आयकर विभागाने ३ मार्च रोजी निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या घरावर छापे टाकले.फॅन्टम फिल्म कंपनीच्या कथित कर चुकवेगिरी केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ताज्या अपडेट्सनुसार आयकर विभागाने शुक्रवारी उशीरा रात्री पर्यंत अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू शी ३५० कोटी कर चोरीच्या प्रकरणी चौकशी केली. यादरम्यान आता तीन दिवसानंतर तापसी पन्नूने तिच्यावर लागलेल्या आरोपांसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
पहिल्या पोस्टमध्ये तापसी पन्नूने ट्विटमध्ये लिहिले की, तीन दिवस केलेल्या कसून चौकशीतून तीन गोष्टी समोर आल्या आहेत. पॅरिसमधील ज्या कथित बंगल्याची चावी माझ्याकडे असल्याचे बोलले जात आहे, ज्याची मी स्वतः मालकीण आहे. तिथे मी कधी उन्हाळ्याच्या सुट्टीत गेलेले नाही.
पाच कोटींची पावती मिळाल्याच्या आरोपावर तापसीने दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पाच कोटींची कोणतीच रिसिप्ट तिच्याकडे नाही आणि हे नाकारलेले पैशाचे रिसीप्ट पुढील नाटकाच्या प्लॉटसाठी सेव्ह करून ठेवा.
शेवटच्या तिसऱ्या ट्विटमध्ये ती म्हणाली की, अर्थमंत्री यांच्यानुसार, २०१३ ला माझ्या येथे छापे टाकले होते. त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही.(हा मुद्दा दिग्दर्शक अनुराग कश्यप शी संबंधित आहे.)
आता मी स्वस्त राहिलेले नाही,(महागडी ठरले) असे म्हणत तापसीने कंगनावर निशाणा साधला कारण कंगना राणौतने तिला बऱ्याचदा स्वस्त कॉपी असे संबोधले आहे.
तापसी पन्नूच्या या ट्विट्सवरून स्पष्ट होते की ज्या तीन गोष्टींच्या आधारावर
तिच्या घरावर छापे टाकण्यात आले होते त्या आरोपांत तथ्य नसल्याचे तिने सांगितले आहे.
सध्या आयटी विभागाची तपासणी कुठपर्यंत पोहचली आहे आणि त्यांचा काय निष्कर्ष आहे,हे सर्वांना जाणून घ्यायचे आहे.
- टीम जागल्या भारत
चिपळूण पुरग्रस्तांना महिला बचत गटांनी दिला मदतीचा हात
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
First Published on March 06, 2021 16 :00 PM
WebTitle – i’m not affordable anymore tapsi pannu finally breaks silence income tax raid