पुणे: महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये सकल ब्राह्मण समाजाने एक मोठा निर्णय घेतला आहे. विधानसभा पोटनिवडणुकीत ब्राह्मण समाजाला उमेदवारी न दिल्याने नाराज झालेल्या या समाजाने आता महायुतीला समर्थन देण्याची भूमिका घेतली आहे. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी विविध मतदारसंघांत ब्राह्मण समाजातील उमेदवारांना संधी दिली आहे, त्यामुळे हा पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भाजपकडून दाखविण्यात आलेल्या सकारात्मक
राज्यातील ब्राह्मण संघटनांच्या मुख्य समन्वयक भालचंद्र कुलकर्णी, समन्वयक चैतन्य जोशी, मयूरेश अरगडे यांनी ही घोषणा केली.
समाजाची काही मतदारसंघांमध्ये प्रभावशाली उपस्थिती असल्याचे म्हटले आहे, आणि त्यामुळे या उमेदवारांना संधी मिळावी, अशी मागणी संघटनांकडून करण्यात आली होती. महायुतीच्या या सकारात्मक प्रतिसादानंतर, सकल ब्राह्मण समाजाने महायुतीला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
या निवडणुकीत महायुतीतून देवेंद्र फडणवीस (नागपूर), संजय केळकर (ठाणे), अतुल भातखळकर (कांदिवली), पराग अळवणी (विलेपार्ले) यांच्यासह राजन नाईक (नालासोपारा), सुधीर गाडगीळ (सांगली), उदय सामंत (रत्नागिरी), किरण सामंत (राजापूर) इतर ब्राह्मण उमेदवारांना संधी मिळाली आहे. तसेच, भाजपने राजेश पांडे यांना महामंत्रिपदी नेमणूक केली असून माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांना राज्यसभा सदस्यपदी स्थान देण्यात आले आहे.
भाजपकडून दाखविण्यात आलेल्या सकारात्मक भावनेचा स्वीकार करत,
आगामी विधानसभा निवडणुकीत सकल ब्राह्मण समाज महायुतीला पाठिंबा देईल, असे भालचंद्र कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
ब्राह्मण उमेदवार न दिल्याने ब्राह्मण समाजामध्ये नाराजी झाली होती
मागील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत पुणे शहरात एका बॅनरची चर्चा झाली होती. या बॅनरद्वारे मतदारांना रचनात्मक पद्धतीने अपील करण्यात होते,
26 फेब्रुवारीच्या मतदानात NOTA बटण दाबा. महाराष्ट्रातील दोन विधानसभा मतदारसंघांवर पोटनिवडणुकीत ही मोहीम चालवण्यात आली होती.
दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या जागी सहानुभूतीच्या भावनेतून त्यांचे पती शैलेश टिळक किंवा मुलगा कुणाल टिळक यांना तिकीट दिले जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, भाजपने हेमंत रासने यांना तिकीट दिल्याने ब्राह्मण समाज नाराज झाला होता.
या मतदारसंघात ब्राह्मणांची संख्या सुमारे 30 टक्के आहे. पुण्यालगतच्या पिंपरी-चिंचवड मधील चिंचवड मतदारसंघात दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना तिकीट देण्यात आले होते. तिथे महिला असल्यामुळे सहानुभूतीचे मत मिळेल, अशी अपेक्षा होती. पण पुण्यात मात्र पत्नीच्या मृत्यूनंतर पतीला तिकीट मिळाले नाही. त्यामुळे येथे ब्राह्मण समाजामध्ये नाराजी झाली होती. याच नाराजीमुळे ब्राह्मण सभा व हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनीही निवडणुकीत उभे राहण्याचा निर्णय घेतला होता. भाजपच्या आग्रहानंतरही त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली नाही. महाविकास आघाडीने येथे एकत्र येऊन काँग्रेसचे उमेदवार म्हणून रविंद्र धंगेकर यांना मैदानात उतरवले होते,आणि ते विजयी झाले होते.
पुण्यातील मोदी गणपती परिसरात काही अज्ञात व्यक्तींनी मराठीत संदेश लिहून एक बॅनर लावला होता, त्यात म्हटले आहे –
“आमचं ही आता ठरलंय
कसबा सीट गाडगीळांचा
कसबा सीट बापटांचा
कसबा सीट टिळकांचा
का काढला आमच्याकडून कसबा
आम्ही दाबणार NOTA”
या संदेशातून दिवंगत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबाला तिकीट न दिल्याने ब्राह्मण समाजाची नाराजी स्पष्ट झाली होती.

आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 27,2024 | 15:22 PM
WebTitle – Maharashtra Assembly Election: Sakal Brahmin Samaj Announces Major Decision