हल्द्वानी: उत्तराखंड मधिल प्रसिद्ध यूट्यूबर सौरव जोशी ला लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावावर खंडणीची धमकी देणाऱ्या आरोपीला हल्द्वानी पोलिसांनी अटक केली आहे. सौरव जोशी ला धमकीचे पत्र मिळाल्यानंतर पोलिसांनी त्वरीत हालचाल करत आरोपीला पकडले. आरोपीने सौरवला ठरलेल्या वेळेत पैसे न दिल्यास त्याच्या कुटुंबातील एका सदस्याला ठार मारण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी या प्रकरणात त्वरीत कारवाई करत सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीला अटक केली.
नैनीतालचे एसएसपी पीएन मीणा यांच्या मते, लॉरेन्स बिश्नोई गँग च्या नावाने यूट्यूबर सौरव जोशी ला धमकावणाऱ्याला अटक करण्यात आली असून,
आरोपीचे नाव अरुण कुमार आहे, जो उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातील रहिवासी आहे. सध्या तो मोहाली येथे वॉचमन म्हणून काम करत होता.
या धमकीमुळे सौरव जोशी आणि त्याचे कुटुंब खूप घाबरले होते
सौरव जोशी ला मिळालेल्या धमकीच्या पत्रात सांगितले गेले की, त्याला दोन कोटी रुपये खंडणी द्यावी लागेल, आणि जर ही रक्कम पाच दिवसांच्या आत दिली नाही, तर त्याच्या कुटुंबातील कोणाला तरी ठार मारले जाईल. या धमकीमुळे सौरव जोशी आणि त्याचे कुटुंब खूप घाबरले होते. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
या प्रकरणात पोलिसांनी फार जलदगतीने काम केले. हल्द्वानी कोतवाली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले, ज्यामुळे माहिती मिळाली की आरोपीने सौरवच्या घराची रेकी केली होती आणि तेथे खंडणी मागण्याचा कट आखला होता. पोलिसांनी त्याचे ठिकाण शोधून काढले आणि त्याला अटक केली.
पैसे कमवण्यासाठी अंमली पदार्थांचा व्यवसाय
अटक झालेल्या आरोपी अरुण कुमारने चौकशीदरम्यान सांगितले की,
तो आधी मोहालीच्या झीरकपूर भागातील रेडिसन हॉटेलमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता.
नोकरी दरम्यान, त्याने शॉर्टकटने पैसे कमवण्यासाठी अंमली पदार्थांचा व्यवसाय सुरू केला होता.
हॉटेल प्रशासनाला याची माहिती मिळाल्यानंतर त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले.
अरुण कुमारने मग नवीन योजना आखली आणि यूट्यूबर सौरव जोशीला धमकावून खंडणी मागण्याचा विचार केला.
त्याने सौरवला धमकी दिली आणि सांगितले की त्याने लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावावर रंगदारीची रक्कम द्यावी.
पोलिसांनी आरोपीविरोधात एफआयआर क्रमांक 399/2024, कलम 308(4), 351(3), 351(4) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सध्या पोलिस आरोपीची चौकशी करत आहेत आणि या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
Support Jaaglyabharat.com
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 19,2024 | 12:34 PM
WebTitle – Lawrence Bishnoi threatens YouTuber Sourav Joshi