युनिसेफ, जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ who) आणि यूएनएफपीए यांनी मुलांची काळजी krt संयुक्तपणे एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. दक्षिण आशियातील कोरोना साथीच्या परिणामाचा आढावा या अहवालात घेऊन यात त्यांनी असे स्पष्ट केले आहे की कोरोनाच्या साथीमुळे दक्षिण आशियातील सुमारे 45 लाख मुली आपल्या शाळांमध्ये पुन्हा परत येऊ शकणार नाहीत.
इतकेच नव्हे तर भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका यासंबंधी प्रसिद्ध झालेल्या अहवालातही असे दिसून आले आहे की कोविड -19 मुळे 42 कोटी मुले त्यांच्या शाळांमध्ये जाऊ शकली नाहीत. विशेष म्हणजे दक्षिण आशियामध्ये आतापर्यंत कोविड – 19 च्या 1.३ दशलक्ष लोकांना लागण झाली असून , जवळपास 1,87,653 लोकांचा बळी गेला आहे.
कोविड – 19 च्या प्रादुर्भावामूळे देशात काही राज्यात लाँकडाउन सुरू आहे या लाँकडाउन मुळे जगभरातील 199 देशांतील सुमारे 160 कोटी विद्यार्थी कोविड मुळे प्रभावित झाले आहेत. प्रश्न केवळ त्यांच्या शिक्षणाबद्दलचा नाही, तर त्यांच्या पोषणाशी देखील संबंधित आहे, कारण जगातील बर्याच भागांमध्ये शाळांमध्ये मुलांना आवश्यक पोषण आहार प्रदान केला जातो तो या लाँकडाउन मध्ये शाळा बंद असल्यामुळे पोषण आहार मिळणे बंद झाले आहे.
भारताची मध्यान्ह भोजन योजना ही मुलांची काळजी च्या दृष्टीने त्यापैकी एक आहे. ज्या अंतर्गत मुलांना पोषण पुरवण्यासाठी शाळांमध्ये मोफत भोजन दिले जाते. शाळा बंद पडल्यामुळे 150 देशांतील 37 कोटी मुलांना शाळेत अन्न मिळू शकले नाही, असा अंदाज आहे. युनिसेफ आणि जागतिक खाद्य कार्यक्रमाने संयुक्तपणे प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती नुकतीच समोर आली आहे.
2019 साठी जाहीर केलेल्या आकडेवारीकडे नजर टाकल्यास त्यांच्या मते जगातील 55 देशांमध्ये परिस्थिती सर्वात वाईट आहे. येथील 1.5 कोटी लोकांना अन्नाचा संकटाचा सामना करावा लागत आहे, तर २०० कोटी लोकांना अद्याप पुरेसा, सुरक्षित आणि पौष्टिक आहार मिळत नाही. अशा परिस्थितीत कोविड -19 च्या साथीने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. असा अंदाज आहे की 2021 च्या अखेरीस, या महामारीमुळे आणखी 120 दशलक्ष लोकांना अन्नाच्या तुटवड्याचा सामना करावा लागणार आहे.विशेष म्हणजे आतापर्यंत जगभरात कोविड -19 साथीच्या १० कोटींपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे, तर २१ लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू या निमित्ताने झाला आहे. भारतातही या साथीच्या एक कोटीहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.
5 वर्षाखालील सुमारे 14.4 कोटी मुलांची उंची त्यांच्या वयाच्या मानाने कमी असून.
या साथीमुळे ही संख्या 34 लाखांनी वाढेल.
तसेच, 5 ते 19 वयोगटातील 7.4 कोटी मुली आणि 11.7 कोटी मुले वजन वयाच्या मानाने कमी आहे.
अशा परिस्थितीत, आपल्या पोषण आहारात शाळांमध्ये उपलब्ध होण्यार्या अन्नाचे महत्त्व आपण समजू शकतो.
