हैदराबाद : पुन्हा फ्रीज हत्याकांड: दिल्लीतील श्रद्धा वालकर,निक्की यादव अन बिलासपूर च्या सती साहू हत्याकांडसारखी हृदयद्रावक घटना हैदराबादमध्ये समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या केलीय.hyderabad man kills live-in partner chopped body parts प्रेयसीच्या मृतदेहाचे दगड कापण्याच्या यंत्राने तुकडे करून ते तुकडे फ्रीजमध्ये ठेवून वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यास सुरुवात केली.आरोपीने पीडितेचे पाय आणि हात घरातील फ्रिजमध्ये ठेवले होते. दुर्गंधी येऊ नये म्हणून तो फ्रीज तसेच संपूर्ण घरात इत्र /परफ्यूम ची फवारणी करायचा.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
17 मे रोजी हैदराबाद पोलिसांना शहरातील मुसी नदीजवळ एक छिन्नविछिन्न अवस्थेतील शीर सापडल्याने ही हत्या उघडकीस आली.
तपास करत असताना आठवडाभरानंतर पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले आणि हे धक्कादायक खून प्रकरण उघडकीस आले.
जाणून घ्या संपूर्ण पुन्हा फ्रीज हत्याकांड प्रकरण
हे प्रकरण दिल्लीतील श्रद्धा वालकर आणि निक्की यादव हत्या प्रकरणासारखेच आहे,
ज्यामध्ये आरोपींनी पीडितांच्या शरीराचे अवयव कापले होते आणि फ्रीझमध्ये ठेवल्यानंतर ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकले होते.
दक्षिण-पूर्व विभागाचे डीसीपी रुपेश चेन्नूरी यांनी सांगितले की, पोलिसांनी हत्याकांड करणाऱ्या बी.आर. चंद्र मोहन याला अटक केली आहे. तो शेअर बाजारात ऑनलाइन ट्रेडिंग करत असल्याचे तपासात उघड झालेय.चंद्र मोहन 55 वर्षांचा आहे. त्याने मारलेल्या लिव्ह इन पार्टनरचे नाव याराम अनुराधा रेड्डी असून ती ४८ वर्षांची होती.
15 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते
पोलिसांनी सांगितले की, दोघेही गेल्या 15 वर्षांपासून एकत्र राहत होते. ही महिला पतीपासून फार पूर्वीपासून विभक्त झाली होती. त्यानंतर ती चंद्र मोहन याच्यासोबत चैतन्यपुरी कॉलनी, दिलसुखनगर येथील घरी राहत होती.
पैशावरून वाद
ही महिला 2018 पासून गरजूंना व्याजावर पैसे देत होती. ऑनलाइन व्यवसाय करण्यासाठी चंद्र मोहन ने तिच्याकडून सुमारे 7 लाख रुपये घेतले होते,पुढे त्यावरूनच त्यांच्यात वाद सुरू झाले. वारंवार विनंती करूनही तो रक्कम परत करू शकला नाही. महिलेने त्याच्यावर पैशांसाठी दबाव टाकला असता आरोपी चंद्र मोहन आता तिचा काटा काढण्याचा विचार करू लागला.यातूनच त्याने तिला ठार मारण्याचा कट रचला.
दोन दगड कापण्याची यंत्रे घेतली
12 मे रोजी आरोपीने अनुराधासोबत भांडण करून तिच्यावर चाकूने हल्ला केला. त्याने तिच्या छातीवर आणि पोटावर वार करून तिची हत्या केली. खून केल्यानंतर चंद्र मोहन ने मृतदेहाचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी दोन लहान दगड कापण्याची मशीन्स खरेदी केल्या होत्या.
तिसऱ्या दिवशी डोके फेकले
चंद्र मोहन ने अनुराधाचे डोके धडापासून कापून काळ्या पॉलिथिनच्या पिशवीत गुंडाळून ठेवले.
त्यानंतर त्याने धडापासून पाय आणि हात कापून काढले, कापलेले पाय आणि हात रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले आणि धड विल्हेवाट लावण्यासाठी सूटकेसमध्ये ठेवले.
15 मे रोजी चंद्र मोहन अनुराधाचे कापलेले शीर घेऊन ऑटोरिक्षाने मुशी नदीवर पोहोचला तिथं अनुराधाचे कापलेले डोके तेथे फेकून दिले.
मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी यूट्यूबवर व्हिडिओ पहात होता
आचंद्र मोहन ने फिनाइल, डेटॉल, अत्तर, अगरबत्ती आणि कापूर आणले
आणि अनुराधाच्या शरीराच्या छिन्नविछिन्न भागांवर नियमितपणे शिंपडत राहिला,
जेणेकरून आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरू नये.
शरीराच्या अवयवांची विल्हेवाट कशी लावायची याचे व्हिडिओही तो युट्यूबवर पाहत होता.
महिलेचा मोबाईल स्वत:वापरत होता
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो मृत अनुराधा च्या मोबाईलवरून परिचितांना मेसेज पाठवत होता, जेणेकरून तिच्या ओळखीच्या लोकांना विश्वास बसेल की ती जिवंत आहे आणि इतरत्र राहत आहे. 17 मे रोजी, स्वच्छता कर्मचार्यांना मुशी नदीजवळील अफझल नगर कम्युनिटी हॉलसमोरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका महिलेचे छिन्नविच्छन अवस्थेतील शीर सापडले, त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. मलकपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आठ पथके तयार केली.
सीसीटीव्ही फुटेजचे स्कॅनिंग आणि इतर तांत्रिक उपकरणांचा वापर करून सखोल तपास केल्यानंतर पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली.
आरोपीने आपला गुन्हा मान्य केला.पोलिसांनी पीडितेचे उर्वरित अवयव,शरीर तिच्या घरातून जप्त केले आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहे.
पुन्हा घडलेल्या या फ्रीज हत्याकांड घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मेनस्ट्रीम मिडिया या बातमीवर चिडीचूप आहे. कारण तुम्हाला माहितच असेल,कमेंट करून नक्की कळवा जर तुमच्या लक्षात आलं तर.
अशीच एक घटना बिलासपुर मध्ये घडली होती,इथेही पत्नीचे तुकडे करून पाण्याच्या टाकीत लपवले गेले होते : बिलासपूर च्या उसलापूर मध्ये पत्नी सती साहू ( sati sahu )ची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पती पवन ठाकूर (pawan thakur) ला अटक केली. हत्येनंतर आरोपीने पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे करून ते घरातील पाण्याच्या टाकीत लपवून ठेवले होते.संपूर्ण प्रकरण इथे वाचा.जास्तीत जास्त शेअर करा. सेव्ह करून ठेवा.जेव्हा धार्मिक ध्रुवीकरण होते तेव्हा अशा बातम्या दाबल्या जातात आणि फक्त विशिष्ट बातम्या लिंक दिल्या जातात.
पत्नीचे तुकडे करून पाण्याच्या टाकीत लपवले
Nikki Yadav Murder :निक्की यादव चा खून,फ्रीजमध्ये मृतदेह;संपूर्ण प्रकरण
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on 25, MAY 2023, 11:57 AM
WebTitle – hyderabad man kills live-in partner chopped body parts