मुंबई – मुकेश अंबानींच्या अॅंटीलिया या बिल्डिंग शेजारी स्कॉर्पियोमध्ये स्फोटके ठेवल्याच्या प्रकरणात तब्बल 13 तासांच्या चौकशी नंतर एपीआय सचिन वाझे यांना NIA कडून अटक करण्यात आली आहे.(Antilia case: NIA arrests mumbai police officer API sachin vaze) सत्र न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीनाची याचिका फेटाळून लावल्यानंतर वाझे यांच्यावर एनआयएने कारवाई केली आहे.या अटकेने राज्यात खळबळ उडाली असून चर्चाना उधाण आले आहे.सचिन वाझे यांना आईपीसीच्या कलम 286, 465, 473, 506(2), 120 बी आणि 4 (ए)(बी)(आय) स्फोटक वस्तू कलम 1908 अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
सचिन वाझेंना केल्यानंतर भाजपा आणखीनच आक्रमक झाला आहे.
या कटात सहभागी असलेल्या लोकांची नावे समोर येण्यासाठी सचिन वाझे यांची नार्को टेस्ट केली जावी,
अशी मागणी भाजपाचे नेते राम कदम यांनी केली आहे.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील संबंधित प्रकरणाच्या चौकशीत जे काही सत्य बाहेर येईल,
जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असं स्पष्टीकरण दिलं आहे.
मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सचिन वाझे यांच्या अटकेवर बोलण्यास टाळलं आहे.
माध्यमांनी सचिन वाझे यांच्या अटकेवर प्रश्न विचारला असता, तो स्थानिक विषय आहे.
मी जास्त यावर भाष्य करणार नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.
अंबानींच्या घराबाहेर लावलेल्या स्कॉर्पिओच्या कटात थेट वाझेंचा सहभाग असल्याचा संशय आल्याने वाझेंना अटक करण्यात आली आहे.
या कटात आणखी 5-7 जणांचा समावेश आहे. मुंबई पोलिस दलातील आणखी काही अधिकाऱ्यांची चौकशी होऊ शकते.
ठाणे येथून आणखी ३ जणांच्या अटकेची शक्यता असल्याचे एनआयएमधील सुत्रांनी सांगितले आहे.
“फडणवीसांनी गुप्तहेर शेरलॉक होम्सप्रमाणे या प्रकरणाचा तपास केला, पण…”
विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी गुप्तहेर शेरलॉक होम्सप्रमाणे या प्रकरणाचा तपास केला व काही गोष्टी समोर आणल्या.
एखाद्या निष्णात फौजदारी वकिलाप्रमाणे संपूर्ण केस विधानसभेत मांडली.
त्यांचे वकिलीचातुर्य या वेळी वाखाणण्यासारखेच होते, पण फौजदारी वकिलाने खटला कितीही रंगतदार केला तरी न्यायदान हे पुराव्यांवरच केले जाते.
मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच विरोधी पक्षनेत्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले,
पण हेच पोलीस वर्षभरापूर्वी फडणवीस यांचे हुकूम ऐकत होते.
अर्णब गोस्वामीसारख्यांना पोलिसांनी तेव्हा कोणाच्या हुकूमाने वाचविले?
फडणवीस यांनी मनसुख प्रकरणाचे नाट्य उत्तम रीतीने उभे केले, पण पुढे काय?,” असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
“मनसुख हिरेन हा तावडे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने बोलावले म्हणून घराबाहेर पडला तो परत आलाच नाही.
तावडे नावाचे कुणी अधिकारी मुंबई क्राइम बँचच्या कांदिवली युनिटमध्ये कार्यरत नाहीत हे आता समोर आले आहे.
मग या तावडेंच्या फोनचे गौडबंगाल काय? मनसुखचा खून झाला असे त्याची पत्नी सांगते.
या सर्व प्रकरणात गुंता आहे. त्या गुंत्यात मुंबई-ठाण्याचे पोलीस व पोलिसांचा एक गट चालवणारी बाह्य शक्ती गुंतली आहे. यातून पोलीस दलातील ‘गटबाजी’ व सौम्य टोळीयुद्ध पुन्हा उसळू लागले तर ते बरे नाही. पोलिसांनी भ्रष्टाचार करावा, पैसे गोळा करावेत, प्रोटेक्शन मनी घ्यावा यात आता काही नवीन राहिलेले नाही. पोलिसांचे चारित्र्य त्यामुळे बिघडले. म्हणून मुंबई पोलिसांनी तोंड काळे केले असे वक्तव्य फडणवीस यांनी केले, त्याचे समर्थन कोणीच करू नये. मनसुख हिरेन प्रकरणात पोलिसांनी तोंड काळे केले असा आरोप विरोधी पक्षनेते करीत असतील तर अन्वय नाईक प्रकरणात कोणी तोंड काळे केले व हा कोळसा पोलिसांना पुरवणारे कोण होते?,” असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
कोण आहे सचिन वाझे?
