उत्तरप्रदेश,जाना बाजार (अयोध्या) : येथील हैदरगंजच्या गावात लग्नास नकार दिल्याने एका तरुणाने सोमवारी रात्री उशिरा घरात झोपलेल्या मुलीवर अॅसिड फेकले, त्यामुळे ती गंभीररीत्या भाजली असून मृत्यूशी झुंज देत आहे. माहिती मिळताच पोलिसांनी तिला सीएचसी रामवकला येथे नेले तेथून तिला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं. तरुणीची परिस्थिती अत्यंत गंभीर अवस्थेत असल्याने तिला लखनौला रेफर करण्यात आले आहे.पोलिसांनी अॅसिड फेकणाऱ्या राजकरण शर्मा ला अटक केलीय.
ही घटना हैदरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे. आरोपी तरुणाचं या पीडित तरुणीसोबत लग्न ठरलं होतं.मात्र त्याच्या वाईट सवयींची माहिती मिळताच मुलीच्या घरच्यांनी लग्नास नकार दिला होता, त्यामुळे आरोपी संतापला होता. यापूर्वीही त्यांनी घरात घुसून गोंधळ घातला होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच आयजी प्रवीण कुमार, एसएसपी राजकरण नय्यर, एसपी ग्रामीण अतुल सोनकर आणि इतर अधिकारी पीडितेच्या घरी पोहोचले आणि चौकशी केली.
कुटुंबीय जागे झाले, तेव्हा आरोपी तेथून पळून गेला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी घरातील एका रूम मध्ये झोपली होती तर दुसऱ्या खोलीत तिची वहिनी आणि आई गच्चीवर झोपलेली तसेच घरातील इतर सदस्य बाहेर झोपले होते. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास राजकरण शर्मा याने घराच्या पाठीमागील भिंतीकडून घरात घुसून खोलीत झोपलेल्या २२ वर्षीय पीडित तरुणीवर अॅसिड ओतले. मुलीच्या चेहऱ्यावर, डोक्यावर आणि छातीवर अॅसिड पडले, त्यामुळे ती गंभीररित्या भाजली. तिचा आरडाओरडा ऐकून कुटुंबीय जागे झाले, तेव्हा आरोपी तेथून पळून गेला होता.
घटनेची माहिती मिळताच हैदरगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी मोहं. अर्शद त्यांच्या टीमसह घटनास्थळी पोहोचले
त्यांनी अॅसिड मध्ये जळून गंभीर जखमी झालेल्या तरुणीला प्रथम सीएचसी आणि नंतर जिल्हा रुग्णालयात नेले.
तरुणीची गंभीर अवस्था लक्षात घेऊन डॉक्टरांकडून तिला लखनौला रेफर करण्यात आले.
स्टेशन प्रभारी मोहम्मद. अर्शदने सांगितले की, चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे
आरोपी राजकरण शर्मा,रहिवासी पुराकलंदर, याला अटक करून त्याची चौकशी करण्यात येत आहे.
आरोपीला दारूचे व्यसन,वयही जास्त
आरोपी राजकरण शर्मा हा दारू प्यायचा अशी माहिती समोर आलीय.या दारूच्या व्यसनामुळेच तरुणीच्या घरच्यांनी या लग्नाला नकार दिला होता.पीडितेच्या मेहुण्याने आणि तिच्या मोठ्या बहिणींनी सांगितले की, पूर्वी पुरकलंदर पोलीस स्टेशन परिसरातील राजा नाऊ येथील रहिवासी राजकरण शर्मा याच्यासोबत मुलीच्या लग्नाची चर्चा होती. त्यामुळे तो तरुणीशी फोनवर बोलत असे.तसेच तो दारूही प्यायचा, असे नंतर आम्हाला समजले,इतकेच नाही तर काही वेळा तो दारूच्या नशेत पीडितेसह घरातील सदस्यांनाही शिवीगाळ करत बोलायचा.
आरोपी मुलगा 35 वर्षांचा होता, तर मुलगी 22 वर्षांची होती. मुलीच्या बाजूने आरोप आहे की, मुलाने त्याचे वय लपवले, त्यामुळे आम्ही संबंध तोडले होते.गोष्टी मारहाण करण्यापर्यंत गेल्याने पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी अखेर पोलिसांत धाव घेतली.त्यांनंतर पोलिसांच्याच मध्यस्थीने असं ठरलं की आरोपीच्या या वागण्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी त्याच्याशी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. तसेच तिचे लग्न दुसऱ्या ठिकाणी निश्चित करण्यात आले होते. हे लग्न 28 नोव्हेंबर 2023 रोजी होणार आहे. यामुळे आरोपी संतापला. याआधीही एकदा त्याने रात्री घरी घुसून गोंधळ घातला होता. हे मोठे अॅसिड कांड त्याने सोमवारी रात्री केल्याचे कळते.
दोन दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाईल
एसएसपी राजकरण नय्यर यांनी सांगितले की, सोमवारी रात्री एका परिचित तरुणाने मुलीवर अॅसिड ओतले.
माहिती मिळताच सर्व अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. आरोपीला ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
प्राथमिक उपचारानंतर मुलीला लखनौला रेफर करण्यात आले.प्रकृती चिंताजनक असल्याचे तेथील डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.पुरावे गोळा करून दोन दिवसांत दोषारोपपत्र न्यायालयात पाठवण्याचे निर्देश पोलीस ठाणे प्रमुख हैदरगंज यांना देण्यात आल्याचे सांगितले.
आरोपीच्या घरावर बुलडोझर चालणार का?
लग्नाला नकार देणाऱ्या तरुणीवर अॅसिड फेकून तिला मृत्यूच्या दाढेत ढकलणाऱ्या आरोपी राजकरण शर्मा च्या घरावर बुलडोझर चालणार का? याबद्दल अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.घटना घडून चार दिवस झालेत ट्विटरवर कुणी ट्रेंड केला नाही,न्याय मागितला नाही.
हेही वाचा..करौली दलित तरुणीचं अपहरण,सामूहिक बलात्कार, चेहऱ्यावर अॅसिड टाकून विहिरीत फेकले
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 14,2023 | 13:09 PM
WebTitle – Rajkaran Sharma threw acid on the girl for refusing marriage