भारतीय चित्रपट सृष्टी मध्ये अनेक दिग्गज कलाकार होऊन गेले आहेत. प्रत्येकाने आपल्या बुद्धिचातुर्याने तसेच कलेने सर्वांचे मनोरंजन केले आहे.यामध्ये काही लोक बहुमुखी प्रतिभेचे आहेत.त्यातल्याच एका सर्वांगसुंदर प्रतिभेची आज आपण ओळख करून घेणार आहोत.तसेच त्यांच्या विषयी जाणून घेणार आहोत.”रमाकु रशोकी” हे नाव कोणा कोणाला माहिती आहे ? नाही ना.आता हेच नाव जर मी किशोर कुमार असे सांगितले तर तुम्हाला महान गायक अभिनेता-दिग्दर्शक निर्माता किशोरदा आठवतील.किशोर कुमार यांच्या सारखा हरहुन्नरी कलाकार विरळाच हे जे उलट नाव मी सांगितले तशी उलट उच्चार करण्याची, बोलण्याची कला किशोर कुमार यांचीच.अत्यंत विनोदी, हसमुख आणि सर्वांना आपलेसे करून घेण्याची कला किशोर कुमार यांच्याकडे होती.
जीवन परिचय
4 ऑगस्ट 1929 रोजी मध्यप्रदेशातील खंडवा याठिकाणी किशोर कुमार यांचा जन्म झाला.त्यांचे वडील एक प्रसिद्ध वकील होते.त्यांचे मोठे भाऊ अशोक कुमार प्रतीत यश अभिनेते होते दुसरे भाऊ अनुप कुमार हे पण अभिनेता होते.किशोर कुमार यांनी गायनाची सुरवात सह गायक म्हणून केली. भाऊ अशोक कुमार यांच्या विनंतीने किशोर कुमार यांनी अभिनयाची सुरुवात केली.किशोरदा हे आपले भाऊ अशोक कुमार यांना खूप घाबरत असत.अशोक कुमार आणि किशोर कुमार यांच्यामध्ये अठरा वर्षांचे अंतर होते त्यामुळे वडील भाऊ म्हणून ते अशोक कुमारांना घाबरत.सुरुवातीला त्यांनी अनेक चित्रपटात काम केले त्यामध्ये चलती का नाम गाडी,हाफ तिकीट, आशा, नई दिल्ली चित्रपटात काम केले.
पार्श्वगायनाची सुरुवात
चलती का नाम गाडी या चित्रपटात अशोक कुमार,अनुप कुमार आणि किशोर कुमार हे तिघेही भाऊ दिसले होते. किशोर दा, के एल सहगल यांचे चाहते होते .ते के एल सहगल यांच्या गायकीला फॉलो करत असत. किशोरदा कुमार यांच्या पार्श्वगायनाची सुरुवात 1946 साली झाली. त्यानंतर त्यांनी 1987 पर्यंत सर्व अभिनेत्यांना आपला आवाज दिला किशोर कुमार यांची गायकी खूप प्रसिद्ध होती. यॉडलिंग नावाचा गीत प्रकार त्यानीच बॉलिवूडमध्ये आणला.किशोरदा कुमार यांनी सर्व अभिनेत्यांना आवाज दिला आहे. त्यामध्ये सर्वात जास्त गाणी राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेली आहेत. किशोरदांनी आपल्या गायकीमध्ये खूप प्रयोग केले त्यांनी द्वंद्वगीते, वीरह गीते, आणि इत्यादी प्रकारांवर खूप गायन केले आहे.
किशोर कुमारांचे व्यक्तिमत्व मस्तमौला टाईपचे होते.खोडकर स्वभाव हसमुख चेहरा आणि विनोदी स्वभाव यामुळे ते सर्वांना आवडायचे.
पंचायतीमध्ये अशी बरीच गाणी आहेत जी विनोदी आहेत.विनोदी गाण्या सोबतच त्यांनी अनेक गंभीर गाणी सुद्धा म्हटली आहेत.
“घुन्गरू की तरह बजता ही रहा हु मै”, “तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही”
अशी अनेक गाणी किशोरदा यांच्या गायकीचे सुंदर दर्शन घडवतात.
