पारनेर : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवरील आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट; वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकाराने डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह आणि समाजात तेढ निर्माण करणारा मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात एका डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पारनेर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून आंबेडकरवादी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
डॉक्टरची वैद्यकीय व्यवसायाची परवानगी रद्द करण्यासाठीही प्रयत्न केले जाणार
या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे पारनेर युवक तालुकाध्यक्ष संकेत विनायक पटेकर यांनी अधिकृत तक्रार दाखल केली होती. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुकाध्यक्ष बाळासाहेब पातारे यांच्या नेतृत्वाखाली ही कायदेशीर लढाई उभी करण्यात आली. तक्रारीची गंभीर दखल घेत पारनेर पोलिसांनी संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवरील आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट; वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकाराने डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी डॉ. मंगेश दत्तात्रय बेकारसे (रा. खारेकर्जुने, ता. जि. अहिल्यानगर) याने त्याच्या फेसबुक खात्यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक कार्याबाबत, लंडनमधील निवासस्थानाबाबत तसेच त्यांच्या वकिली व्यवसायासंदर्भात,आणि मान्यवर कांशीराम यांच्या विरोधात आक्षेपार्ह स्वरूपाच्या टिप्पण्या केल्याचा आरोप आहे. याशिवाय सामाजिक आणि धार्मिक सलोखा बिघडवू शकतील अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया देखील संबंधित खात्यावरून करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
आंबेडकरवादी कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची भावना ; महिलांनी चोप देत घातला चपलांचा हार
दिनांक २१ मे २०२६ रोजी रात्री ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आंबेडकरवादी कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली.
या घटनेची माहिती मिळताच भाळवणी परिसरातील विविध संघटना आणि कार्यकर्ते सक्रिय झाले.
त्यानंतर संबंधित डॉक्टरविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
गुन्हा नोंद होण्यापूर्वी भाळवणी येथे आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन करत संबंधित डॉक्टरचा जाहीर निषेध केला होता.
घटनेदरम्यान काही महिला कार्यकर्त्यांनी डॉक्टरला काळे फासत चोप दिला तसेच त्याला चपलांचा हार घालण्यात आला.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पोलिस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विशेष खबरदारी घेतली.
या प्रकरणात पारनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम २९९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल अनिल हरिभाऊ देवकर पुढील तपास करत आहेत.
डॉक्टरची वैद्यकीय व्यवसायाची परवानगी रद्द करण्यासाठीही प्रयत्न केले जाणार
दरम्यान, या प्रकरणात केवळ फौजदारी कारवाईवर न थांबता संबंधित डॉक्टरची वैद्यकीय व्यवसायाची परवानगी रद्द करण्यासाठीही प्रयत्न केले जाणार असल्याचे वंचित बहुजन आघाडी आणि इतर आंबेडकरवादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. समाजात द्वेष आणि वैमनस्य पसरविणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर प्रशासकीय कारवाई व्हावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.
या कायदेशीर लढ्यात सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र करंदीकर, आरपीआय पारनेर तालुका युवक अध्यक्ष प्रदीप नगरे, गौतम पटेकर, निलेश पटेकर, संभाजी पटेकर, विशाल पटेकर, भागा सोनवणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका बजावली. विविध आंबेडकरवादी संघटना आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे प्रशासनाने तातडीने दखल घेतल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAY 31,2026 | 16:00 PM
WebTitle – Case Filed Against Doctor In Parner Over Objectionable Facebook Post On Dr Babasaheb Ambedkar























































