उत्तर प्रदेशच्या शहजादी खान ला UAE दुबईमध्ये एका बालकाच्या हत्येच्या आरोपात फाशी देण्यात आली. ही घटना केवळ भारतीय समुदायासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी एक मोठा धक्का होती.लोकशाही नसणाऱ्या देशात कायदे कशाप्रकारे राबवले जातात याचे सुद्धा हे एक उदाहरण म्हणता येईल.
शहजादीचे जीवन आणि आरोप
शहजादी खान उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातील रहिवासी होती. ती दुबईमध्ये एका घरात मोलकरीण म्हणून काम करत होती, जिथे तिला चार महिन्याच्या बाळाची काळजी घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ज्यादिवशी ही घटना घडली त्यादिवशी ती या बाळाला डोस देण्यासाठी घेऊन गेली होती.मात्र त्यानंतर बाळाची तब्बेत बिघडली आणि संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला.बाळाच्या मृत्यूनंतर, शहजादीवर बाळाची हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला. या प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित झाले होते, ज्यातील एक प्रश्न होता की बाळाचा मृत्यू हिंसा किंवा वैद्यकीय कारणांमुळे झाला का?

विशेष बाब ही एक बाळाच्या पालकांनी शिशुच्या शव विच्छेदनास नकार दिला होता,यामुळे बाळाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ही बाब शेवटपर्यंत उघड होऊ शकली नाही.
चौकशी आणि न्यायालयीन प्रक्रिया
मात्र, UAE दुबई न्यायालयांमध्ये शहजादी खान विरुद्ध खटला चालविण्यात आला. न्यायालयाने तिला दोषी ठरवून मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. UAE च्या सर्वोच्च न्यायालयानेही ही शिक्षा कायम ठेवली. भारतीय दूतावासाने शहजादीला कायदेशीर सहाय्य पुरवले आणि क्षमा याचिकाही सादर केली, पण UAE न्यायालयाने ती फेटाळून लावली.
शिक्षेची अंमलबजावणी आणि अंत्यसंस्कार
शहजादीला १५ फेब्रुवारी २०२५ रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली. तिच्या शवाला दुबईमध्येच पुरण्यात आले,
कारण शव भारतात आणण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची आणि खर्चिक होती. भारतीय दूतावासाने शहजादीच्या कुटुंबाला माहिती दिली आणि मदतीसाठी सर्व प्रयत्न केले.
UAE चे कायदे आणि मृत्युदंड
UAE मध्ये मृत्युदंड शरिया कायदा आणि आधुनिक फौजदारी कायद्याच्या मिश्रणाने चालवला जातो.
येथे गंभीर गुन्हे जसे की हत्या, दहशतवाद, बलात्कार आणि ड्रग्स तस्करीसाठी मृत्युदंड दिला जाऊ शकतो.
शहजादीच्या प्रकरणातही हीच प्रक्रिया अवलंबण्यात आली.
भारतीय दूतावासाची भूमिका
भारतीय दूतावासाने शहजादीला कायदेशीर मदत पुरवली आणि तिच्या कुटुंबाशी संपर्कात राहिले.
दूतावासाने क्षमा याचिका सादर केली आणि शव भारतात आणण्याचा प्रयत्न केला, पण UAE च्या कायद्यांमुळे हे शक्य झाले नाही.
शहजादी खान च्या कुटुंबियांचे आरोप
उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातील शहजादी खान ला UAE दुबईमध्ये फाशीची शिक्षा झाल्यानंतर तिच्या वडिलांनी आगरा निवासी उजैर नामक व्यक्तीवर मुलीला फसवून विकल्याचा आरोप केला होता,मात्र त्यांनी केलेल्या आरोपांना पोलिसांनी “क्लीन चिट” दिली आहे.
शहजादीचे वडील शब्बीर खान यांनी आरोप केला होता की, उजैरने प्रेमाच्या फसवणुकीतून त्यांच्या मुलीला दुबई पाठवून तिची विक्री केली.
त्यानंतर, तिला एका बालहत्येच्या खटल्यात फसवण्यात आले.
