सर्व वनस्पती वातावरणात प्राणवायू सोडतात
हे कसे घडते?
आपल्याला ठाऊक आहे की वनस्पती मध्ये प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया होत असते.प्रकाश संश्लेषणाच्या या प्रक्रियेत वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साइड व जमिनीतून मिळणारे पाणी या दोन अतिशय साध्या पदार्थांपासून रासायनिक प्रक्रियेद्वारे आपले अन्न तयार करतात.हे अन्न शर्करेच्या रुपात निर्माण होत असते जे नंतर पिष्टमय पदार्थांच्या रुपात साठवले जाते. वनस्पतींकडून निर्माण होणारे हे अन्न सर्व सजीवांच्या अन्न व ऊर्जेचा मुख्य स्त्रोत आहे.
या रासायनिक प्रक्रियेमध्ये प्राणवायू सुद्धा तयार होतो, जो हवेत मिसळतो.
ही रासायनिक प्रक्रिया अशी दर्शविली जाते;
6H2O+6CO2 —-> C6H12O6 + 6O2
ही प्रक्रिया घडून येण्यासाठी सूर्यप्रकाश हा उर्जा स्त्रोत म्हणून वापरला जातो. या प्रकाश उर्जेचे रुपांतर वनस्पती मधील हरितद्रव्य रासायनिक ऊर्जेत करते.
लक्षात घ्या की ही प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया फक्त सुर्यप्रकाशातच होऊ शकते. म्हणजेच ती फक्त दिवसाउजेडीच घडून येते.याचाच अर्थ असा की जगातील कोणतीही वनस्पती केवळ दिवसा उजेडी सुर्यप्रकाश असतानाच हवेत प्राणवायू सोडत असते.रात्रीच्या अंधारात कोणतीही वनस्पती हवेत प्राणवायू सोडूच शकत नाही.
हेही वाचा..गौतम बुद्ध – एक निसर्गवादी : बुद्ध आणि आजचा महाविद्यालयीन तरुण
याला तुळस, वड आणि पिंपळ हे वृक्ष सुद्धा अपवाद नाहीत.धर्माच्या नावाखाली कोणतीही अंधश्रद्धा पसरणार नाही याची काळजी घ्या.
वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासा.वनस्पती श्वसन करतात. श्वसनासाठी त्यांना ऑक्सिजनची गरज असते. वनस्पतींच्या पानांवर असणा-या असंख्य सूक्ष्म अशा पर्णरंध्रांतून हवेतील ऑक्सिजन वनस्पती मध्ये प्रवेश करतो. हा ऑक्सिजन पेशींच्या आत गेल्यावर तिथे पेशीय श्वसन सुरू होते. शर्करा व ऑक्सिजन यांच्या संयोगाने ऊर्जा उत्पन्न होते. या प्रक्रियेत कार्बन डायऑक्साइड मुक्त होतो. तो पर्णरंध्रांतून हवेत मिसळतो. ही रासायनिक प्रक्रिया अहोरात्र सुरू राहते.
C6H12O6 + 6O2—> 6H2O +6CO2 + 38 ATP
यातलं ATP म्हणजे ॲडिनोजेन ट्राय फाॅस्फेट होय. हा उर्जा रेणू आहे. हा वनस्पती व प्राणी यांच्या शरीरात घडणा-या प्रत्येक चयापचय (metabolism) क्रियेसाठी लागणारी उर्जा उपलब्ध करून देत असतो.
वरील विवेचनावरून आपल्या लक्षात येईल की कोणतीही वनस्पती ऑक्सिजन पेक्षा कार्बन डायऑक्साइड हवेत जास्त काळ सोडत असते.
तुळस, वड व पिंपळ सुद्धा या नियमाला अपवाद नाहीत.म्हणूनच धर्माच्या नावाखाली कोणतीही अंधश्रद्धा पसरणार नाही याची काळजी घ्या.वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासा.
लेखन – प्राध्यापक प्रेमरत्न चौकेकर
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
प्रत्येकाच्या घरी असावं ऑक्सीमीटर
First Published on MAY 20, 2021 13 : 48 PM
WebTitle – Does Ficus religiosa release oxygen in the air day and night? 2021-05-20