मुंबई,दि.18 : राज्यात नुकतीच दुसरी लाट ओसरून अनलोकची प्रक्रिया सुरू झाली आहे.जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येवू लागले आहे.अशातच आता राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणुका ची तयारी सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह राज्यातील 10 महानगरपालिका, 20 नगरपरिषदा आणि महापालिकांच्या निवडणुका 2022 फेब्रुवारी महिन्यात घेण्याची तयारी सुरु झाल्याची माहिती मिळत आहे.एकसदस्यीस प्रभागरचना पद्धतीनं या निवडणुका होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
तसंच नवी मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर आणि वसई विरार या महापालिकांसह 65 नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या प्रलंबित निवडणुका येत्या ऑक्टोबर महिन्यात घेण्याची तयारी निवडणूक आयोगानं केलीय.कोरोनाची स्थिती लक्षात घेऊनच याबाबत अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.
पण, आता महाराष्ट्रामध्ये कोरोना रूग्णांची संख्या कमी होत असून,
यामुळे मुंबईसह राज्यातील 10 महापालिकांच्या निवडणुका फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
औरंगाबाद, नवी मुंबई, वसई विरार आणि कोल्हापूर या महानगरपालिकांच्या निवडणुका गेल्या वर्षापासून प्रलंबित आहेत.
प्रलंबित निवडणूका ऑक्टोबरमध्ये, तर आगामी निवडणूका फेब्रुवारीत नियोजित असल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा.. धुवांधार वॉटर फॉल : त्यांच्या जीवाची किंमत फक्त ५० रूपये
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published on JUN 18, 2021 19: 50 PM
WebTitle – Elections for 10 Municipal Corporations and 20 Municipal Councils in the state are likely in February 2021-06-18