पोलिसांनी उजैरविरुद्ध खटला नोंदवून चौकशी सुरू केली होती, परंतु अंतिम अहवाल सादर करून केस बंद केली.
शहजादीचे वडील शब्बीर खान यांचे आरोप
शब्बीर खान यांनी दावा केला होता की, उजैरने “प्लास्टिक सर्जरी” करून देण्याच्या बहाण्याने शहजादीला दुबई पाठवले. तिथे, उजैरच्या काका-काकी च्या घरी तिला नोकराणी म्हणून ठेवण्यात आले. या काळातच काकी च्या बाळाचा मृत्यू झाला आणि शहजादीवर हत्या केल्याचा खटला दाखल करण्यात आला. दुबई न्यायालयाने तिला २०२५ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती.
शहजादीच्या शिक्षेनंतर, शब्बीर यांनी उजैर आणि त्याच्या नातेवाईकांविरुद्ध “मानवतस्करी”, “फसवणूक” आणि “बालहत्या” या आरोपांखाली एफआयआर नोंदवली होती.
पोलिस चौकशीत काय सिद्ध झाले?
बांदा पोलिसने या प्रकरणात सखोल चौकशी केली. आगरा येथील उजैरच्या घरी जाऊन त्याची चौकशी केली गेली.
चौकशीदरम्यान, पोलिसांनी उजैर चा जबाब नोंदवून संबंधित पुरावे तपासले. मटौंध ठाण्याचे पोलिस अधिकारी संदीप कुमार यांनी स्पष्ट केले की:
- “शहजादी आणि उजैरमध्ये मैत्री होती. दोघेही एकमेकांशी संपर्कात होते.
- शहजादी स्वेच्छेने दुबईला गेली होती. तिच्याकडे २ वर्षांचा व्हिसा होता.
- जोपर्यंत ती दुबईमध्ये होती नियमित पगार घेत होती, तोपर्यंत तिच्या वडिलांनी कोणतीही तक्रार केली नव्हती.
- फाशीची शिक्षा झाल्यानंतरच तीच्या वडिलांनी आरोप करत तक्रार दाखल केली.
- सर्व पुरावे तपासल्यानंतर, आरोपांना पाठिंबा देणारा कोणताही पुरावा सापडला नाही.
केस बंद, पण प्रश्न अजूनही!
पोलिसांनी या प्रकरणात “अंतिम अहवाल” (FR) सादर करून केस बंद केली असली तरी, शहजादीच्या कुटुंबाची न्यायाची मागणी सुरू आहे. शब्बीर खान यांनी सार्वजनिकपणे विचारणा केली आहे: “जर माझी मुलगी निर्दोष असेल, तर तिला फाशी का दिली गेली? UAE मध्ये कोणत्या पुराव्यावर हा निर्णय घेण्यात आला?” याशिवाय, उजैरने तिला फसवून दुबई पाठवल्याचे आरोपही सिद्ध होऊ शकले नाहीत, असे पोलिस म्हणतात.
समाजाची प्रतिक्रिया
UAE मध्ये फाशी ची शिक्षा देण्यात आलेल्या शहजादी खान च्या बातमीने देशभरात शोकाकूल वातावरण दिसून आले.लोकांनी या प्रकरणात न्यायाची मागणी केली आणि UAE च्या कायद्यांवर प्रश्न उपस्थित केले. शहजादीच्या कुटुंबानेही न्यायाची मागणी केली आणि सरकारकडून मदतीची विनंती केली.
शहजादीची फाशी ही एक वेदनादायी घटना आहे, जिने केवळ तिच्या कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवून सोडले. हे प्रकरण UAE च्या कायद्यांवर आणि भारतीय दूतावासाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभे करते. या घटनेतून आपल्याला हा सुद्धा बोध मिळतो की, परदेशात काम करणाऱ्या भारतीय नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आपण अधिक सज्ज राहिले पाहिजे.
Support Jaaglyabharat.com – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 07,2024 | 20:54 PM
WebTitle – Indian-Woman-Executed-UAE-shehzadi-khan
#shehzadikhan #UAELaw #IndianEmbassy #DeathPenalty