उत्तरप्रदेश. दि.17 – देश विदेशात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत असताना भारतातील काही विशिष्ट जातीत मात्र डॉक्टर आंबेडकरांच्या विषयी कमालीचे विष तयार होताना दिसत असते.कालच अमेरिकेच्या संसदेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव केल्याची बातमी होती.जयप्रकाश मिश्रा नामक व्यक्तीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना केली आहे.एवढेच नाहीतर विटंबना करत असताना त्याने आणखी नीच कृत्य केले आहे.
ज्या महामानवला जगाच्या विविध देशात आदर सन्मान मिळतो त्या महापुरुषाला जन्म झालेल्या देशात मात्र केवळ जातीमुळे द्वेष आणि जातीयवादी वागणूक दिली जाते.त्यांना जीवंतपणी यातना मिळाल्याच परंतु मरणोपरांत देखील त्यांची विटंबना ब्राह्मणी विचारांच्या लोकांकडून सातत्याने होताना दिसून येते.
अशीच एक घटना उत्तरप्रदेश मध्ये घडली असून यामुळे उत्तरप्रदेशात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.आरक्षणाला आमचा विरोध आहे अशी बतावणी करत जयप्रकाश मिश्रा नामक व्यक्तीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना केली आहे.एवढेच नाहीतर विटंबना करत असताना त्याने आणखी नीच कृत्य केले आहे.ज्याबद्दल आम्ही लिहू सुद्धा शकत नाही.
या घटनेमुळे देशभरात संताप व्यक्त केला जात असून विकृत जयप्रकाश मिश्रा याला अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
जयप्रकाश मिश्रा ने या देशविघातक कृत्याचा व्हिडिओ सोशल मिडियात शेअर करून विकृत पद्धतीने प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न केला आहे.
#Arrest_प्रकाश_मिश्रा हा हॅशटॅग ट्विटरवर टॉप ट्रेंड करत असून हा हॅश टॅग वापरुन लोक आपला संताप व्यक्त करत आहेत. तसेच विकृत प्रकाश मिश्राला अटक करण्याची मागणी करत आहेत.
हा जातीयवादी जयप्रकाश मिश्रा राष्ट्रवादी समाज पार्टीचा अध्यक्ष असल्याचा दावा एका पोस्टर मध्ये करण्यात आला आहे.

किती दुर्दैवी मानसिकता आहे.ज्या महामानवाला जगात मान सन्मान मिळतो लोक आदराने त्यांना नमन करतात
त्या महामानवाची केवळ जातीच्या मुद्यावरून विटंबना होते,अपमानास्पद वागणूक दिली जाते.
ओबीसी महासभा ने केला तीव्र निषेध राष्ट्रपतींना पत्र
ओबीसी महासभा ने या संतापजनक कृत्याचा निषेध करत राष्ट्रपती रामनाथ कोविड यांना पत्र लिहून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

टीम जागल्या भारत या घटनेचा अतिशय तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत आहे.
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
First Published on APRIL 17, 2021 11: 21 AM
WebTitle – Jaiprakash Mishra burnt the image of Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar; Tension in UP 2021-04-17