेट न वापरल्यामुळे वर्षभरात अनेक लोकांचे प्राण गेले
शासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार, हेल्मेट न वापरल्यामुळे वर्षभरात अनेक लोकांचे प्राण गेले आहेत.
यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली आहेत.
वाहतूक विभागाने जनतेला आवाहन केले आहे की, वाहन चालवताना स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे.
हेल्मेटसारख्या सोप्या उपायांचा अवलंब केल्यास अपघातांच्या घटनांमध्ये मोठी घट होऊ शकते. वाहनचालकांनी हेल्मेट वापरण्याची सवय लावावी व प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सुरक्षितता हाच सर्वोत्तम उपाय आहे!
Support Jaaglyabharat.com
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 27,2024 | 13:07 PM
WebTitle – Strict Action Against Without Helmet Bike Riders: Helmet Mandatory for Pillion Riders Too