नाशिक : प्रतिनिधी – नाशिक येथील त्रिरश्मी बुद्ध लेणींवर अद्वितीय, अविस्मरणीय, उत्साहवर्धक प्रेरक पंधरावी कार्यशाळा संपन्न झाली.सदर पंधराव्या कार्यशाळेला पहिल्यांदा ३०० हुन अधिक अभ्यासक सहभागी झाले होते, खरे तर संपूर्ण महाराष्ट्रात वेरूळ, पितळखोरा, घटकोत्कच, अजिंठा, विद्यापीठ, शिवनेरी, जुन्नर , मुंबई, रायगड अश्या अनेक ठिकाणी या बुद्ध लेणींचा हजारोचा मोठा लेणी समूह आपल्या वैभवशाली महाराष्ट्राला लाभलेला आहे.कालच्या कार्यशाळेतील सर्व धम्म बांधव भगिनी यांचे लेणींचा इतिहास समजून घेण्याची धडपड कार्यशाळेच्या माध्यमातून दिसत होती.
नागपूर, परभणी, जालना, धुळे, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नांदेड, औरंगाबाद, सोलापूर, अमरावती, बुलढाणा, जळगाव, सातारा इत्यादी सारख्या शेकडो किमी अंतराहुन या अभ्यासकांना त्रिरश्मी लेणीची ओढ लागावी हे अत्यंत गौरवास्पद आहे. आपला नष्ट होत असलेला इतिहास, बुद्ध लेणींवर होत असलेली अतिक्रमणे या गोष्टी खऱ्या अर्थाने आपले दूर्लक्ष झाल्याने व लेणीं वर आपली उपस्थिती नसल्याने होत आहेत. हे थांबविण्याचे कार्य आता “मूव्हमेंट ऑफ बुद्धिस्ट केव्ज् प्रिझर्व्हेशन अँड रिस्टोरेशन” MBCPR च्या माध्यमातून सुरू झाले आहे, आणि ही चळवळ आता जोम धरू लागली आहे.प्रत्येक कार्यशाळेत जाऊन धम्म समजून घेऊन तो जनमानसात रुजवण्याची इच्छा, आकांक्षा सगळीकडे निर्माण होत आहे हे सुखावह आहे.
त्रिरश्मी बुद्ध लेणी येथे पंधरावी कार्यशाळा संपन्न
कार्यशाळेची सुरवात सामूहिक त्रिसरण पंचशील घेऊन करण्यात आली, त्यानंतर १० मिनिटे आणापान ध्यानसाधना करण्यात आली,
सूत्रसंचालन व लेणी क्रमांक १८ विषयी माहिती कविता खरे यांनी दिली. नाशिकचा त्रिरश्मी बुद्ध लेणींचा इतिहास गौतम कदम यांनी सांगितला,
लेणी क्रमांक १,२,३,४,१० व २० ह्या लेणी समूहाची संपूर्ण शिल्पकलेची माहिती सुनील खरे व प्रवीण जाधव यांनी दिली.
लेणी क्रमांक ७ व ८ ची माहिती रितेश गांगुर्डे यांनी दिली, लेणी क्रमांक १० ची माहिती प्रभाकर जोगदंड यांनी दिली, लेणी क्रमांक ११ मधील शिलालेख वाचन व अर्थ विजय कापडणे यांनी समजावून सांगितले. लेणी क्रमांक १८ मधील शिलालेख आनंद खरात यांनी वाचन केले व त्याचा अर्थ समजावून सांगितला.
आतापर्यंत झालेल्या कार्यशाळेचा आढावा संतोष वाघमारे यांनी मांडला.यावेळी त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील पुरातत्त्व विभागाचे सलीम पटेल व इतर लेणी कर्मचारी यांना मिठाई, शिट्टी यांचे वाटप MBCPR समूह नाशिक यांच्या तर्फे करण्यात आले,जेवणाची व्यवस्था इंजि. धर्मेंद्र झाल्टे व वंदना झाल्टे यांनी केली, वर्णमाला सेट वाटप करण्यासाठी धम्म दान अनघा लोखंडे यांनी दिले.
