22 जानेवारी 2025 |जळगाव, महाराष्ट्र: महाराष्ट्रातील जळगाव जवळ परधाडे रेल्वे स्थानकावर एक मोठा रेल्वे अपघात घडला आहे. पुष्पक एक्सप्रेसमध्ये अचानक आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर प्रवाशांमध्ये खळबळ माजली. या घबराटीत प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या, ज्यामुळे दुसऱ्या मार्गावरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसच्या धडकेत 8 जणांचा मृत्यू झाला. अनेक जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जळगाव रेल्वे अपघात ,घटना कशी घडली?
पुष्पक एक्सप्रेस लखनऊवरून मुंबईकडे जात असताना जळगाव च्या परधाडे रेल्वे स्थानकाजवळ थांबली होती. गाडीच्या B4 डब्यात स्पार्किंग झाल्यामुळे आग लागल्याची अफवा पसरली. या घबराटीत प्रवासी ट्रेनमधून उड्या मारून रुळांवर आले. त्याचवेळी मनमाडवरून भुसावळकडे जाणारी कर्नाटक एक्सप्रेस दुसऱ्या ट्रॅकवरून जात होती. अशातच हा अपघात घडला असून या अपघातात 8 ते 10 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
चहावाल्याने दिली आग लागल्याची बातमी
जखमी झालेल्या लखनौच्या एका प्रवाशाने सांगितले की, “एका चहावाल्याने माहिती दिली की ट्रेनमध्ये आग लागलीय. त्यावेळी पुष्पक एक्सप्रेस परधाडे रेल्वे स्थानकाजवळ उभी होती. चहावाल्याने दिलेल्या आगीच्या बातमीने सगळे घाबरून पळायला लागले. काही जणांनी गाडीतून खाली उड्या मारल्या. त्याचवेळी दुसऱ्या मार्गावरून कर्नाटक एक्सप्रेस येत होती.कर्नाटक एक्सप्रेसच्या इंजिननंतर फक्त तीन डबेच पुढे गेले. जर संपूर्ण ट्रेन पुढे गेली असती, तर सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला असता. या अपघातामुळे सगळ्यांची अवस्था गंभीर झाली आहे.”
हा अनुभव ऐकून या अपघाताचे गांभीर्य समजते. अफवांवर विश्वास ठेवून घेतलेले घाईगडबडीचे निर्णय किती घातक ठरू शकतात,
याचा हा मोठा धडा आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना घाबरविणाऱ्या अशा अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
Maharashtra | Passengers of Pushpak Express were hit by Karnataka Express train in Jalgaon District. The passengers were outside their coaches suspecting some fire in the train. Railway officials and other staff have reached the spot. More details awaited. pic.twitter.com/SOUfu9lO7y
— ANI (@ANI) January 22, 2025
कर्नाटक एक्सप्रेस: मार्ग आणि वेळापत्रक
कर्नाटक एक्सप्रेस भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाते आणि ही ट्रेन बेंगळुरू सिटीवरून नवी दिल्लीपर्यंत धावते. तीन दिवसांच्या प्रवासानंतर ती नवी दिल्लीला पोहोचते. बेंगळुरूहून निघाल्यावर या ट्रेनचा क्रमांक 12627 असतो आणि दिल्लीहून निघाल्यावर 12628. ही गाडी आठवड्यातील सातही दिवस चालते.
पुष्पक एक्सप्रेस: मार्ग आणि थांबे
पुष्पक एक्सप्रेस लखनऊ जंक्शनहून सुरू होते आणि मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत जाते.
या मार्गात ती उन्नाव, कानपूर सेंट्रल, उरई, झाशी, भोपाल, खंडवा, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, कल्याण जंक्शन
आणि दादर अशा 16 रेल्वे स्थानकांवर थांबते.
अधिकाऱ्यांची कारवाई आणि स्थिती
जिल्हा प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना जलद वैद्यकीय मदत पुरवली जात आहे. रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. प्रवाशांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 22,2024 | 20:37 PM
WebTitle – jalgaon-Pushpak-Express-train-accident-fire-rumor-passengers-death
#JalgaonTrainAccident #PushpakExpress #KarnatakaExpress #RailwaySafety #TrainFireRumor #IndianRailways