भाईंदर:देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारत वाढ होत चालली आहे.अलिकडे महिलांचा खून करून त्यांचे तुकडे करण्याच्या भयानक घटनात वाढ झालीय,यात विशेष म्हणजे सर्व धर्मीय गुन्हेगार अशाच प्रकार कृत्य करत आहेत,अशीच एक घटना समोर आलीय,सरस्वती वैद्य नामक महिलेचा खून करून त्यांच्या शरीराचे तुकडे करून विल्हेवाट लावणाऱ्या नराधम प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.Saraswati Vaidya murder case हादरवून टाकणारी ही घटना मुंबईजवळच्या भाईंदर मध्ये घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे.सरस्वती वैद्य Saraswati Vaidya (32) ही तिचा प्रियकर लिव-इन पार्टनर मनोज साहानी Manoj Sahani (56) सोबत गीतानगर भाईंदर येथील एका फ्लॅट मध्ये राहायला होती.
बुधवारी संध्याकाळी पोलिसांनी मीरा रोडच्या गीता नगर परिसरातील
गीता आकाशदिप अपार्टमेंटमधून एका महिलेच्या शरीराचे तुकडे केलेल्या अवस्थेतील बॉडी जप्त करण्यात आली.
पोलिसांनुसार, आरोपी मनोज साहनी याने सरस्वती वैद्य ची 3-4 दिवसांपूर्वी हत्या करून ठार मारले आणि त्यानंतर त्याने तिच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी झाड कापण्याचे कटर विकत घेतले. या कटरने मनोज साहानी सरस्वती वैद्य च्या शरीराचे तुकडे करत होता.पोलिसांचे म्हणणे आहे की आरोपीने तिच्या शरीराचे तुकडे करून ते प्रेशर कुकरमध्ये उकडले आणि नंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्यामध्ये भरले.त्यातील काही तुकडे त्याने कुत्र्याला खायला घातल्याची धक्कादायक माहितीही समोर आलीय.पोलिसांच्या अधिकृत माहितीनुसार वेगवेगळ्या ठिकाणावरून महिलेच्या शरीराचे 12-13 पेक्षा जास्त तुकडे जप्त करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,हे जोडपे तीन वर्षांपासून live-in रिलेशनशिप मध्ये असून मीरा-भाईंदर येथील गीता नगर परिसरातील गीता आकाशदिप अपार्टमेंट मध्ये सातव्या मजल्यावर भाड्याने राहायला होते.दोघांमध्ये काही दिवसांपासून खटके उडत होते.भांडणाचे पर्यावसन महिलेच्या खूनात झाले.अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.सरस्वती वैद्य यांचा खून करून मनोज साहनी तुकड्यासोबतच राहत होता.या दाम्पत्याच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार इमारतीतील रहिवाशांनी बुधवारी नयानगर पोलिस ठाण्यात केली होती.जेव्हा पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना पीडितेचा मृतदेह सापडला,आरोपी मनोज साहनी फ्लॅटमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला ताब्यात घेण्यात आले.
खून करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य अन बाइक पोलिसांनी जप्त केली असल्याची माहिती दिली आहे.
पुन्हा फ्रीज हत्याकांड; स्टोनकटरने केले तुकडे,श्रद्धा वालकर हत्याकांडसारखी घटना
पत्नीचे तुकडे करून पाण्याच्या टाकीत लपवले
Nikki Yadav Murder :निक्की यादव चा खून,फ्रीजमध्ये मृतदेह;संपूर्ण प्रकरण
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा..
First Published by Team Jaaglya Bharat on 08, JUN 2023, 10:30 AM
WebTitle – Saraswati Vaidya’s body was cut into pieces and cooked in a cooker by Manoj Sahni at Mira Road