बीड शहरात एका मजुराच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली असून, अमानुष मारहाण करून हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. शहरातील बांगरनाला परिसरात राहणारे उमेश दळवी या ३४ वर्षीय तरुणाचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. या प्रकरणात मद्यविक्रीच्या दुकानाच्या मालकावर थेट आरोप करण्यात येत असून, गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.
बीड मध्ये मजूर उमेश दळवी यांचा अमानुष मारहाणीत मृत्यू
मृत तरुणाचे नाव उमेश दळवी (वय ३४, रा. बांगरनाला, बालेपीर, बीड) असे असून तो शहरातील एका मद्यविक्रीच्या दुकानावर काम करत होता. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उमेश यांनी आपल्या पत्नीला मोबाईलवर संपर्क साधत “हे लोक मला जीवे मारतील” अशी भीती व्यक्त केली होती. या फोननंतर काही वेळातच संबंधित दुकान मालकाकडून उमेशची तब्येत बिघडल्याची माहिती त्यांच्या पत्नीला देण्यात आली.
यानंतर उमेश दळवी यांच्या नातेवाईकांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. मात्र तेथे पोहोचल्यानंतर उमेश दळवी यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. नातेवाईकांच्या आरोपानुसार, उमेश यांच्या शरीरावर मारहाणीच्या गंभीर खुणा होत्या आणि त्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे हा नैसर्गिक मृत्यू नसून थेट हत्या असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि स्थानिकांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गर्दी करत संबंधितांवर तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
पोलिसांनी मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे.
त्यामुळे नातेवाईकांमध्ये आणखी नाराजीचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, या प्रकरणामुळे बीड शहरात मोठी चर्चा सुरू झाली असून, मजूर वर्गाच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
कामाच्या ठिकाणी होणारी मारहाण, दबाव आणि कामगारांवरील अत्याचारांच्या घटनांबाबत प्रशासन किती गंभीर आहे,
असा सवाल सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
उमेश दळवी यांच्या मृत्यूमागील नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असले तरी,
नातेवाईकांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाकडे आता संवेदनशील गुन्हेगारी प्रकरण म्हणून पाहिले जात आहे.
पोलिस तपासातून पुढे कोणती माहिती समोर येते आणि संबंधितांवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
आरएसएस ज्या पद्धतीने गुरुदक्षिणा स्वीकारतो—ना व्यक्ती, ना नोंदणीकृत संघटना—त्याच धर्तीवर, तुम्हीही जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAY 25,2026 | 13:50 PM
WebTitle – Beed Labourer Umesh Dalvi Dies After Brutal Assault, Family Demands Murder Case























































