भारतीय चित्रपट सृष्टीत १९३१ पर्यंत मुक चित्रपट तयार झाले. पहिला भारतीय बोलपट म्हणजे १४ मार्च १९३१ ला मुंबईतील मॅजेस्टिक सिनेमागृहात प्रदर्शित झालेला आलम आरा हा सिनेमा होय. हा सिनेमा पहिला बोलपटच नव्हता तर यात गाण्यांचाही वापर केला होता. यामुळे भारतीय चित्रपट सृष्टीत पहिले गाणे पण याच सिनेमात होते.
भारतीय चित्रपटांच्या इतिहासात आलमआरा हा चित्रपट पहिला बोलपट म्हणून नेहमी राहील.
या चित्रपटात ‘दे दे खुदा के नाम पर ‘ हे गाणे म्हणजे भारतीय सिनेमातील पहिले गीत आहे. तेव्हा गाण्यासाठी साऊंडप्रुफ स्टुडिओ नव्हते. या चित्रपटातील गाण्यांचे शूटिंग बहुतांश रात्रीच्या वेळेस केले आहे त्याचे कारण म्हणजे गाणी ही शूटिंग दरम्यान गायली गेली आहेत. कलाकारांनी मायक्रोफोन लपवुन गाणी म्हटली आहेत.
या सिनेमाचे दिग्दर्शक होते अर्देशीर इराणी. संगीतकार होते फिरोजशहा मेस्त्री आणि बी. इराणी. यात प्रमुख भूमिका होत्या मास्टर विठ्ठल, झुबेदा आणि पृथ्वीराज कपूर यांच्या.हा सिनेमा त्याकाळी प्रचंड गाजला होता. बोलणारा आणि गाणी असलेला सिनेमा म्हणून खूप प्रसिद्ध झालेल्या या सिनेमाची प्रसिद्धी इतकी होती की गर्दीवर ताबा मिळवण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवावा लागे.भारतीय चित्रपटांच्या इतिहासात आलमआरा हा चित्रपट पहिला बोलपट म्हणून नेहमी राहील.
आलम आरा
मास्टर विठ्ठल एक नायक हे त्या काळातील एक सुप्रसिद्ध अभिनेते होते. विठ्ठल त्यावेळी शारदा स्टुडिओसाठी करारबद्ध होते, पण भारताच्या पहिल्या बोलल्या जाणार्या चित्रपटात नायक होण्याची ऑफर मिळताच त्याने शारदा स्टुडिओमधील कंत्राट तोडले. यावर रागाने शारदा स्टुडिओने त्याच्याविरोधात खटला दाखल केला होता, पण ज्या वकीलाने हा खटला लढा दिला तो वकील म्हणजे मुंबईचे प्रसिद्ध बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्ना होते.बॅरिस्टर जिना यांनी मास्टर विठ्ठल यांची केस लढले आणि जिंकलेही.
आलमआरा बद्दल आणखी एक रंजक सत्य असे की या सिनेमाची दोनदा रीमेक केले होते.1956 मध्ये आणि 1973 साली. दोन्ही वेळेस नवीन कलाकार, दिग्दर्शक आणि संगीतकार होते. परंतु फकीरची भूमिका वजीर मोहम्मद यांनी केली. आलमआरा प्रथम तयार झाल्यानंतर 25 वर्षांनी. ‘आलम आरा’ तिसऱ्यांदा बनला तेव्हा वजीर मोहम्मद 70 वर्षांचे होते.
बंजारन मुलीची प्रेमकथा
पहिल्या चित्रपटाप्रमाणेच नंतरच्या ‘आलम आरा’ चित्रपटातही वजीर मोहम्मद एका फकीरच्या भूमिकेत नायिकेच्या दारात ठोठावतो. भीक मागत असताना तेच ते गाणे गातात. तेच गाणे पहिल्या गाण्यातील ‘आलम आरा’ मध्ये गायले होते. त्यावेळी भारतीय चित्रपटांमध्ये पार्श्वगायन सुरू झाले नव्हते, म्हणून हे गाणे हार्मोनियम आणि तबला वाद्यसंगीतासह थेट रेकॉर्ड केले गेले. हा फक्त बोलपट नव्हता, तर बोलणे आणि गाणे, चित्रपटात बरीच गाणी होती. चित्रपटांमधील गाण्यांनी गाणी गाण्याची किंवा वाढविण्याच्या परंपरा निर्माण केली.
चित्रपटाचे दिग्दर्शक अर्देशिर इराणी यांनी ध्वनी रेकॉर्डिंग केले होते. एका कॅमेर्याने हा चित्रपट छायांकन करण्यात आला होता, ज्याने थेट चित्रपटात आवाज नोंदविला. या सिनेमाचे कथानक म्हणजे राजकुमार आणि बंजारन मुलीची प्रेमकथा असे होते . जोसेफ डेव्हिड यांनी पारशी नाटकावर आधारीत हे कथानक लिहीले होते.चित्रपटाची कथा कुमारपूर नगरातील राजघराण्यावर आधारित होती.
‘शो बोट’ या इंग्रजी चित्रपटाने प्रेरित होऊन अर्देशिर इराणी यांनी भारतीय चित्रपट बनवला.
मुक चित्रपटांना उतरती कळा लागली होती. लोकांना नवीन हवे होते.
ब्लॅकने तिकिटे
असे बोलले जाते की आलम आरा सिनेमासाठी चार आणे तिकीट होते
पण बोलता चित्रपट पाहण्यासाठी लोकांनी त्याकाळी ब्लॅकने पाच रुपयात तिकिटे घेतली होती.
हा सिनेमा त्याकाळी प्रचंड गाजला होता. बोलणारा आणि गाणी असलेला सिनेमा म्हणून
खूप प्रसिद्ध झालेल्या या सिनेमाची प्रसिद्धी इतकी होती की गर्दीवर ताबा मिळवण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवावा लागे.
भारतीय चित्रपटांच्या इतिहासात आलमआरा हा चित्रपट पहिला बोलपट म्हणून नेहमी अजरामर राहील.
क्रमशः
मागील पोस्ट सिरिज साठी खालील लिंकवर क्लिक करा
1 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने -1
2 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 2
3 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 3