मनसेच्या झेंड्यातून निळा आणि हिरवा रंग काढण्याचं कारण काय? राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या एकेरी हिंदुत्वाच्या मुद्द्याला जरासं बाजूला ठेवून मनसेच्या निर्मितीवेळी दलित-मुस्लिम वोट बँकेचा आधार मिळवण्यासाठी आपल्या पक्षाच्या झेंड्यामधे सर्वात वरती निळा रंग आणि खाली हिरवा रंग ठेवून एक वेगळा धमाका केला होता. एकेरी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर नाराज असणारी परंतु शिवसेना स्टाईलवर फिदा असणारी तरुण मंडळी अलगदपणे आपल्याकडे खेचण्याचं काम या झेंड्याने केलं होतं. राज ठाकरे यांच्या खळखट्याक स्टाईलला अनेक दलित-मुस्लिम युवकांनी आपली साथ दिली होती.
राजकारणात “रंग” फॅक्टर अगदी खोलवर रुजलेला आहे.
मनसेच्या राजकीय करियरचा आलेख हा उतरत्या क्रमाने जातोय त्यामुळे भाषणाची गर्दी
मतांच्या दर्दीमधे परावर्तित करण्यासाठी राज ठाकरे यांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे हे नक्की.
महाराष्ट्राच्या राजकारणात “रंग” फॅक्टर अगदी खोलवर रुजलेला आहे.
भगवा म्हंटल की हिंदू, निळा म्हंटल दलित आणि हिरवा म्हंटल की मुस्लिम समाज या रंगांचं प्रतिनिधित्व करतात.
याच रंगांच्या फॅक्टरला ओळखत राज ठाकरे यांनी पक्ष लाँचिंगवेळी
मनसेच्या झेंड्यातून निळा-भगवा-हिरवा रंग चढवून राजकीय गणितं मांडायचे प्रयत्न केले पण
त्यात ते फारसे यशस्वी असल्याचे अद्यापतरी कुठेच दिसून येत नाही.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा थरार आपण सर्वांनीच अनुभवला आहे.
राज्यात महाविकास आघाडी नावाचं समीकरण निर्माण झालं आणि राजकीय गणिताचं चक्र अगदी उलट फिरलं.
निवडणुकीमधे सेना-भाजपच्या युतीला भेदण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरे यांनी आपलं कसब पणाला लावलं होतं.
युतीधर्माच्या बिनसत्या नात्यामुळे हिंदुत्ववादी शिवसेनेने भाजपाच्या अतिआत्मविश्वासाच्या राजकारणाला सुरुंग लावला
आणि महाविकास आघाडीत सामील होऊन सत्तेची चावी मिळवली.
काँग्रेस-राष्ट्रवादी या सेक्युलर विचारसरणीच्या पक्षांना हात मिळवताना शिवसेनेला आपल्या तत्वांमध्ये मोठी तडजोड करावी लागली.
हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला सारत सेक्युलर विचारसरणीला आलिंगन द्यावं लागलं आणि या दरम्यान शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यासाठी साथ देणारा मतदारवर्ग कुठेतरी नाराज झाला.
अस्मितेचा वापर करायची वेळ
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राजकारणाच्या स्पर्धेमध्ये आपली जागा सिद्ध करण्यासाठी कदाचित ही चांगली वेळ आहे असा समज राज ठाकरे यांना झाला असण्याची शक्यता आहे.हिंदुत्वाच्या मुद्द्याला जीव की प्राण मानणारा मोठा मतदारवर्ग शिवसेनेवर जर नाराज असेल तर त्यांना काबीज करण्याची “हीच ती वेळ” असं राज ठाकरे यांचं गणित असू शकतं. अचानकपणे सर्वधर्म समभाव-पुरोगामी-सेक्युलर स्वभावाने वागायला लागलेले शिवसेना प्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांना मिळणारा पॉजिटीव्ह प्रतिसाद बघून राज ठाकरे कदाचित आपण खूप मागे राहिलोय अशी खंत व्यक्त करत असतीलंच.
हिंदुत्वाचा मुद्दा म्हंटला की “भगवा” आलाच आणि भगवा रंग म्हंटल तर प्रत्येक हिंदूची अस्मिता. या अस्मितेचा वापर करायची योग्य वेळ साधण्यासाठी राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा झेंडा बदलण्याचा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे. झेंड्याच्या रंगाची अधिकृत घोषणा जरी झालेली नसेल तरी अनेक निकटवर्तीय या गोष्टीला दुजोरा देत असल्याचं सोशल मीडिया मधे दिसत आहे.
निळा-हिरवा नाराज झाला तरी चालेल पण भगवा आपल्याकडे वळवायला जोर लावूया
मागील काही दिवसात राज ठाकरे यांची भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाल्याची सुद्धा चर्चा आहे. या झेंड्याच्या बदली मागे भाजपाचा हात असल्याचं देखील बोलल्या जात आहे.शिवसेनेचा नाराज हिंदू मतदार भाजपाच्या कलंकित प्रतिमेला बघून तिकडे वळणार नाही आणि त्याचमुळे राज ठाकरे यांना “तुम्ही पुढे व्हा आम्ही आहोत पाठीशी” अशी मैत्रीची हाक देत मनसेच्या माध्यमातून हा मतदार आपल्याकडे वळविण्याचा गनिमी कावा फडणवीस खेळत असतीलही. आपल्या सभेच्या नियंत्रणाबद्दल नुकत्याच लाँच झालेल्या पोस्टरवर देखील मनसेने फक्त हिंदुत्वाच्या मुद्द्याला अधोरेखित केले आहे. याचाच अर्थ आता त्यांना निळा आणि हिरवा काही कामाचा वाटत नाहीये. त्यांच्या पक्षात असलेला दलित-मुस्लिम वर्ग त्यांना पाहिजे तेवढी मदत करू शकत नाही आणि म्हणूनच निळा-हिरवा नाराज झाला तरी चालेल पण भगवा आपल्याकडे वळवायला जोर लावूया अशी रणनीती सद्ध्या मनसे आखताना दिसतेय.
मनसे मधील दलित-मुस्लिम युवा वर्ग कुठेतरी चिंतीत झालेला दिसून येतो आहे. आपले लाडके राज ठाकरे फक्त झेंड्याचा रंग बदलणार की विचारधारा बदलून अगदी कट्टर हिंदुत्ववाद मनसे पेरणार याचा विचार करून ” विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती..?” असा प्रश्न मनसेमधल्या प्रत्येक दलित-मुस्लिम तरुणाईला पडलेला असणार अशी खात्री आहे…
by – शेखर निकम
महाश्वेता देवी, शोषित-उत्पीडित वंचिताच्या वेदनेचा आवाज
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)