रोहित वेमूला हत्याप्रकरण हि स्टोरी प्रत्येकाने काळजीपूर्वक वाचा,ज्यांना प्रश्नपडले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरे यात आहेत….
आजचा दैनिक मीमराठी live पेज नं ८ आणि जनतेचामहानायक पेज नं ५
विद्यापीठातील अनेक ठिकाणी प्रवेशास बंदी
हैदराबाद केंद्रीय विद्यापीठात विज्ञान हा विषय घेऊन पीएचडी करत असलेल्या २८ वर्षीय रोहित वेमूला या स्कॉलर विद्यार्थ्यावर २१व्या शतकातही सामाजिक बहिष्कृततेला सामोरे जावे लागल्याने मानसिकदृष्ट्या खचून जाऊन वसतीगृहातील खोलीतच रविवारी रात्री गळफास घेऊन त्याने आपले जीवन संपविले आहे.
रोहित वेमूला आणि इतर चार विद्यार्थ्यांवर विद्यापीठ प्रशासन आणि सरकारमधील काही मंत्री,हिंदुत्ववादी विद्यार्थ्यी संघटना यांच्यामार्फत जातीयद्वेषातून अन्यायकारक अशी सामाजिक बहिष्कृतता लादून विद्यापीठाची प्रशासकीय इमारत, वसतीगृह, कॅन्टिन, ग्रंथालयासह विद्यापीठातील अनेक ठिकाणी प्रवेशास बंदी करण्यात आली होती.
या घटनेमुळे संतप्त झालेल्या विद्यार्थी संघटनांनी आक्रमक होत सोमवारी सकाळपासून यास जबाबदार असलेल्या विद्यीपीठ प्रशासन आणि भाजपचे केंद्रीय श्रममंत्री व आरएसएस सदस्य बंडारु दत्तात्रय यांच्यावर कारवाईसाठी निदर्शने सुरु केली असून तेलंगणा बंदची हाक देण्यात आली आहे.
प्रकरण काय आहे पाहूया.
रोहित वेमूला हा (ASA) आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचा अध्यक्ष होता.३० जुलैला याकुब मेननला फाशी देण्यात आली तेव्हा देशात फाशीची शिक्षा असावी कि नसावी हा वाद बराच रंगला होता,त्यानिमित्ताने एक चर्चासत्र हैदराबाद विद्यापीठात आयोजित करण्यात आले होते.
सदर चर्चासत्रात ASA आंबेडकर स्टुडंट असोसिएशन आणि ABVP अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,हि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थ्यीविंग आहे.यांच्यात फाशीच्या मुद्यावरून मतभेद झाले होते.आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचे असे म्हणने होते कि याकुबला सश्रम कारावास जन्मठेप दिली जावी.त्याच्याकडून आणखी काही माहिती धागे-दोरे मिळतात का हे पाहिले जावे.
दोघांमध्ये खटका
तर दुसरीकडे ABVP चे म्हणने होते याकुबला फाशीच व्हायला हवी.गुन्हेगारांना फाशी द्यावी कि न द्यावी याविषयी देशात अनेक वेगवेगळी मते आहेत.याकूबची फाईल दहाव्या नबंरवर असताना सरकारने याकुबला फासावर लटकाविण्याची घाई केली.ABVP संघटना हि भाजपासरकारचाच एक भाग असल्यामुळे त्यांनी याकूबच्या फाशीवर जोर देणे स्वाभाविक आहे.
देशातील सत्तांतरामुळे देशात असहिष्णुतेचे वातावारण असल्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतील काही विद्यार्थ्यांनी आंबेडकर स्टुडंट असोसिएशनवर फाशीला विरोध करतात म्हणून देशद्रोही असल्याची टिप्पणी केली.यामुळे दोघांमध्ये खटका उडाला होता.
याविषयीचा वाद विद्यार्थ्यांच्या फेसबुकवरपेजवरही काही दिवस पहायला मिळत होता.
मुझ्झफरनगर अभी बाकी है
पुढे ऑगस्ट 03/08/2015 आणि 04/08/2015 ला दिल्ली विद्यापीठात “मुझ्झफरनगर अभी बाकी है” ह्या बहुचर्चित माहितीपटाचे प्रदर्शन आंबेडकर स्टुडंट असोसिएशनने आयोजित केले होते,ते होऊ नये यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी विरोध करत हिंसक निदर्शने केली होती.हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा होता.त्यामुळे पुन्हा दोघांत संघर्षाची ठिणगी उडाली.
माहितीपटाचे प्रदर्शन झाल्यामुळे चिडलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष सुशीलकुमार याने आंबेडकर स्टुडंट असोसिएशनच्या विद्यार्थ्यांना फेसबुकपेजवर अपशब्द वापरले.त्याची तक्रार विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे केली.सदर प्रकाराबाबत विद्यापीठ सुरक्षा प्रशासन अधिकार्यांच्यासमोर सुशीलकुमारने माफी मागितली खरी परंतु तो राग मनात ठेवून सुशीलकुमारने त्याच रात्री स्वत:ला हैद्राबादमधील अर्चना हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले.
