राष्ट्रवादी काँग्रेस चे संस्थापक शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो वर ईडीने कारवाई केली आहे. कारवाई करत तपास यंत्रणेने रोहित पवार यांच्या कंपनीच्या मालकीच्या साखर कारखान्याची 50 कोटी रुपयांहून अधिकची मालमत्ता जप्त केली आहे.आता करण्यात आलेली कारवाई ही कथित महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) घोटाळा संबंधी ईडीने केलेल्या मनी लाँड्रिंग तपासाशी संबंधित आहे.
रोहित पवार यांची मालकी असलेल्या औरंगाबाद मधील कन्नड गावात असलेल्या कन्नड सहकारी साखर कारखाना लिमिटेड (कन्नड एसएसके) ची एकूण 161.30 एकर जमीन, प्लांट, मशिनरी आणि इमारती मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) तात्पुरत्या स्वरूपात जप्त करण्यात आल्या आहेत, असे ईडीने सांगितले. . कन्नड SSK बारामती ऍग्रो लिमिटेड या रोहित पवार यांच्या मालकीची कंपनी आहे,
रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो वर ईडीची कारवाई
शरद पवार राष्ट्रवादी गटातील आमदार रोहित पवार हे महाराष्ट्रातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले आहेत,ते शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटात असून यापूर्वीही बारामती ॲग्रो, कन्नड एसएसके आणि काही इतरांच्या परिसरात जानेवारीत झडती घेतल्यानंतर ईडीने चौकशी केली होती. यानंतर 1 फेब्रुवारी रोजी त्यांची सुमारे आठ तास चौकशी सुद्धा करण्यात आली होती.ऑगस्ट 2019 मध्ये, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात एफआयआर नोंदविला होता. याअगोदर 5 जानेवारी रोजी ईडीकडून रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती ॲग्रोवन कंपनी आणि बारामती, पुणे, औरंगाबाद आणि इतर काही ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. महाराष्ट्र सहकारी क्षेत्रातील साखर कारखान्यांच्या कथित फसवणुकीच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर हा खटला दाखल करण्यात आला होता.यावेळी जमीन कवडीमोल भावाने विकल्याचेही सांगण्यात आले होते.
आता भाजप मध्ये जावे का?….
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने ईडीच्या कारवाईवर टीका केली आहे. ईडीची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असून
लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांना त्रास देण्यासाठी सरकारकडून ईडीचा वापर केला जात असल्याचे राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार यांचे म्हणणे आहे.
आमदार रोहित पवार यांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या कंपनीवर ED ने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं
आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का?😂
पण भाजपाने लक्षात ठेवावं…. झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू!
माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत!
या कारवाईवरुन आचारसंहिता येत्या दोन-तीन दिवसांतच लागेल, हेही दिसतंय.
ही कारवाई पूर्णतः बेकायदा असून याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, त्यामुळं कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी करु नये. पण प्रश्न इतकाच आहे की, अशी कारवाई केवळ माझ्याविरोधातच का? पण सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना आज तरी असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही! वाढदिवसाच्या दिवशीही अशाच एका एजन्सीने कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी दुसरी कारवाई.. परंतु मी महादेवाचा भक्त आहे… अन्यायाविरोधात जनता जनार्दनरुपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेंव्हा अनेकांच थयथयाट झाल्याशिवाय राहणार नाही.” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
व्हॉट्सॲप ग्रुपमधील मेसेज फॉरवर्ड करणे अनुशासन भंगाच्या कारवाईचा आधार असू शकत नाही: उच्च न्यायालय
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 08,2024 | 19:36 PM
WebTitle – ED action on Sharad Pawar’s grandson Rohit Pawar’s Baramati Agro, assets worth Rs 50 crore seized