दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांचा काश्मिरी पंडितांवर आधारित ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्च रोजी देशभरातील ७०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला.1990 मध्ये काश्मीर खोऱ्यातील काश्मिरी पंडितांच्या दुरवस्थेवर भाष्य करणारा The Kashmir Files हा चित्रपट दोन राज्यात टॅक्स फ्री कऱण्यात आला आहे.
या चित्रपटातील अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या भूमिका असून आता हरियाणा सरकारने ‘द काश्मीर फाइल्स’ The Kashmir Files टॅक्स फ्री करमुक्त करण्याची घोषणा केली आहे, यासंदर्भात राज्यातील सर्व सिनेमागृहांना आदेश जारी करण्यात आल्या आहेत.हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
तिकिटांवर नाही लागणार GST
एक आदेश जारी करून उत्पादन शुल्क आणि कर विभागाने सांगितले की, ‘द काश्मीर फाइल्स’ संपूर्ण हरियाणामध्ये 6 महिन्यांसाठी करमुक्त करण्यात आली आहे. राज्यातील प्रेक्षक आता कमी पैशात हा चित्रपट पाहू शकतील आणि काश्मिरी पंडितांच्या वेदना समजून घेऊ शकतील. या चित्रपटाच्या तिकिटांवर पुढील सहा महिने जीएसटी लागणार नाही. सर्व उत्पादन शुल्क व कर उपायुक्तांनी हा आदेश जारी करून 14 मार्चपर्यंत कारवाईचा अहवाल मुख्यालयाला पाठवायचा आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री (Vivek Ranjan Agnihotri) यांनी
हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे ट्विट करून आभार मानले आहेत.
The Kashmir Files टॅक्स फ्री करण्याच्या निर्णयावर विवेक रंजन अग्निहोत्री म्हणाले,खूप खूप धन्यवाद मनोहरलाल खट्टर,तुमच्या या निर्णयामुळे सामान्य कुटुंबांना कोरोनाच्या काळात आर्थिक अडचणींनंतर हा चित्रपट पाहण्यासाठी खूप मदत होईल. त्याचबरोबर सिनेमा हॉलच्या व्यवसायालाही बळ मिळणार आहे.
The Kashmir Files प्रदर्शनापूर्वी झाला वाद
यापूर्वी जम्मू-काश्मीर न्यायालयाने दिवंगत स्क्वाड्रन लीडर रवी खन्ना यांचा समावेश असलेले दृश्य दाखवण्यापासून
चित्रपट निर्मात्यांना मनाई केली होती.
खरं तर, ‘द काश्मीर फाइल्स’मध्ये 1990 मध्ये शहीद झालेल्या स्क्वाड्रन लीडर रवी खन्ना यांच्यावर
काही दृश्ये चित्रित करण्यात आली आहेत. त्याचा प्रीमियर शो पाहिल्यानंतर
रवी खन्ना यांच्या पत्नी शालिनी खन्ना यांनी आक्षेप घेतला की,
चित्रपटात दाखवलेली दृश्ये वस्तुस्थितीच्या विरुद्ध आहेत.ही दृश्ये हटवण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती न्यायालयात करण्यात आली.
पहिल्या दिवशी या चित्रपटाने 3 कोटी 55 लाखांची कमाई केली असून विकेण्डला हा सिनेमा आणखी कमाई करेल,
असा अंदाज वर्तवला जात आहे.The Kashmir Files First Day collection.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स
झुंड चित्रपट बजेट:किती करोडमध्ये बनला? आतापर्यँतचे कलेक्शन
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
झुंड मुव्ही: रितेश देशमुख यांची पोस्ट व्हायरल; दोन भारताचा विचार..
झुंड चित्रपट:सुबोध भावे ची पोस्ट ,”नागराज तू आमच्या पिढीचा…”
Jhund film।झुंड चित्रपट,आंबेडकरांचे पोस्टर व्हायरल,पाहा रिलीज डेट
जयभीम चित्रपट थांबायचे नाव घेईना ,चीन मध्ये ठरतोय लोकप्रिय
Pushpa movie box office collection|पुष्पा फिल्म बॉक्स ऑफिस
आंबेडकर आणि पेरियार यांचं भगत सिंग यांच्या बलिदानावर मत..
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 12, 2022 21: 36 PM
WebTitle – Kashmir files movie tax free, no GST