पुणे : बसपा ची सत्ता न आल्यास नव्या सरकारमध्ये सहभागी होऊन जनेतला न्याय देऊ – मायावतींचे आश्वासन : बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी आगामी निवडणुकीत पक्षाला स्वबळावर लढवण्याचे आणि सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्याचे जाहीर केले आहे. मात्र, सरकार स्थापन न झाल्यास अन्य पक्षाला तारतम्य ठेवून समर्थन देऊन लोकांना न्याय देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्या वडगाव शेरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. हुलगेश चलवादी यांच्या प्रचारासाठी येरवड्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या मैदानात आयोजित सभेत बोलत होत्या.
मायावती म्हणाल्या, बहुजन समाज पक्षाने मागील चार कार्यकाळांत उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात सत्ता मिळवली आणि तळागाळातील समाजाला नेतृत्व दिले. त्या कार्यकाळात प्रत्येक व्यक्तीला नोकरीची हमी, पक्की घरे आणि अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ मिळाला. आता महाराष्ट्रातही उपेक्षित वर्गाचा आवाज विधीमंडळात पोहोचवण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बसपा ची सत्ता न आल्यास नव्या सरकारमध्ये सहभागी होऊन जनेतला न्याय देऊ
मायावती यांनी यावेळी बसपने स्वबळावर लढण्याचा निर्णय का घेतला यावरही भाष्य केले. त्यांनी सांगितले की, यापूर्वी इतर पक्षांसोबत आघाडी करून निवडणुका लढवल्या, पण त्यावेळी दलितांची मते आघाडीतील इतर पक्षांच्या उमेदवारांकडे वळली. मात्र, या पक्षांमध्ये असलेल्या जातीवादी मानसिकतेमुळे बसपाच्या उमेदवारांना त्यांच्याकडून पूर्ण पाठिंबा मिळाला नाही. त्यामुळे लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.यासोबतच बसपा ची सत्ता न आल्यास नव्या सरकारमध्ये सहभागी होऊन जनेतला न्याय देऊ असे आश्वासन मायावती यांनी यावेळी दिले.
जातीयवाद व भांडवलशाहीवर हल्ला
मायावतींनी कॉंग्रेस, भाजप आणि इतर पक्षांच्या जातीवादी आणि भांडवलशाही विचारसरणीवर टीका केली.
त्यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशात याआधी या पक्षांचे गठबंधन सरकार आले,
परंतु दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, मुस्लिम आणि ओबीसींच्या परिस्थितीत फारसा बदल दिसला नाही.
बेरोजगार, शेतकरी आणि मजुरांची स्थितीही हलाखीचीच राहिली.
त्या पुढे म्हणाल्या, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात उपेक्षित वर्गांच्या उन्नतीसाठी कायदेशीर अधिकार दिले आहेत. त्यामुळे यंदा या पक्षांना मतदान करून अपमानित होऊ नका.”
मायावती यांनी सभेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मतदारांना पक्षाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आणि बसपच्या माध्यमातून उपेक्षित समाजाला प्रतिनिधित्व मिळवून देण्याचा विश्वास व्यक्त केला.
Support Jaaglyabharat.com
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 17,2024 | 19:40 PM
WebTitle – mayawati-promises-justice-maharashtra-elections-bsp-campaign