संविधान सभेतील भाषणे :-
भारतीय राज्यघटना स्वीकारल्यानंतर घटनासमिती मधिल डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे एक सहयोगी सदस्य श्री.टी टी. कृष्णम्माचारी यांच्या संविधान सभेतील पहिल्या भाषणातून हे भाषण भारतीय संसदेच्या दस्तावेजात पहायला मिळेल.(ON RECORD)
“आज २६ जानेवारी १९५० रोजी आपण सर्व एका विरोधाभासाच्या आयुष्यात प्रवेश करणार आहोत. राजकारणात आपण समानता अनुभवू परंतु आर्थिक आणि सामाजिक बांधणीमध्ये आपण प्रत्येक व्यक्तीची किंमत मान्य करणार आहोत कि नाही ?”
“आणखी किती काळ आपण हे असे विषमतेचे आयुष्य जगायचे? किती दिवस आपण सामाजिक आणि आर्थिक विषमता सुरु ठेवणार आहोत? हे असेच सुरु राहिले तर राजकीय स्वातंत्र्य धोक्यात येईल.असमानतेचे बळी ठरलेले लोक मेहनतीने बनवलेली संविधानिक आणि लोकशाही प्रणीत व्यवस्था उखडून टाकतील.”
आपण एक राष्ट्र आहोत असे मानाने म्हणजे निव्वळ भ्रम आहे.
“मला ठामपणे वाटते कि हि घटना अतिशय उत्तम ठरते जर ती तितकीच लवचिक असेल आणि शांततेत तसेच युद्धप्रसंगात देशाला एकसंघ ठेवेल, खरंच मला असे वाटते. परंतु जर काही अनुचित किंवा चुकीचे घडले तर घटना चुकीची आहे असे नसून घटना वापरणारे दुष्ट आणि खलकारक असतील.”
“खरया अर्थाने जगामध्ये भारत हा कुठला देश नाहीच आहे, अजून हा खऱ्या अर्थाने देश घडायचं आहे असे मी मानतो. आपण एक राष्ट्र आहोत असे मानाने म्हणजे निव्वळ भ्रम आहे. १००० प्रकारच्या जातींमध्ये विभागलेला समाज एक राष्ट्र, एक देश कसा काय होऊ शकतो ? लवकरच आपल्याला कळून येईल कि जगाच्या सामाजिक आणि मानसिक तत्वप्रणाली वर आपण देश या संज्ञेत बसत नाही.”
“स्वातंत्र्य हि बाब आनंद होणारी आहे यात वाद नाही परंतु हे स्वातंत्र्य आपल्यावर भल्या मोठ्या जबाबदाऱ्या सुद्धा टाकते. या स्वातंत्र्यमुळे आता आपण काहीही चूक झाले कि त्याचे खापर ब्रिटीश सरकार वर फोडू शकत नाही, या नंतर काहीही चुकीचे घडेल त्यासाठी सर्वस्व आपणच जबाबदार असणार आहोत आणखी कुणी नाही. वेळ फार झपाट्याने बदलत आहे.”
”जेव्हा आम्ही राजकीय लोकशाही स्थापन करीत आहोत तेव्हा हे सुद्धा अपेक्षित आहे कि, आम्ही आपला आदर्श सामाजिक न्याय व आर्थिक लोकशाही हाच ठरविला पाहिजे. आम्हाला अपेक्षित नाही कि आम्ही अशी यंत्रणा निर्माण करावी कि ज्यामुळे लोकांनी फक्त यावे आणि सत्ता प्राप्त करावी. जे लोक सरकार बनविणार आहेत त्यांच्यापुढे भारतीय संविधान एक आदर्श ठेवू इच्छितो. हा आदर्श सामाजिक न्याय व आर्थिक लोकशाही हाच आहे.”
संविधानाचा मसुदा तयार करण्याचे उत्तरदायित्व एकट्या डॉ. आंबेडकरांवर आले
“संविधान सभेने मसुदा समितीवर सात सदस्य नियुक्त केले होते.
त्यापैकी एकाने या सभागृहाचा राजीनामा दिला आणि त्याची जागा दुसऱ्याने घेतली.
एकाचा मृत्यू झाला आणि ती जागा रिक्तच राहिली.
एक अमेरिकेत निघून गेला आणि ती जागा भरली गेलीच नाही,”
“आणखी एक अन्य सभासद राज्याच्या राजकारणात गुंतून पडले आणि त्यामुळे तेवढी पोकळी निर्माण झाली.
एक किंवा दोन व्यक्ती दिल्लीपासून बऱ्याच लांब होत्या आणि त्यांची प्रकृती त्यांना उपस्थित राहण्याची अनुमती देत नव्हती.”
“म्हणून सरतेशेवटी असे घडले की –
संविधानाचा मसुदा तयार करण्याचे उत्तरदायित्व एकट्या डॉ. आंबेडकरांवर आले.
कदाचित सभागृहाला या वास्तवाची जाणीव असावी आणि डॉ. आंबेडकरांनी ही जबाबदारी, हे कार्य अत्यंत योग्यपणे पार पाडले,
यात मला तीळमात्रही शंका नाही.म्हणून आम्ही त्यांचे ऋणी आहोत”
– घटनासमिती सहयोगी सदस्य श्री.टी टी. कृष्णम्माचारी
तमाम वाचकांना संविधान दिनाच्या
तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
संविधान चिरायू होवो
- टीम जागल्या भारत
भारताचे संविधान: मानवी हक्कांचा प्रखर जाहीरनामा
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)