विद्यार्थ्यांचे निलंबन
पोलिसांत आंबेडकर स्टुडंट असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याची खोटी तक्रार दाखल केली.यात ज्या पाच विद्यार्थ्यांची नावे नोंदवली गेली ते या प्रकरणात कुठेच हजर देखील नव्हते.विद्यापीठ सुरक्षा प्रशासन अधिकारी प्रा.आलोक पांडे यांनी सदर प्रकरणाची चौकशी करून सुशीलकुमारवर कुणीही शारीरिक मारहाण किंवा हल्ला केला नसल्याचा अहवाल दिला.
परंतु तरीही अनाकलनीयपद्धतीने संबंधित विद्यार्थ्यांना विद्यापीठ प्रशासनाकडून निलंबनाचे आदेश दिले गेले.या आदेशाच्या विरोधात सर्व पुरोगामी आणि लोकशाहीवादी विद्यार्थ्यी संघटनानी विद्यापीठ प्रशासनाचा निषेध केला.तेव्हा माजी कुलगुरू प्रा.पि शर्मा यांनी सदर विद्यार्थ्यांचे निलंबन रद्द केले पुन्हा नव्याने चौकशीसाठी आणखी एक समिती नेमली.
एकतर्फी निर्णय
याविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थ्यी केंद्रीय श्रममंत्री बंडारु दत्तात्रय यांच्याकडे गेले.अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हि भाजापाचीच विद्यार्थ्यी विंग असल्यामुळे बंडारु दत्तात्रय यांनी यात जातीने लक्ष घालून ताबडतोब केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री स्मृती इराणी यांना १७/०८/२०१५ ला पत्र लिहून विद्यापीठाला सदर विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात यावेत अशा आशयाचे पत्र पाठवले,
त्यानुसार केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने सदर विद्यापीठाला तत्काळ स्पष्टीकरण मागत चौकशी करून कारवायी करण्याचे आदेश पत्रात दिले.यावर पुन्हा अगोदरच्या समिती बरखास्त करत नविन दोन सदस्यीय समिती नेमली गेली.दोन पोलीस दोन सुरक्षा रक्षक आणि दोन तक्रारदार यांच्या जबानीवर विद्यार्थ्यांचे म्हणने ऐकून न घेता एकतर्फी निर्णय घेत विद्यापीठ प्रशासन सदर विद्यार्थ्यांना अन्यायकारकरित्या सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत केले.
ABVP संघटनेवर बंदी घालण्याची जोरदार मागणी
विद्यापीठाची प्रशासकीय इमारत, वसतीगृह, कॅन्टिन, ग्रंथालय यासह विद्यापीठातील अनेक ठिकाणी प्रवेशास बंदी करण्यात आले. विद्यापीठ प्रशासन,अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,भाजपाचे मंत्री यांच्या संगनमताने या विद्यार्थ्यांना रस्त्यावर दिवस काढावे लागले.विद्यापीठीय राजकारणाने निरपराध विद्यार्थ्याना उध्वस्त करत त्यांच्या करिअरचा बळी घेतलाच त्यात एकाचे आयुष्यही हिरावून घेतले गेले.
याविरोधात आता तेलंगणाच्या सर्व विद्यार्थी संघटनांनी बंद पुकारला आहे.
महाराष्ट्रातील विद्यार्थींनी संघटनांनीही रोहितच्या आत्महत्येचा निषेध केला आहे.
सर्वच स्तरातून शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रात गलीच्छ राजकारण दंडेली
आणि दहशत निर्माण करणाऱ्या ABVP म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनेवर बंदी घालण्याची जोरदार मागणी होत आहे.
ही संघटना शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत धोकादायक
सदर संघटना हि घटना विरोधी कृत्यात अनेकदा सहभागी असल्याचे दिसून येते.
काही ठळक घटना पाहिल्या तर चेन्नई मधील IIT संस्थेत एका कार्यक्रमात मोदी सरकारच्या गोमांस भक्षण
आणि हिंदीप्रभुत्ववादाच्या धोरणाबद्दल चर्चा झाली आणि त्यातून या मुद्द्यांना विरोध झाला.
आंबेडकर-पेरियार स्टडी सर्कल या विध्यार्थी संघटनेविरुद्ध ABVP संघटनेने बंदीची मागणी घातली.
सदर कार्यक्रमाचे रिपोर्टिंग थेट मनुष्यबळ मंत्रालयाला केले गेले आणि तिथून ताबडतोब बंदीचे आदेश निघाले
या बंदीला झालेल्या जोरदार विरोधामुळे सरकारने शेवटी माघार घेतली.
त्यानंतर एफटीआयआयमध्ये सरकारपुरस्कृत गजेंद्र चौहान
आणि अजून पाच सदस्यांच्या नियुक्तीवर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेत उपोषण केले,त्यांना धमकावण्याचे काम या संघटनेने केले आहे.
मागे मुंबईतील सेंटझेवियर्समध्ये शाहीर शितल साठेचा कार्यक्रम होता तो धमक्या मनगटशाहीच्या जोरावर ABVP संघटनेने होऊ दिला नाही.
