सावळा मास्तर यांच्या स्मृतिदिनानिमित्त राहुल कांबळे यांचा सन्मान
जयसिंगपूर : संविधान बदलण्याची आणि आरक्षण संपवण्याची भाषा करणारे आणि तशी धोरणे राबवणाऱ्या राजकीय पक्षांना आपली मदत होईल अशी भूमिका घेऊ नका. जे संविधानाच्या आणि आरक्षणाच्या बाजूचे आहेत, त्यांनाच साथ द्या, असे आवाहन विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉ. धनाजी गुरव यांनी केले. ते बोधिसत्व विचारमंचतर्फे आयोजित सावळा मास्तर गोठणेकर यांच्या 27 व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी रावजी घोलप होते.
संविधान बदलण्याची भाषा करणारे ओळखा : कॉ. गुरव
कॉ. गुरव म्हणाले की, सावळाराम गुरुजींच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांमुळे बाबासाहेबांचा विचार खेडोपाडी डोंगरदऱ्यात जिथे दळणवळणाची साधने नव्हती अशा ठिकाणी पोहचला. अशा कार्यकर्त्यांच्या त्याग, बलिदान व कार्याचे स्मरण करणे आवश्यक असून त्यानिमित्ताने सांस्कृतिक प्रबोधनाची चळवळ राबवणे आजच्या काळात गरजेचे बनले आहे. आपल्या माणसांचा इतिहास आपणच लिहायला पाहिजे अन्यथा त्या इतिहासाचे विकृतीकरण प्रतिगामी शक्ती करत असते.
वरिष्ठ पत्रकार धनाजी कांबळे म्हणाले, सावळा मास्तर यांचे कार्य तरुण वर्गाला प्रेरणादायी असून
त्यांनी सांगितलेल्या बाबासाहेबांच्या विचाराने व धम्माच्या मार्गाने त्यांचे कुटुंब चालत आहे. त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा.
या वेळी भीमसेनानी कालकथित सावळा मास्तर गोठणेकर यांच्या नावे आंबेडकरी मिशन धम्मसारथी या पहिल्या पुरस्काराने राहुल कांबळे यांचा गौरव करण्यात आला.
पुरस्काराला उत्तर देताना राहुल कांबळे म्हणाले, या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली आहे.
‘धम्मसारथी’ या पुरस्काराच्या नावाला जागत, मास्तरांसारख्या कार्यकर्त्यांचे कार्य पुढे नेणे माझे कर्तव्य बनले आहे.
या वेळी प्रेरणादायी मास्तर स्मृती विशेषांक आणि शाहीर दीपक गोठणेकरलिखित माझ्या भीमाचे गाणे गातो मी…या गीत संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध भीम व चळवळीच्या गीत सादरीकरणाने झाली. सुप्रसिद्ध गायक संगीतकार कबीर नाईकनवरे यांनी ‘माझ्या भीमाचे गाणे गातो मी…’या गीताने सुरुवात केली. शाहीर रफिक पटेल, रोहित भाले, निवेदक प्रवीण बनसोडे यांनी प्रबोधन गीते सादर केली.
मास्तर गोठणेकर यांचे कार्य, त्यांचा सहवास आणि त्यांची प्रेरणा याविषयी आनंद घोलप, नजीर चौगुले, संदीप घोलप, अशोक कांबळे यांनी भावना व्यक्त केल्या. दिवंगत सावळा मास्तर यांच्या सहचारिणी नताबाई कांबळे यांचा व गावातील पहिला पशुवैद्यकीय डॉक्टर हेमंत कांबळे यांचा या वेळी सन्मान करण्यात आला.
या वेळी ॲड. सिद्धार्थ काकडे, प्रा. संजीव साबळे, प्रा. सर्जेराव नरवाडे, दाऊद पटेल, डॉ. विश्वनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
शाहीर दीपक गोठणेकर यांनी प्रास्ताविक केले. सुनील कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. रणधीर कांबळे व विनोद कांबळे यांनी स्वागत केले तर विजय गोठणेकर यांनी आभार मानले. अजय कांबळे, रवी तांबे, काशिनाथ कांबळे, उस्मान चौगुले, नीलेश कांबळे, प्रशीक कांबळे, सम्यक गोठणेकर, प्रज्वल कांबळे, सचिन कांबळे, अक्षय कांबळे, शुभम घोलप, प्रकाश कांबळे, संदेश कांबळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
Support Jaaglyabharat.com
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 12,2024 | 16:40 PM
WebTitle – sawala master purskar jaisingpur