आरक्षण हक्क कृती समिती आक्रोश मोर्चाच्या
सरकार विरोधी घोषणांनी आझाद मैदान दुमदुमले..
टीम जागल्याभारत साठी मिलिंद चिंचवलकर
मुंबई (प्रतिनिधी) : संविधानिक हक्क व मागासवर्गीयांचे आरक्षण संपविण्याच्या षडयंत्राविरुध्द राज्यभर जिल्हाधिकारी, तहसिलदार कार्यालयांना निवेदन देऊन तसेच काही आमदार, विविध समाजातील नेते, राजकीय पक्षनेते इत्यादींना संयुक्त बैठक घेण्यासंदर्भात पत्र देऊनही कोणतीही चर्चा अथवा कारवाही झाली नसल्याच्या निषेधार्थ आरक्षण हक्क कृतीच्या माध्यमातून समस्त अनुसुचित जाती जमाती, भटक्या जाती, विमुक्त जमाती, विशेष मागास प्रवर्ग अन् ओबीसी समाजाच्यावतीने आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती दिनी आझाद मैदानात आज प्रचंड आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मागासवर्गीय आरक्षण रद्द केल्यांने, मागासवर्गीय समाजाचा सरकार विरोधात कमालीचा असंतोष दिसून आला.
मागासवर्गीयांचे आरक्षण, खाजगीकरण, शैक्षणिक धोरण, कृषी कायदे, कामगार कायदे
अशा अनेक महत्वाच्या मागण्यांचे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना मेलव्दारे देण्यात आले असून,
जन आंदोलनाची शासकीय पातळीवर तसेच प्रसिध्दी माध्यमांनी दखल घेतली नसल्यांने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.
शासनाने मागण्यांच्या संदर्भात गांभिर्य दाखविले नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.
सदर आरक्षण हक्क कृती समिती आक्रोश मोर्चात आयबीसेफ, स्वतंत्र मजदूर युनियन, ऑल इंडिया बॅकवर्ड क्लासेस फेडरेशन, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटना, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स, महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम
महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी महासंघ, अनुसुचित जाती जमाती संघटनांचा अखिल भारतीय परिसंघ, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना, शिक्षक शिक्षकेतर, प्राध्यापक, प्राचार्य, परिवहन, विद्युत, महसुल, मुद्रणालय, नगरपालिका, महानगरपालिका, जीएसटी, तांत्रिक, इन्कम टॅक्स, कस्टम, बँक, रेल्वे, पेट्रोलियम, इन्शुअरन्स, चर्मकार, धनगर, बंजारा, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासवर्गीय संघटना सहभागी होत्या.
तर रिपब्लिकन सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई), भारतीय रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, स्वतंत्र सलून ब्यूटी पार्लर कामगार संघटना, ऋणानुबंध, सिंधु रत्न लोककला मंच अशा अनेक राजकीय, सामाजिक संघटनांनी आक्रोश मोर्च्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता.
Maratha Arakshan Morcha Kolhapur : मूक आंदोलन सुरू
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUN 26 , 2021 19: 00 PM
WebTitle – SC ST OBC VJNT Akrosh Morcha at Azad Maidan 2021-06-26