कोविड- 19 रोगावर लस औषध तयार केले गेले आहे, तेव्हा सुरक्षितता लक्षात घेऊन शाळा उघडणे देखील महत्त्वाचे आहे.मात्र अशा परिस्थितीत शाळा पुन्हा सुरळीत सुरू करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. पोषण वाटप करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे शाळांमध्ये जेवण देणे , जे फक्त मुलांनाच शिक्षण देत नाही तर त्यांचे आरोग्य सुधारण्यासही मदत करते. शाळांमध्ये जेवणाची व्यवस्था मुलांना शाळेत जाण्यासाठी उद्युक्त करते. ही योजना समाजातील गरीब घटकांसह मुलींच्या शिक्षण आणि आरोग्यास सहाय्य करते. अशा परिस्थितीत या कोरोना संकटानंतर शाळांमध्ये विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तसेच मुलांची काळजी घेऊन समाजाचे उज्ज्वल भविष्य सुनिश्चित होऊ शकेल.
त्याचप्रमाणे अलीकडील दशकांकडे नजर टाकल्यास दक्षिण आशियातील महिला व मुलांच्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाली आहे. परंतु 2020 मध्ये या साथीने त्याचा तीव्र परिणाम झाला. आणि लसीकरण इत्यादी सारख्या नियमित आरोग्य सेवेवर मोठा परिणाम झाला आहे.
याचा परिणाम केवळ बालमृत्यूवरच नाही तर माता मृत्यूवरही झाला आहे.
अहवालानुसार आरोग्य सेवा विस्कळीत झाल्यामुळे 5 वर्षाखालील सुमारे 228,000 मुलांचा जीव गमावला आहे.
त्याच वेळी, माता मृत्यूंच्या 11,000 अतिरिक्त घटनांची नोंद झाली आहे.
इतकेच नाही तर मलेरिया, क्षयरोग, एड्स आणि टायफाइडमुळे जवळपास 6,000 किशोर-मुलींचा मृत्यू झाला आहे, ज्यास प्रतिबंध होऊ शकला असता.
दुसरीकडे बालविवाहाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
त्याचबरोबर मुलांमध्ये कुपोषणही वाढले आहे. दुसरीकडे, माता मृत्यू जवळजवळ 16 टक्क्यांनी वाढले आहेत.
या अहवालात असे दिसून आले आहे की
बांगलादेश आणि नेपाळमध्ये 80 टक्क्यांहून अधिक कुपोषित बालकांवर या साथीच्या आजारामुळे उपचार होऊ शकत नाहीत.
त्याच वेळी, भारतात लसीकरणात सुमारे 35 टक्के आणि पाकिस्तानमध्ये 65 टक्के घट झाली आहे.
२०२० साली भारतातील बालमृत्यू दर 15.4 टक्के नोंदविण्यात आले, तर बांगलादेशात 13 टक्के वाढ नोंदली गेली.
त्याचप्रमाणे श्रीलंकेमध्ये माता मृत्युदरात सुमारे 21.5% आणि पाकिस्तानमध्ये 21.3% वाढ झाली आहे.
दक्षिण आशियातील युनिसेफचे प्रादेशिक संचालक जॉर्ज लारिया अदजेई यांच्या म्हणण्यानुसार
या अत्यावश्यक सेवांचा तुटवडा झाल्याने गरीब आणि खालच्या वर्गातील लोकांच्या आरोग्यावर आणि पोषणवर खूप मोठा विपरीत परिणाम झाला आहे.
त्यांच्या मते, तातडीने आवश्यक पावले उचलून उपाय केले पाहिजे.
लेखन- विकास परसराम मेश्राम गोदिया
मोबाईल 7875592800
vikasmeshram04@gmail.com
हे ही वाचा .. विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
हे ही वाचा.. हवामान बदल, कोरोना आणि कुपोषण
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published on March 21 , 2021 17:59 PM
WebTitle – due to corona pandemic It has a huge adverse effect on children’s health and nutrition 2021