गाझियाबाद: Ghaziabad Court Room Video उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एक आश्चर्यचकित करणारा प्रकार घडला आहे. येथे कोर्टमध्ये वकील आणि न्यायाधीश यांच्यामध्येच हाणामारी पाहायला मिळाली. त्यानंतर वकिलांनी हंगामा केला आणि न्यायाधीशांवर खुर्च्या फेकल्या. यानंतर न्यायाधीशांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी लाठीचार्ज करून मारमारी करणाऱ्या वकिलांना पळवून लावले. यामुळे चिडलेल्या वकिलांनी आवारातील पोलिस चौकीची तोडफोड केली आणि चौकीला आग लावली.

कोर्टच्या बाहेर धरणे आंदोलनावर बसले वकील
सध्या वकील कोर्टच्या बाहेर धरणे आंदोलन पुकारले असून, न्यायाधीशांच्या विरोधात घोषणा देत आहेत. तसेच, मिळालेल्या माहितीनुसार न्यायाधीशांनीही गैरवर्तनाविरोधात काम बंद केलं आहे. हा संपूर्ण प्रकार जिल्हा न्यायाधीश कोर्टचा आहे. येथे एका व्यक्तीच्या जामिनावर सुनावणी सुरू होती. वकील नाहर सिंह यादव यांनी मागणी केली होती की, जामिन अर्ज दुसऱ्या कोर्टात वर्ग करण्यात यावा. यावरूनच त्यांच्यात आणि जिल्हा न्यायाधीश अनिल कुमार यांच्यात बाचाबाची सुरू झाली.
न्यायाधीश आणि वकिलांमध्ये तीव्र वादावादी
वकील आणि न्यायाधीश यांच्यात वाद इतका वाढला की प्रकरण हाणामारी पर्यंत गेले
जिल्हा न्यायाधीश डाइसवरून खाली आले.
आधी थोडी बाचा-बाची झाली आणि नंतर वाद अधिकच चिघळला.
यानंतर जिल्हा न्यायाधीशांनी पोलिस आणि पीएसीला बोलावले.
या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओही समोर आला आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
वकिलांचे गंभीर आरोप
याबाबतचे वृत्त हिंदी वृत्तवाहिनीने दिले आहे.व्हिडिओमध्ये पोलिस वकिलांवर लाठीचार्ज करताना दिसत आहेत. एक पोलिस खुर्ची उचलताना दिसतोय.
वकिलांनी आरोप केला आहे की, जिल्हा न्यायाधीशांनी कोर्ट रूममध्ये दरवाजे बंद करून त्यांना चौफेर मारहाण केली. या घटनेत अनेकांना दुखापत झाली आहे.
कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की पोलिस कर्मचारी कोर्टरूममध्येच वकिलांना मारहाण करत आहेत. पोलिस वकिलांना खुर्च्यांवरून उठवून मारताना आणि लाठीचार्ज करताना दिसत आहेत. या घटनेनंतर बार असोसिएशनने वकिलांची बैठक बोलावली आहे. वकिलांचे म्हणणे आहे की, लाठीचार्जमधील दोषी अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली नाही, तर ते आंदोलन करतील.
Support Jaaglyabharat.com
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 29,2024 | 15:55 PM
WebTitle – Lawyers and Judge Clash Inside Ghaziabad Courtroom, Police Action Escalates Tensions | Watch Video
#Ghaziabad #CourtroomClash #LawyersVsJudge #PoliceAction #ViralVideo #CourtroomDrama #GhaziabadNews #LawAndOrder #IndiaNews #BreakingNews