मार्गदर्शक व इतिहास उलगडणारे असे कोणीच नव्हते. पण नाशिकच्या त्रिरश्मी लेणीतून आता खऱ्या अर्थाने ती सुरुवात झाली आहे.
मला लेण्यांच्या निर्मिती मागील इतिहास, तत्कालीन सामाजिक संरचना, कालखंडानुसार अतिक्रमणे,
शिल्पांचा अर्थबोध, धम्मलिपि या बाबी आताशी कळू लागल्या आहेत.
संशोधनाची अपूर्ण भूक आता आणखी वाढलीय हे असे मनोगत धम्म लिपि विद्यार्थी संजय पगारे व इतर धम्म बांधव व भगिनींनी व्यक्त केले.
भगवान पगारे, अनिल बागुल, अंकित दोंदे, नितीन पिंपळीसकर , सम्राट खरात, राहुल खरे , सचिन गायकवाड, नताशा झनके, प्रतीक्षा झनके, रितेश हिरोळे, रवींद्र आढाव , आकाश खरे यांनी स्वयं सेवक पदाची जबाबदारी स्वीकारून कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी, शिस्त लावण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडली.
विद्यार्थी दिनाचे औचित्य साधून धम्म लिपि वर्ग
“मूव्हमेंट ऑफ बुद्धिस्ट केव्ज् प्रिझर्व्हेशन अँड रिस्टोरेशन” संस्थेच्या माध्यमातून त्रिरश्मी बुद्ध लेणी येथे ७ नोव्हेंबर १९०० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळेत जाण्याचा पहिला दिवस जो की आपण विद्यार्थी दिन म्हणून साजरा करतो त्यादिनाचे औचित्य साधून धम्म लिपि वर्ग भरवण्यात आला व त्यांना धम्मलिपी वाचन लिखाण करून धम्मलिपी वर्णमलेचा सेट भेट म्हणून देण्यात आला.
त्यास मोठ्या संख्येने उपासक उपस्थित होते, यावेळी धम्म लिपि विद्यार्थीनी सुकेशनी खैरनार हिने स्वतःच्या हस्ताक्षरात बनवलेणी असाईनमेंट धम्मलिपि शिक्षक सुनील खरे यांना भेट म्हणून दिली.टीमची वाटचाल शशिकांत निकम यांनी मांडली व आभार प्रदर्शन संतोष आंभोरे यांनी केले. यावेळी भिकाजी सुरडकर, दया लवांदे, विकास खरात, व इतर उपासक उपस्थित होते.
अनेक वर्षांनंतर पहिल्यांदा 300 च्या आसपास लेणी अभ्यासक व धम्म लिपि अभ्यासक त्रिरश्मी बुद्ध लेणींच्या कार्यशाळेत हजर होते,
पुरातत्व विभागाने याठिकाणी अल्पोहर गृह , स्वच्छतागृह तयार केले तर लेणींवर येणाऱ्यांची संख्या निश्चितच वाढेल.
“जय भीम” फिल्म पाहिल्यानंतर अभिनेत्याने “पार्वती” साठी घर देण्याचे ठरवले
मलिक तुम्ही मुंबईच्या मारेकऱ्यांसोबत व्यवसाय का केला? – फडणवीस
देवेंद्र फडणवीस, उद्या सकाळी हायड्रोजन बॉम्ब फुटणार – नवाब मलिक
जय भीम सिनेमा :व्यवस्थेने दिलेल्या यातनांचा वास्तवदर्शी थरारक अनुभव
राम मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या दलित कुटुंबावर प्राणघातक हल्ला
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 10, 2021 16:30 PM
WebTitle – 15th workshop on Trirashmi Buddha Caves at nasik