अमरावती: भाजपचे नेते आणि माजी मंत्री डॉ.अनिल बोंडे यांना अमरावती सिटी कोतवाली पोलिसांनी अमरावती दंगल प्रकरणी अटक केली होती.त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.अनिल बोंडे यांच्यावर दंगल भडकवणे, दंगल भडकवण्यासाठी प्रवृत्त करणे अशा गंभीर कलमांतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.अनिल बोंडे सह एकूण 14 जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती.त्यामध्ये अमरावतीचे भाजप नेते, महापौर, माजी पालकमंत्री, भाजप प्रवक्ते, नगरसेवक इत्यादींचा समावेश आहे.अशातच आज त्यांच्या मुलाचा फोटो सोशल मिडियात व्हायरल होत आहे.हा फोटो याच वर्षीचा एप्रिल मधिल असून अनिल बोंडे यांनी फोटो शेअर करून आपल्या मुलाला शुभेच्छा दिल्या आहेत,मात्र त्यावरून आता लोक उलटसुलट चर्चा करू लागले आहेत.
काही दिवसांपूर्वी त्रिपुरा येथे घडलेल्या हिंसक घटनेच्या पार्श्वभूमीवर मालेगाव, अमरावती, नांदेड येथे त्रिपुरातील कथित हिंसाचाराप्रकरणी मुस्लिम समुदायाकडून शुक्रवारी मोर्चे काढण्यात आले होते. या मोर्चादरम्यान काही ठिकाणी हिंसाचार झाला.त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी भाजपकडून बंदचे आवाहन केले गेले.भाजपने पुकारलेल्या या बंदला हिंसक वळणे लागले.भाजपच्या या बंद मध्ये भाजप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून हिंसाचार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
अमरावती दंगलीचा कट अनिल बोंडेंनी रचला-नवाब मलिक
अमरावतीमध्ये झालेली दंगल हा भाजपने केलेला सुनियोजित कट होता असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.अमरावतीमध्ये झालेला हा हिंसाचार सुनियोजित कट होता. हा कट अनिल बोंडे यांनी आखला असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला होता. हिंसाचार घडवून आणण्यासाठी काही तरुणांना पैसे वाटण्यात आल्याचा धक्कादायक आरोपही मलिक यांनी केला होता.हे पैसे मुंबईतील आमदाराने अमरावती येथे पुरवल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी यावेळी केला.या हिंसाचाराचे पडसाद राज्यातील इतर ठिकाणी उमटले नाही, त्याबद्दल राज्यातील जनतेचे मलिक यांनी आभार मानले होते.
मुलाच्या फोटोवरून अनिल बोंडेना विचारला जातोय जाब
अनिल बोंडे यांच्या विदेशात लग्न करणाऱ्या मुलाचा फोटो चर्चेत आला आहे.भाजप नेते अनिल बोंडे यांचा मुलगा डॉक्टर कुणाल यांचा विवाह यावर्षी एप्रिल मध्ये अमेरिकेतील मिनेसोटा शहरात झाला. या निमित्ताने हा फोटो शेअर करत अनिल बोंडे यांनी आपल्या मुलगा आणि सुनेला शुभेच्छा दिल्या.मात्र आता लोक त्यांना जाब विचारत आहेत.
प्रतीक पाटील यांनी हा फोटो रीट्विट करत म्हटलं आहे की,आपली पोरं मस्त विदेशात सेटल करायचे आणि इकडे तरुणांना धर्माची गोळी देऊन दंगे घडवायचे आणि द्वेषाच्या खाईत ढकलून द्यायचे. भाजपचा अजेंडा सेट असतो.सध्या अमरावतीमध्ये दंगे भडकविण्याच्या आरोपाखाली अनिल बोंडे याना अटक झाली होती.
शुभम आमधरे यांनी म्हटलं की, वा बोंडे जी स्वतः च्या मुलाला अमेरिकेत पाठवल इकड़े बहूजना च्या मुलाला दंगे कराला भाग पाड्ता ,
भाजप मधे जाताच लाज शरम विकून ख़ाली दिस्ते
पोलिसानी अटक केल्यावर एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना अनिल बोंडे म्हणाले होते की,
“आम्ही आता मार खाणार नाही” असं वक्तव्य त्यांनी दंगलीच्या पार्श्वभूमीवर केलेलं आहे.
सागर सावंत यांनी म्हटले आहे.
नवाब मलिक यांचा आणखी एक धमाका,व्हॉट्सअॅप चॅट ट्विटरवर शेअर
“जय भीम” फिल्म पाहिल्यानंतर अभिनेत्याने “पार्वती” साठी घर देण्याचे ठरवले
जय भीम चित्रपट:पोलिसांनी बॅग भरून लाच देण्याचा प्रयत्न केला न्या.चंद्रू
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 16, 2021 17:07 PM
WebTitle – Photo of BJP leader Anil Bonde’s son getting married abroad in discussion