मुंबईतील (Mumbai) घाटकोपरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट (Ghatkopar Blast) प्रकरणातील संशयित आरोपी ख्वाजा यूनुसची (Khawaja Yunus) पोलिस कस्टडीत कथित हत्या झाली होती. ही घटना 16 वर्षांपूर्वी घडली होती. या प्रकरणी एक सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि तीन कॉस्टेबलला निलंबित करण्यात आलं होतं.त्या चौघांना मुंबई पोलिस (Mumbai Police) सेवेत पुन्हा रुजू करून घेण्यात आलं.
सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze),कॉस्टेबल राजेंद्र तिवारी (Rajendra Tiwari), सुनील देसाई (Sunil Desai) आणि राजाराम निकम (Rajaram Nikam) या चौघांना 2004 मध्ये निलंबित करण्यात आलं होतं. या सगळ्यांवर ख्वाजा यूनुसची कथित हत्या आणि पुरावे मिटवण्याचा ठपका ठेवण्यात आला होता. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आता तब्बल 16 वर्षांनी या चौघांना पोलिस सेवेत रुजू करून घेण्यात आले.
ख्वाजा यूनुस अटक
सचिन वाझे हा 1990 बॅचा पोलिस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशलिस्ट आहे. त्याला 2004 मध्ये अटक करण्यात आलं होतं. त्याच्याविरुद्ध ख्वाजा यूनुसची कथित हत्या आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं.
सचिन वाझे यांनी नोव्हेंबर 2007 मध्ये नोकरीचा राजीनामा दिला होता. परंतु, त्याच्याविरुद्ध हत्येचा खटला सुरू असल्यामुळे त्याचा राजीनामा नामंजूर करण्यात आला होता. तर मराठवाड्यातील परभणी येथील राहणार 27 वर्षीय ख्वाजा यूनुस हा पेशाने इंजीनिअर होता. तो दुबईत नोकरी करत होता. डिसेंबर 2002 मध्ये घाटकोपरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी अटक करण्यात आली होती.
ख्वाजा यूनुस याला चौकशीसाठी औरंगाबादला आणण्यात येत असताना तो फरार झाला होता, असा दावा पोलिसांनी त्यावेळी केला होता. मात्र, पोलिस कस्टडीत असतानाच ख्वाजा यूनुसची हत्या करण्यात आल्याचं सीआयडी चौकशीत स्पष्ट झालं होतं. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई हायकोर्टाने (Bombay Highcourt) आदेश दिले होते.
सीआयडीने या प्रकरणी 14 पोलिसांना दोषी ठरवले होते. मात्र,त्यापैकी सचिन वझेसह तिवारी, निकम आणि देसाई या तीन कॉन्स्टेबलविरुद्ध खटला चालवण्यास सरकारने परवानगी दिली होती. बचाव पक्षानं दावा केला होता की ख्वाजा यूनुसला पोलिस कोठडीतच पोलिसांनी बेदम मारहाण केली होती. लॉकअपमध्ये त्याचे कपडे उतरवून त्याला बेल्टने छाती आणि पोटावर जबर मारहाण करण्यात आली होती.
या प्रकरणी सचिन वाझे यांना निलंबित करण्यात आलं होतं. नंतर त्यानी स्वत: 2007 मध्ये नोकरीचा राजीनामा दिला होता. मात्र, हा राजीनामा स्विकरण्यात आला नाही. नंतर सचिन वाझे यांनी 2008 नंतर शिवसेनेत सक्रीय कार्यकर्ता म्हणून काम केलं.2020 साली सचिन वाझे यांचे निलंबन रद्द करून त्यांना पुन्हा पोलिस सेवेत रुजू करून घेण्यात आले होते.
हे ही वाचा.. अँटिलिया केस : स्फोटके ठेवलेल्या कार चे मालक मनसुख हिरेन चा मृतदेह खाडीत सापडून आला
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on March 14, 2021 12:56 PM
WebTitle – latest nia arrests mumbai police officer sachin vaze in connection explosives from mukesh ambanis house