किशोर कुमार यांचे पहिले लग्न बंगाली अभिनेत्री रुमा गुहा यांच्यासोबत झाले. हे लग्न 8/10 वर्ष टिकले. नंतर ते विभक्त झाले रुमा गुहा यांच्यापासून त्यांना एक मुलगा झाला त्यांचे नाव अमित कुमार.अमित कुमार ही पार्श्वगायना मध्ये उतरले त्यांनीही अनेक सुंदर गीते म्हटली आहेत. दुसरे लग्न प्रसिद्ध अभिनेत्री सौंदर्य तारका मधुबाला यांच्यासोबत झाले. मधुबाला यांच्या हृदयाला होल असल्यामुळे त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी अभिनेत्री योगिता बाली यांच्याशी लग्न केले.हे लग्न फार काळ चालले नाही.योगिता बाली यांच्याशी काडीमोड घेतल्यानंतर त्यांनी प्रसिद्ध अभिनेत्री लीना चंदावरकर यांच्याशी लग्न केले.
जीवनातील चढ-उतार
जीवनातील चढ-उतार किशोरदा कुमार यांनी अनेकदा सहन केले.दोनदा हार्ट अटॅक येऊन गेले होते त्याकाळी किशोर कुमारांनी काही काळ गाणे थांबवले होते. इंदिरा गांधी यांनी भारतात ज्या वेळेला आणीबाणी लागू केली त्या वेळेला किशोर कुमार यांनी इंदिरा गांधींचा विरोध केला. इंदिरा गांधी यांनी किशोर कुमार यांना खूप त्रास दिला असे बोलले जाते.त्यांच्या घरावर वर आयकर विभागाची धाड टाकली गेली. आकाशवाणीवर किशोरदांचे गाणे वाजवले जाऊ नये असे अलिखित आदेशच काढले गेले होते त्यामुळे त्याकाळी आकाशवाणीवर किशोरदांचे गाणे वाजत नसत.
आठ वेळा फिल्मफेअर पुरस्कार
बॉलीवूड मधिल अनेक अभिनेत्यांना किशोरदांनी आवाज दिला होता. तसेच अनेकांसोबत त्यांचे वादही झाले होते.त्यापैकी अमिताभ बच्चन आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या विषयीचे वाद प्रसिद्ध आहेत.मिथुन चक्रवर्ती यांनी योगिता बाली यांच्याशी विवाह केल्याने किशोरदांनी मिथुन चक्रवर्ती यांना आवाज देण्याचे बंद केले होते. पण नंतर हा वाद मिटविण्यात आला.किशोदांच्या पार्श्वगायनाची एक वेगळी पद्धत होती. त्यांचा आवाज आणि त्यांची गाणी म्हणण्याची पद्धत ही अत्यंत उच्च दर्जाची होती. त्यांच्या गायकीचे आजही अनेक चाहते आहेत.त्यांच्या त्यांच्या चित्रपट संगीत कारकिर्दीत आठ वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. तसेच इतर आणि पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
आवाजाच्या जादूगाराचा मृत्यू 13 ऑक्टोबर 1987 रोजी हृदयविकाराने झाला.
त्यांची इच्छा होती की त्यांच्या वर त्यांच्या जन्मस्थळी अंतिम संस्कार व्हावेत,म्हणून मध्यप्रदेशातील खंडवा याठिकाणी किशोरदांचे अंत्यसंस्कार केले गेले.
त्यांनी गायलेल्या अनेक गीतांनी भारतीय तसेच जगभरातील रसिकांना मंत्रमुग्ध करून सोडले आहे.
किशोर दा यांच्या सारखा कलाकार विरळाच त्यांच्या गायकीने अभिनयाने ते आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत.
मागील पोस्ट सिरिज साठी खालील लिंकवर क्लिक करा
हे हाचा भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने -1
भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 2
हेही वाचा भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 3
राजकपूर भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 4
दिलीप कुमार भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 5
भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 6
भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 7
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 29, 2020 09:44 AM
WebTitle – history-of-indian-film-industry-bollywood-cinema-Kishore-Kumar