30 जानेवारी 2025| स्थानिक माध्यमांनी बुधवारी स्टॉकहोमजवळील सोडरटेल्जी येथील एका अपार्टमेंटमध्ये कुराण जाळणाऱ्या ३८ वर्षीय सालवान मोमिका Salwan Momika यांना गोळी झाडून ठार मारल्याची बातमी दिली आहे. मोमिका, जो इराकी मूळचा स्वीडनमध्ये राहात होता, त्याने २०२३ मध्ये स्टॉकहोम सेंट्रल मशिदीसमोर कुरान जाळल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर वाद निर्माण झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केल्याचे सांगितले आहे.
कोर्टातील खटल्याचा निकाल पुढे ढकलला
स्टॉकहोम जिल्हा न्यायालयाने गुरुवारी एखाद्या धार्मिक गटाविरुद्ध द्वेष पसरवण्याच्या आरोपावर निकाल जाहीर करणार होते,
पण मोमिकाच्या मृत्यूमुळे ते पुढे ढकलण्यात आले. मोमिका सोशल मीडियावर लाईव्ह प्रसारण करत असताना गोळीबार झाल्याचे स्थानिक वृत्तांत सांगतात.
कुरान जाळण्यामुळे झालेली हिंसा

या घटनेपूर्वी, मोमिकाने स्वीडनमधील माल्मो शहरात वार्नहेम्स्टॉर्गेट स्क्वेअरवर कुरान जाळल्यामुळे हिंसक निदर्शने सुरू झाली होती. निदर्शकांनी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती आणि रोसेंगार्ड परिसरात पोलिस वाहने आणि इतर वाहने आगीच्या हवाली करण्यात आली होती. या घटनेत १० जणांना अटक करण्यात आली. माल्मो पोलिस अधिकारी पेट्रा स्टेनकुला यांनी हिंसा आणि विध्वंसाला “अत्यंत दुर्दैवी” असं म्हटलं होतं.
BREAKING:
— Globe Eye News (@GlobeEyeNews) January 30, 2025
Anti-Islam extremist Salwan Momika, known for burning the Quran several times, was shot dead in Sweden. pic.twitter.com/eyPlUWr0nU
स्वीडनचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा वाद
स्वीडन सरकारने मोमिकाला कुरान जाळण्याची परवानगी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कायद्याखाली दिली होती, पण या घटनेनंतर धार्मिक पुस्तके जाळण्यावर बंदी घालण्याची शक्यता तपासण्याचे आश्वासन दिले आहे. डेन्मार्कनेसुद्धा अलीकडे पवित्र ग्रंथांचे अपमान करण्यावर बंदीचा प्रस्ताव मांडला आहे.
आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया
कुराण जाळणाऱ्या Salwan Momika सालवान मोमिका च्या कृत्यांमुळे मध्यपूर्व आणि इतर मुस्लिम-बहुल देशांमध्ये तीव्र निषेध नोंदवला गेला. इराकमध्ये स्वीडिश दूतावासावर दोनदा हल्ले झाले आणि स्वीडनच्या राजदूताला बागदादहून हद्दपार करण्यात आले. या संदर्भात, स्वीडनच्या सरकारने धार्मिक संवेदनांना धक्का देणाऱ्या कृत्यांना रोखण्यासाठी कायद्यात बदल करण्याची तयारी दर्शवली आहे.
पूर्वीचे घटनाक्रम
या वर्षी जूनमध्ये, मोमिकाने ईद-उल-अजहाच्या पहिल्या दिवशी स्टॉकहोम मशिदीसमोर कुरान जाळली होती.
त्याआधी, डॅनिश राजकारणी रास्मस पालुदान याने तुर्की दूतावासासमोर कुरान जाळून प्रचंड वाद निर्माण केला होता.
अशा घटनांमुळे स्कँडिनेव्हियन देशांमध्ये धार्मिक सहिष्णुतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 30,2024 | 16:38 PM
WebTitle – Man who burned Quran ‘shot dead in Sweden