आम्ही जेव्हा कर्मवीर भाऊराव पाटील आण्णांचा विचार करतो तेव्हा डोळ्या समोर येतं ते रयत शिक्षण संस्थेचं भलं मोठं वटवृक्ष. परंतू, याच्या मागची पार्श्वभुमी पाहिली असता जातीयव्यवस्थेविरोधी प्रचंड चीड असलेलं एका खमक्या क्रांतिकारी बंडखोरांचं चित्र स्पष्ट दिसतं आणि तो बंडखोर म्हणजे भाऊरावं पाटील..!!
जातीय व्यवस्थेविरुद्ध ठिणगी
कर्मवीर भाऊराव पाटील आण्णा केवळ शिक्षण महर्षीच नव्हते तर, अन्याय
आणि विषमतेची चिड असणाऱ्या महात्मा फुलें, शाहू महाराज आणि संत गाडबेबाबा यांच्या विचारांनी प्रेरीत झालेले जबरी बंडखोर होते.
दलितांना विहारीवर पाणी भरू दिलं जात नाही,
हे पाहून त्या विहीरीचा रहाटच मोडून टाकणाऱ्या आण्णांच्या मेंदूत ही जातीय व्यवस्थेविरुद्ध ठिणगी त्यांच्या बालवयातच पडली होती.
पावसाळ्याच्या दिवसात सर्वजण वर्गात आणि एकच पोरगं अस्पृश्य आहे म्हणुन वर्गाच्या बाहेर खंडीत कुडकुडत बसलेलं पाहून,
आण्णांनी त्याला घरी आणलं, जेवू घातलं आणि कोल्हापुरच्या मिस क्लार्क हाॅस्टेलमधे दाखल केलं तोच पोरगा पुढे शिकला,
विधीमंडळाचा सभासद झाला आणि डाॅ. बाबासाहेबांनी सुरू केलेल्या मुकनायकचा काहीकाळ संपादक ही झाला.
कर्मवीर आण्णा हे महात्मा फुलें यांच्या सत्यशोधक चळवळीचे कर्ते आणि सक्रिय कार्यकर्त्ये राहीले आहेत.
यातून त्यांनी समाज प्रबोधनाचं काम केलं, आणि तळागाळतला विदारक समाज त्यांना आणखी स्पष्टपणे दिसला.
एवढे सारे अनर्थ एका अविद्येने
या सर्व जडणघडणीचा शेवट सुवर्ण कळस म्हणुन, ‘विद्येविना मती गेली; मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली!गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले.’ ही महात्मा फुलेंची खंत बरोब्बर ओळखुन, एक पाऊल पुढे जात, आण्णांनी थेठ विद्येलाच बहूजणांच्या घराघरात, गावा-गावात पोचवले आणि विशाल रयत शिक्षण संस्थेचं जाळं तयार झालं.खेड्यापाड्यात गोरगरीब बहूजनांची पोरं दिसतील तिथून त्यांना उचलून आपल्या वस्तीगृहात आणुन, त्यांना पोटच्या पोराप्रमाणे सांभाळत स्वावलंबी शिक्षणाचा, कमवा आणि शिका हा मंत्र दिला.विविध जाती धर्माची ही पोरं, एकत्र राहून, स्वतः हाताने स्वयंपाक करीत आणि एकत्रपणे जेवत असत.
त्यांच शिक्षण केवळ क्रमिक पाठ्यपुस्तकाचं नव्हतं तर,समता,बंधुता, बहुजनांचा सर्वांगीण विकास
हेच ध्येय डोळ्या समोर ठेवून त्यांनी रयतची स्थापन केली आणि बहुजणांना शहाणं केलं.
या सगळ्या क्रांतीकारी परिवर्तनात आण्णांच्या खांद्याला खांदा लावून
ऊभी असलेली सावित्रीची लेक, त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांना कदापी विसरतां येणार नाही.
मला इथे आणखी एक साधर्म्य असणारी गोष्ट नमूद करावी वाटते ती म्हणजे, सावित्रीमाई घ्या, अण्णाची पत्नी लक्ष्मीवहिनी घ्या, आणि मातारमाई या तिघींची खंबीरसाथ आणि पराकोटीचा त्याग हा या महामानवांना आणखी महान करतो.या माऊलींनी गरीब वंचित शोषित मुलांच्या शिक्षणासाठी आपल्या अंगावरील दागिने सुद्धा विकून टाकले.
आण्णाचं हे कार्य पाहून, बाबासाहेबांनी रयत शिक्षण संस्थेला भेट देवून,देणगी सुद्धा दिलीय याची नोंद आजही सातारच्या मुख्यालयात पाह्यला मिळते.महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, संत गाडगेबाबा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यात जी क्रांतीचं बीज होती,जो बंडखोर पणा होता, तोच कर्मवीर आण्णां अंगी होता.
रयत शिक्षण संस्थेच्या शाखा
महाराष्ट्रात ४ जिल्यात व कर्नाटक राज्यात मिळून ६७५ शाखा आहेत.त्यामध्ये २० पूर्वप्राथमिक,२७ प्राथमिक,४३८माध्यमिक,८ आश्रमशाळा,८ अध्यापक विद्यालय,२ आय.ट.आय,व ४१ महाविध्यालायांचा समावेश आहे.
रयत शिक्षण संस्थेचे जनक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त त्यांच्या उत्तुंग कार्यास विनम्र अभिवादन
कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
महात्मा जोतीबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 22, 2021 13:21 PM
WebTitle – Karmaveer Bhaurao Patil