मुंबई: देशाची आर्थिक राजधानी मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील बांद्रा टर्मिनस रेल्वे स्टेशनवर ट्रेनमध्ये चढताना प्रवाशांची गर्दी वाढल्यामुळे गोंधळ माजला. हा प्रकार बांद्रा-गोरखपूर ट्रेनमध्ये चढताना घडला. चेंगराचेंगरी ९ प्रवासी जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे कळते,त्यांना उपचारासाठी भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 8 जखमींची प्रकृती स्थिर आहे, तर दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
बांद्रा टर्मिनस रेल्वे स्टेशनवर नेमके काय झाले?
चेंगराचेंगरी ची ही घटना बांद्रा टर्मिनस रेल्वे स्टेशनवर रविवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. प्लॅटफॉर्म नंबर 1 वर मोठी गर्दी होती. प्रवासी 22921 नंबरच्या बांद्रा-गोरखपूर एक्सप्रेस ट्रेनची वाट पाहत होते, जी पहाटे 5:10 वाजता सुटणार होती. ट्रेन आली तेव्हा प्रवाशांनी लवकरात लवकर चढण्यासाठी गोंधळ घालायला सुरुवात केली. बीएमसीच्या आपत्ती व्यवस्थापन शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी 10 जखमी प्रवाशांना दाखल केले असल्याची माहिती दिली आहे. त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असून इतर 8 जणांची प्रकृती स्थिर आहे.
जखमी प्रवाशांची ओळख
जखमी प्रवाशांची नावे अशी आहेत: 40 वर्षीय शब्बीर अब्दुल रहमान, 28 वर्षीय परमेश्वर सुखदार गुप्ता,
30 वर्षीय रवींद्र हरिहर चुमा, 29 वर्षीय रामसेवक रवींद्र प्रसाद प्रजापती, 27 वर्षीय संजय तिलकरम कांगय,
18 वर्षीय दिव्यांशु योगेंद्र यादव, 25 वर्षीय मोहम्मद शरीफ शेख.
तसेच 19 वर्षीय इंद्रजीत सहनी आणि 18 वर्षीय नूर मोहम्मद शेख यांची प्रकृती गंभीर आहे.
गोंधळ कसा माजला?
अधिकारी या गोंधळाच्या कारणांची तपासणी करत आहेत. या परिस्थितीबाबत अधिक माहिती मिळण्याची अपेक्षा आहे. सूत्रांनी सांगितले की ट्रेनमध्ये सामान्य श्रेणीचे डबे होते. ट्रेन प्लॅटफॉर्मवर येत असताना काही प्रवाशांनी चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे गोंधळ माजल्याची शक्यता आहे.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 27,2024 | 11:50 AM
WebTitle – Stampede at Bandra Railway Station Leaves 9 Injured, Two in Critical Condition
MumbaiNews #BandraStation #Stampede #TrainAccident #MumbaiUpdates #RailwaySafety #BreakingNews #PassengerSafety #IndiaNews