बुद्ध लेण्यांवर धम्मलिपी संशोधनाची चळवळ आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना धम्मलिपिचे विनामूल्य ज्ञान दान
महाराष्ट्रात सध्या MBCPR टीम ही संस्था अशोक कालीन व सातवाहन कालीन धम्मलिपिचे वर्ग भरवून हजारो विद्यार्थ्यांना धम्मलिपिचे मोफत ज्ञान दान देत आहेत.
धम्मात दान पारमितेला अनन्यसाधारण महत्व आहे
बुद्ध धम्मात दान पारमितेला अनन्यसाधारण महत्व आहे, ह्याच कर्तव्याप्रति सामाजिक बांधिलकी जपत MBCPR टीमच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी घडवले जात आहे.
बॅच संपल्यावर राज्यातील बुद्ध लेणींवर दरमहा कार्यशाळा होते, व विद्यार्थ्यांकडून शिलालेख वाचन करून घेतले जाते,महाराष्ट्रात जेथे जेथे बौद्धलेणी आहेत तेथे प्रत्यक्ष जाऊन तेथील शिलालेखांचा अभ्यास आणि संशोधन करण्याची चळवळ नाशिक,पुणे , मुंबई मधील काही तरुण राबवत आहे. मूव्हमेंट ऑफ बुद्धीस्ट केव्ज् प्रिझर्व्हेशन अँड रिस्टोरेशन ह्या संस्थेच्या माध्यमातून सुरू झालेली ही चळवळ आता हजारो विद्यार्थ्यां पर्यंत पोहोचली असून या मोहिमेच्या माध्यमातून धम्मलिपित असलेले बुद्ध लेणी वरील शिलालेख तसेच धम्म लिपीचा अभ्यास केला जात आहे.
धम्मलिपी ही भारतातील लिपींची जननी असून ती शिकणे गरजेचे आहे
या माध्यमातून लिहिण्याचा व बुद्ध धम्माचा प्राचीन इतिहास उलगडण्यास मदत होत आहे. मूव्हमेंट ऑफ बुद्धीस्ट केव्ज् प्रिझर्व्हेशन अँड रिस्टोरेशन या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक तरुण व तरुणी यांनी प्राचीन लेणी व शिलालेख यांचा अभ्यास सुरू करून प्राचीन भारतीय इतिहास जगासमोर आणण्याचा प्रयत्न केलला आहे.
? Online व्हाट्सअँप ग्रुप च्या माध्यमातुन? धम्मलिपीच्या ?यशस्वी 2️⃣0️⃣ बॅच पूर्ण करून हजारो विद्यार्थी आणि विद्यार्थिनी धम्मलिपी शिकले आहे.
धम्मलिपी ही भारतातील लिपींची जननी असून ती शिकणे गरजेचे आहे, ❇️ आतापर्यंत अनेक , डॉक्टर, वकील , इंजिनिअर, सरकारी अधिकारी आणि कर्मचारी , प्राध्यापक, शिक्षक, मुख्याध्यापक , महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी , गृहिणी , बौद्धाचार्य , पाली भाषा विद्यार्थी , सेवानिवृत्त कर्मचारी , यांनी अल्पावधीतच ही लिपी शिकली आहे.
ही लिपी अत्यंत सोपी आहे. लिपीची जेव्हा अक्षर ओळख होते, तेव्हा आपण नक्कीच तिच्या प्रेमात पडतो. धम्मलिपी किती प्राचीन आहे आणि तिच्यातून कशी अनेक लिपींची निर्मिती झाली हे आपणास लिपी शिकल्यानंतर कळेल , तर चला मग शिकूया..धम्मलिपी ही धम्मलिपी शिकण्यासाठी कोणतीही फी नाही आहे. पुर्णतः Free आहे. १५ दिवस अशोक कालीन धंमलिपि व १५ दिवस सातवाहन कालीन धंमलिपि शिकवली जाते, वयाचे बंधन नसते फक्त मराठी लिहिता वाचता आले पाहिजे.
महाराष्ट्रातील सर्व बुद्ध लेण्यांवर प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी असलेले शिल्प व शिलालेख
व त्यांच्या निर्मितीचा इतिहासमूव्हमेंट ऑफ बुद्धीस्ट केव्ज् प्रिझर्व्हेशन अँड रिस्टोरेशन संस्थेच्या माध्यमातून जगासमोर येत आहे.
सम्राट अशोक कालीन धम्मलिपी व सातवाहन कालीन धम्मलिपी यांचा अभ्यास
विनामूल्य धम्मा लिपीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे
मूव्हमेंट ऑफ बुद्धीस्ट केव्ज् प्रिझर्व्हेशन अँड रिस्टोरेशन संस्थेच्यामाध्यमातून करण्यात येत आहे. या चळवळीत महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील हरियाणा, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश बिहार, उत्तरप्रदेशसह अनेक तरुण तरुणी जोडले गेले आहेत. या चळवळीत ज्येष्ठ महिला, पुरुष व लहान मुले देखील सहभाग घेत आहे. ज्यांना बुद्ध तत्त्वज्ञान आणि भारतीय बौद्ध संस्कृतीविषयी आस्था आहे तसेच ज्यांना प्राचीन भारतीय धम्मलीपी व शिलालेख यांचा अभ्यास करण्याची इच्छा आहे अशा सर्वांना बरोबर घेऊन महाराष्ट्रामध्ये लेणी संवर्धन व संशोधनाची चळवळ उभी केली जात आहे. लेणी अभ्यासक व संशोधक, लिपि तज्ञ सुनीलसर खरे यांच्यासह प्रभाकर जोगदंड, प्रवीण जाधव, संतोष वाघमारे, विजय कापडणे, मनीषा डोळस आनंद खरात , राहुल खरे यांच्यासह अनेक जण या मोहिमेचा भाग झाले आहेत.
मूव्हमेंट ऑफ बुद्धीस्ट केव्ज् प्रिझर्व्हेशन अँड रिस्टोरेशन संस्थेच्या माध्यमातून विनामूल्य धम्मा लिपीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
प्रत्येक बॅचमध्ये 50 टक्के सहभाग महिलांना दिलेला असतो,धम्म लिपि शिकण्याकरिता संपर्क-
सुनील उषा खरे 9370013953
प्रविण रत्ना सुरेश जाधव 9325448915
आनंद खरात 97636 49463
त्रिरश्मी बुद्ध लेणींवर अविस्मरणीय,उत्साहवर्धक पंधरावी कार्यशाळा संपन्न
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 21, 2021 14:33 PM
WebTitle – free-dhamma-script-research-on-buddha-caves