मुंबई:वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष ऍड.प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar ) यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.फडणवीसांनी पेनड्राईव्ह मधला गुलकंदाचा गोडवा सांगावा -ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. “मला वाटत होतं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) फार शूर आहेत लढाऊ आहेत.परंतु, सभागृहात पेनड्राईव्ह (Pendrive) दाखवणे हे शूरपणाचं नाही, तर सामान्य माणसाच्या भाषेत याला गां**पणाच्या राजकारण म्हणतात अशी घणाघाती टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.
पत्रकारांशी बोलताना ऍड.प्रकाश आंबेडकर म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहापेक्षा हा पेनड्राईव्ह आणि त्यासंदर्भातील आरोप बाहेर पब्लिकली केले असते तर त्याला महत्व राहिले असते. त्यामुळे सामान्य माणसाचा शब्द याठिकाणी लागू होतो.जे काही बोलायचं असेल ते ओपनली बोललं पाहिजे,सरळ बोललं पाहिजे.त्यातून दुसरा कोणताही वास येऊ नये असा टोला आंबेडकरांनी लगावला आहे.
फडणवीसांनी पेनड्राईव्ह मधला गुलकंदाचा गोडवा सांगावा
“देवेंद्र फडणवीस यांना मी फार शूर आणि लढाऊ राजकारणी समजत होतो.ते तलवार म्यानातून काढूत लढत बसतील. मात्र, सभागृहात पेन ड्राईव्ह दाखवणे हे शूरपणा नाही. सभागृहातील आरोपांतून फारसं साध्य होणार नाही. सभापती फार तर त्यांचे आरोप फेटाळून लावतील.फेक आहे म्हणतील मात्र, त्यांनी हाच पेनड्राईव्ह आणि त्यासंदर्भातील आरोप बाहेर जनतेसमोर केले असते तर त्याला महत्व राहिले असते.
“तुम्ही विरोधी पक्षाचे नेते आहात तेव्हा जनतेच्या समोर सगळे आरोप उघड करणे महत्वाचे आहे.हे सगळं लपून छपून वाद सुरु आहे.मी स्पिकरला पेनड्राइव्ह दिली आणि त्यात गिरीश महाजन आणि इतर यांचं अमुक आहे.त्या पाटील आणि यांचं अमुक आहे,ते काय आहे ते तरी सांगा. त्या पेनड्राईव्हमध्ये काय ‘गुलकंद’ आहे? तेही फडणवीसांनी स्पष्ट केले पाहिजे आणि ते जनतेसमोर आले पाहिजे, अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.
“राष्ट्रपती राजवटीचा निर्णय लोकांना ठरवू द्या “
मध्यतंरी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सालियन प्रकरणात शिवसेनेवर आरोप केले होते. त्यानंतर शिवसेनेने राणेंवर आरोप केले आहेत. परंतु, दोघांनीही आरोप करताना याचे पुरावे दिले नाहीत. या गोष्टी आम्ही फक्त टीव्हीवरच पाहतो. याचे पुरावे कधी देणार? असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला आहे. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लावताना केंद्र पुरावे काय देणार? राष्ट्रपती राजवटीचा निर्णय जनतेला घेऊ द्या, असं आंबेडकर यांनी म्हटले आहे.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स
झुंड सिनेमा:झोपडपट्टी मध्ये जन्मलेले जागतिक दर्जाचे दिग्गज खेळाडू
झुंड चित्रपट बजेट:किती करोडमध्ये बनला? आतापर्यँतचे कलेक्शन
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
झुंड मुव्ही: रितेश देशमुख यांची पोस्ट व्हायरल; दोन भारताचा विचार..
झुंड चित्रपट:सुबोध भावे ची पोस्ट ,”नागराज तू आमच्या पिढीचा…”
Jhund film।झुंड चित्रपट,आंबेडकरांचे पोस्टर व्हायरल,पाहा रिलीज डेट
जयभीम चित्रपट थांबायचे नाव घेईना ,चीन मध्ये ठरतोय लोकप्रिय
Pushpa movie box office collection|पुष्पा फिल्म बॉक्स ऑफिस
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 14, 2022 20:58 PM
WebTitle – Fadnavis should tell the truth of the pen drive to the people – Adv. Prakash Ambedkar