त्यानंतर तीन तारखेला सोलापूर येथील सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमातही अ
खिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घालून कार्यक्रम उधळून लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
तेथील उपस्थित कार्यकर्त्यांनीच चोप देवून त्यांना पळवून लावले.यावरून सदर संघटना
ही शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत धोकादायक आहे हे स्पष्ट होते.घटनेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्य या संघटनेला मान्य नाही.
तसेच तीला सत्ताधारी सरकारचे पाठबळ असणे हे अत्यंत घातक आहे.
या सर्वांचा नीट विचार केला तर असे दिसून येते कि भाजपासरकार पद्धतशीरपणे इथे विशिष्ट विचारसरणी रूजवू पहात आहे.
आणि मागासवर्गांना शिक्षणापासून तोडण्याचे उद्योग करत आहे.
खुनाचे एक प्रकारे समर्थन
एकीकडे सबका साथ विकासच्या गप्पा करायच्या आणि दुसरीकडे सामाजिक बहिष्कृततेच्या प्रथा शिक्षणक्षेत्रात राबवायच्या,
आरक्षणाला विरोध नाही म्हणायचे आणि आरक्षणाची समीक्षा करण्याचा आग्रह धरायचा,मागास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला कात्री लावायची
आणि दुसरीकडे शिक्षणक्षेत्रात गुंड संघटना वाढवून मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर दहशत निर्माण करायची
त्रास द्यायचा हिंदुत्ववादी अजेंडे राबवत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे उद्योग करायचे.
रोहित वेमूला आणि इतर चार विद्यार्थ्यांवर विद्यापीठाच्या प्रोक्टोरियल चौकशीत कोणत्याही प्रकारचा गुन्हा सिद्ध झालेला नसताना
त्यांना गुंड म्हणायचे त्यांनी याकूबला समर्थन दिले म्हणून देशद्रोही म्हणायचे असे खोटेच प्रचार आता ही संघटना करत असून
त्यांच्या राजकारणाने झालेल्या खुनाचे एक प्रकारे समर्थन करण्याचा उद्योग चालू झाला आहे.
शिक्षणक्षेत्र दहशतमुक्त करणार कि नाही?
भाजपा आरएसएसचे धार्मिक आणि जातीय धृवीकरण देशाला नविन नाही.हे सर्व पाहता हि ब्राह्मण्यवादी विचारसरणी आहे असे म्हणता येते. हिंदुत्ववाद हाच राष्ट्रवाद आहे. आणि जे घटक विचारसरणी यास विरोध करेल ते राष्ट्रद्रोही आहेत.हि भाजपा संघ परिवार आणि हिंदुत्ववादी संघटना यांची संकल्पना आहे.याच खुळचट भावनेतून आंबेडकर स्टुडंट असोसिएशनच्या विद्यार्थ्यांवर अन्यायकारक कारवायी केली गेलीय.
त्यामुळे विद्यापीठ प्रशासन आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमधील नेत्यांच्या संगनमताने घडवून आणलेला हा खून आहे असे विविध पुरोगामी डाव्या आणि मागासवर्गीय संघटनाचे म्हणने आहे. भाजपासरकार संबंधित नेत्यांचे राजीनामे घेऊन त्यांना शासन करणार कि नाही? त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नोंदवला जाऊ नये? अशा संघटनावर बंदी घालून शिक्षणक्षेत्र दहशतमुक्त करणार कि नाही?
तरूणांची संख्या जास्त असलेल्या देशासाठी लाजिरवाणे आहे
चंद्रशेखर आझाद इंग्रजांशी लढताना जेव्हा त्यांच्या तटबंदीत सापडले तेव्हा त्यांनी शेवटची गोळी स्वत:च्या मस्तकात झाडून घेऊन ते शहिद झाले,चन्द्रशेखर आझाद यांची हि आत्महत्या नाही. रोहित वेमूलाने हेच केले.अशी भावना आता देशभरातील विद्यार्थ्यांच्या मनात जोर धरू लागली आहे.भडकलेली हि तरुणांची आग सरकारला अडचणीचे ठरेल यात शंका नाही.
सोशल मीडियातही तरुण वर्गाने तीव्र नाराजी व्यक्त करत निषेध केला आहे. #universityofhyderabad #Rohit_Vemula #BanABVP हे हॅशटॅग ट्रेंड दिवसभर दिसत होते, त्यामुळे तरुणांची भावना लक्षात येते. दिल्ली युनिव्हर्सिटी मुंबई कलिना युनिव्हर्सिटीसह देशभरात ठिकठिकाणी निदर्शने करण्यासाठी तरुण एकवटले आहेत.एका निरपराध विद्यार्थ्याला अशा प्रकारे आपले जीवन संपावायला लागणे हे तरूणांची संख्या जास्त असलेल्या देशासाठी लाजिरवाणे आहे.
हेही वाचा .. जातीचा पेट: म्हाराच्या हातचं आम्ही पाणी बी पेत नाय, आणि ह्या पोरान मला त्येंच्या घरात निऊन ठेवलं.
हेही वाचा .. इंडिया दॅट इज कास्ट
रोमन साम्राज्य आणि भारतीय समाज
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)