दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) अभिनित बहुचर्चित चित्रपट ‘झुंड’ (Jhund) प्रदर्शित झाला. अपेक्षेनुसार या चित्रपटाने शुक्रवारी म्हणजेच पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली ओपनिंग दिली. नागराज नेहमीच वेगळ्या विषयांना हात घालून प्रेक्षकांना नवा अनुभव देत असतात त्यामुळे हा चित्रपटही लोकांच्या पसंतीस उतरला आहे आणि त्यामुळेच चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही कोटींचा टप्पा गाठला आहे.या चित्रपटाची जोरदार चर्चा सध्या सोशल मिडियात पाहायला मिळत आहे.अशातच एका निर्मात्याने या चित्रपटावर स्थगिती देण्यात यावी अशी याचिका दाखल केली. न्यायालयाने या निर्मात्याला दहा लाखांचा दंड सुनावलाय.
‘झुंड’ हा चित्रपट अगोदरपासूनच वादात सापडला होता,त्याचे कारण या चित्रपटाच्या रिलीजला स्थगिती देण्यात यावी अशी याचिका न्यायालयात करण्यात आली होती.हा चित्रपट फुटबॉलपटू अखिलेश पॉल यांच्या जीवनावर आधारित असल्याचा दावा नंदी चिन्नी कुमार यांनी याचिकेत केला होता.नंदी कुमार या चित्रपट निर्मात्याने सांगितले की त्यांनी 2017-18 मध्ये चित्रपट बनवण्यासाठी कथेचे हक्क विकत घेतले होते. मात्र, अमिताभ बच्चन अभिनित झुंड हा चित्रपटही त्याच कथानकावर असल्याचे त्याला समजले.त्यामुळे त्यांनी स्थगितीसाठी याचिका दाखल केली.
झुंड सिनेमाला स्थगिती मागणाऱ्याला दहा लाखांचा दंड
हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर झुंड चित्रपटाचे निर्माते आणि नंदी चिन्नी कुमार यांच्यात एक समझोता झाला. कुमार यांच्या अटी मान्य करत त्यांना ५ कोटींची रक्कमही देण्यात आली, मात्र हे संपूर्ण प्रकरण संपेपर्यंत चित्रपट प्रदर्शित करू नये असं न्यायालयानं म्हटलं होतं. मात्र त्याआधीच हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानं न्यायालयानं कुमार यांची याचिका अमान्य करत न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप केल्याप्रकरणी त्यांना १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
याचिकाकर्ते, नंदी चिन्नी कुमार यांनी सांगितले की त्यांनी या कथेवर चित्रपट बनवण्याचे अधिकार घेतले आहेत आणि त्याच्या प्रदर्शनावर स्थगिती मागितली आहे. परंतु उच्च न्यायालयात त्याच्या याचिकेवर न्यायालयाच्या रजिस्ट्रीमधून काही आक्षेप घेण्यात आले. मुख्य न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती अभिनंद कुमार सावली यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळताना रजिस्ट्रीचा आक्षेप कायम ठेवला आणि त्याने एका जिल्ह्यात दाखल केलेल्या खटल्याशी संबंधित माहिती दडपण्याचा निर्णय का घेतला, अशी विचारणा याचिकाकर्त्याच्या वकिलांना केली.वकिलांकडून न्यायालयाला याचिकाकर्त्याची बाजू पटवून न देता आल्यामुळे न्यायालयाने याचिकाकर्ते, नंदी चिन्नी कुमार याना दहा लाखाचा दंड ठोठावला.
चित्रपट निर्मात्यांचे प्रतिनिधीत्व करणारे वरिष्ठ वकील एल रवी चंदर यांच्या युक्तिवादाशी सहमती दर्शवत खंडपीठाने म्हटले की याचिकाकर्ता स्वच्छ हेतूने न्यायालयात आला नाही.
न्यायालयाने दंडाची ही रक्कम एका महिन्याच्या आत प्रधानमंत्री कोविड-19 रिलीफ फंडात भरण्याचे निर्देश याचिकाकर्ते, नंदी चिन्नी कुमार याना दिले आहेत.रक्कम वेळेत जमा न केल्यास, जिल्हाधिकार्यांनी ३० दिवसांच्या आत महसूल वसुली कायद्यांतर्गत ती वसूल करून ती पीएम फंडात पाठवावी असे आदेशही न्यायालयानं दिले आहेत.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स
Jhund Box Office Collection Day 2 झुंड चं दोन दिवसांचं कलेक्शन
झुंड मुव्ही: रितेश देशमुख यांची पोस्ट व्हायरल; दोन भारताचा विचार..
झुंड चित्रपट:सुबोध भावे ची पोस्ट ,”नागराज तू आमच्या पिढीचा…”
B झुंड सिनेमा : तीनचार परिप्रेक्ष्यांतून पाहायचा चित्रपट
C झुंड सिनेमा : सुपरस्टार धनुष म्हणाला “निःशब्द झालोय”
Jhund film।झुंड चित्रपट,आंबेडकरांचे पोस्टर व्हायरल,पाहा रिलीज डेट
जयभीम चित्रपट थांबायचे नाव घेईना ,चीन मध्ये ठरतोय लोकप्रिय
Pushpa movie box office collection|पुष्पा फिल्म बॉक्स ऑफिस
बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शिवजयंती च्या मिरवणुकीत सामील होतात
आंबेडकर आणि पेरियार यांचं भगत सिंग यांच्या बलिदानावर मत..
व्हॅलेंटाईन डे – मर्दानी लढवय्यी वीर सूपुत्री भीमाच्या लेकीला समर्पित
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 07, 2022 15: 52 PM
WebTitle – jhund cinema: Producer seeking adjournment fined Rs 10 lakh